Bigg Boss 16 Finale : Salman Khan च्या शो च्या विनर ट्रॉफीचा FIRST PIC झाला लीक

bigg boss 16 finale winner trophy first pic leaked of salman khan show : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 16 च्या फिनालेआधी विनर ट्रॉफीचा फोटो लीक झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो व्हायरल होत आहे. 

bigg boss 16 finale winner trophy first pic leaked of salman khan show
बिग बॉस 16 च्या विनर ट्रॉफीचा फोटो झाला लीक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस 16 च्या विनर ट्रॉफीचा फोटो झाला लीक
  • सलमान खानच्या रिअॅलिटी शो चा फोटो झाला व्हायरल
  • सोशल मीडियात फोटो व्हायरल

bigg boss 16 finale winner trophy first pic leaked of salman khan show : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 16 च्या फिनालेआधी विनर ट्रॉफीचा फोटो लीक झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो व्हायरल होत आहे. 

परंपरेला अनुसरुन फिनालेच्या वेळी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. या निमित्ताने टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक एकत्र येणार आहेत. 

नम्रताचा बोल्ड बेली डान्स, पाहून सर्वच होतील फॅन

Amruta Khanvilkar : मोहमयी रूपांने किती 'वेड' लावशील गं!

बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये 5 स्पर्धक उरले आहेत. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम, शालीन भनोत हे ते 5 स्पर्धक आहेत. यांच्यातील एक स्पर्धेचा विजेता होईल आणि दुसरा रनर अप होईल. परंपरेला अनुसरुन शेवटच्या टप्प्यात बिग बॉस 16 चे 2 स्पर्धक घरात उरतील. हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातील सर्व दिवे बंद करून बाहेर येतील. यांच्यातील एक स्पर्धक रनर अप आणि एक बिग बॉस 16 चा विजेता असेल. निकाल आज (रविवार 12 फेब्रुवारी 2023) रात्री उशिरा जाहीर होईल. 

बिग बॉस 16 च्या विजेत्याला बक्षिस म्हणून एक आकर्षक ट्रॉफी आणि इतर पुरस्कार दिले जातील. यातील ट्रॉफीचा फोटो लीक झाला आहे. हा फोटो व्हायरल होत आहे. बिग बॉस 16 च्या ट्रॉफीचे स्वरुप एका सी हॉर्स (समुद्रातला घोडा किंवा समुद्री घोडा किंवा सागरी घोडा किंवा सागरातला घोडा) सारखे आहे. या सी हॉर्सच्या शेजारी बिग बॉसचा डोळा अर्थात बिग बॉसचा लोगो आहे. 

बिग बॉस 16 च्या फिनालेला उपस्थित राहणार अब्दु रोजिक

बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालेला ताजिकिस्तानचा अब्दु रोजिक बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला उपस्थित राहणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून अब्दु रोजिकने शिव ठाकरेसाठी मतदान करण्याचे आवाहन  केले होते. आता ग्रँड फिनालेच्या निमित्ताने अब्दु रोजिक भारतात येत आहे. बिग बॉस 16 मधील सर्वात क्यूट स्पर्धक म्हणून अब्दु रोजिकची ख्याती होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना अब्दु रोजिकला टीव्हीवर बघण्याची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी