Bigg Boss 16: "हा कोणत्या गोष्टीचा Attitude ", सलमान खानने घेतली अंकित गुप्ताची शाळा

मालिका-ए-रोज
Updated Oct 28, 2022 | 17:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan Bashes Ankit Gupta : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या आगामी भागात सलमान खान, सुंबूल तौकीर खान नंतर आता सलमान खान (Salman khan) अंकित गुप्ताचा (Ankit Gupta) क्लास घेणार आहे. या वीकेंड का वारमध्ये सलमान खान अंकित गुप्ताला अनेक प्रश्न विचारताना दिसणार आहे. त्याचीच एक झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Bigg boss 16 Salman khan bashes Ankit Gupta in friday ka war
सलमानने घेतली अंकित गुप्ताची शाळा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमानने घेतली अंकित गुप्ताची शाळा
  • अंकित गुप्ताला दिले खेळण्याचे धडे
  • 'फ्रायडे का वार'मध्ये आणखी कोणाचा वर्ग घेणार सलमान खान?

Salman Khan Bashes Ankit Gupta : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या आगामी भागात सलमान खान, सुंबूल तौकीर खान नंतर आता सलमान खान (Salman khan) अंकित गुप्ताचा (Ankit Gupta) क्लास घेणार आहे. या वीकेंड का वारमध्ये सलमान खान अंकित गुप्ताला अनेक प्रश्न विचारताना दिसणार आहे. त्याचीच एक झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. (Bigg boss 16 Salman khan bashes Ankit Gupta in friday ka war)

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ने टीआरपी चार्टमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये, सलमान खान (Salman khan) अंकित गुप्ताला (Ankit Gupta) त्याच्या कमी योगदानाबद्दल फटकारताना दिसणार आहे. याआधीच्या प्रोमोमध्ये सलमानने सुंबुल तौकीर खानचा क्लासही घेतला होता. सलमान खान म्हणाला, " या शोमध्ये तू दिसतच नाहीयेस, जाताना तर खूप मोठी मोठी वचनं दिली होती. पण तू घरात दिसतंच नाहीस." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अंकित गुप्ताला शोच्या सुरुवातीपासूनच बोलण्यास  आणि सक्रिय होण्यास सांगितले जात आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये सलमान खान या कारणावरून अंकितला फटकारताना दिसणार आहे. त्याची एक छोटीशी झलक  प्रोमोमध्ये पाहायला मिळाली. जिथे सलमान खान अंकित गुप्ताला म्हणतो की, "तुला या शोमध्ये रहायचे नाही का? प्रोमोमध्ये सलमान अंकितला म्हणतो, "तू या शोमध्ये का आला आहेस?" ज्यावर अंकितने उत्तर दिले की तो शो जिंकण्यासाठी आला आहे. ज्यावर सलमान खान म्हणतो, “यावरच विश्वास नाही. तुझे अपहरण केले आहे का? पैसे घेऊ नका असे सांगितले होते का? हा कोणत्या गोष्टीचा Attitude आहे? तुला इथे राहायचे नाही असे आम्हाला का वाटत आहे? तुझा इथे काही उपयोग नाही. तुला काय म्हणून हाक मारायची लूजर की क्वीटर?

कलर्सने हा प्रोमो शेअर केला आहे , कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "अंकितच्या मौनावर सलमानने प्रश्न उपस्थित केले आहेत. या 'फ्रायडे का वार'मध्ये आणखी कोणाचा वर्ग घेतला जाईल?"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी