Bigg Boss 16: आपण फक्त आकडेच मोजत बसू.. सलमान बिग बॉससाठी घेणार 'एवढे' कोटी?

Bigg Boss 16: बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पुढच्या सीझनबद्दल नवनवी माहिती समोर येत आहे. त्यातच आता अशी माहिती समोर आली आहे की सलमान खानने या सीझनसाठी तब्बल 1000 कोटींची मागणी केली आहे.

bigg boss 16 salman khan increased fee 3 times will charge rs 1000 crore for this season
Bigg Boss 16: आपण फक्त आकडेच मोजत बसू.. सलमान बिग बॉससाठी घेणार 'एवढे' कोटी? 
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसचा पुढचा सीझन सलमान खान करणार होस्ट
  • सलमान खानने शोसाठी तिप्पट वाढवली फी
  • सलमान खान गेल्या 13 वर्षांपासून हा शो करत आहे होस्ट

मुंबई: रिअॅलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील सर्वात आवडता शो आहे. या शोबाबत घोषणा होण्यापूर्वीच त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या 13 वर्षांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) या शोचे सूत्रसंचालन करत आहे आणि दरवर्षीप्रमाणेच यंदाही बिग बॉसच्या नव्या सीझनचा (Bigg Boss 16) होस्ट हा सलमान खानच असणार आहे. पण या सीझनसाठी सलमानने त्याच्या फीमध्ये तीन पट वाढ केल्याचे समजते आहे.

सलमान 1000 कोटी घेणार?

शोच्या या सीझनबाबत अशा बातम्या येत आहेत की, सलमान खानने १६व्या सीझनसाठी भरघोस फी मागितली आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी सलमान खानने 1000 कोटी रुपये फी मागितली आहे. टेली चक्करच्या बातमीनुसार, 'गेल्या काही सीझनमध्ये फार मोठी वाढ झालेली नाही हे लक्षात घेऊन सलमानने फीमध्ये तीन पट वाढ करण्याची मागणी केली आहे. यावेळी सलमानने सांगितले आहे की, जोपर्यंत त्याला हे शुल्क दिले जात नाही तोपर्यंत तो शो होस्ट करणार नाही, मात्र याबाबतच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.'

अधिक वाचा: IMDB rating of Bollywood movies: IMDB वर 'अ थर्सडे' आणि 'गंगुबाई काठियावाडी' 2022 मधील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय महिला केंद्रित चित्रपट

सलमान आधी किती घेत होता मानधन?

रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने गेल्या सीझनसाठी तब्बल 350 कोटी रुपये मानधन घेतलं असल्याचं बोललं जातं. त्याच वेळी, 16व्या सीजनसाठी त्याने 1050 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

दरम्यान, एका पत्रकार परिषदेत सलमान खान असंही म्हणाला होता की, जेव्हा-जेव्हा त्याला शो सोडायचा असतो तेव्हा-तेव्हा निर्माते त्याला होस्ट राहण्यासाठी कसंही करुन पटवतात. ज्यामुळे तो देखील थांबतो. 

अधिक वाचा: शनाया कपूरचा बॉलिवूड डेब्यू लांबणीवर?, करण जोहरचा 'बेधडक' सिनेमा रखडला

नव्या सीझनमध्ये कोण-कोण दिसणार?

मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस 16 आणि बिग बॉस ओटीटी 2 साठी 17 सेलिब्रिटींना संपर्क करण्यात आला आहे. सध्या ही ऑफर कोण घेणार हे स्पष्ट नाही. रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांनी अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्ता, आरुषी दत्ता, पूनम पांडे, शिवम शर्मा, जय दुधाणे, मुनमुन दत्ता, आझम फलाह, कॅट ख्रिश्चन, जन्नत, जुबेर, फैसल शेख, अशी . केविन अल्मासिफर आणि बसीर अलीशी यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी