Bigg Boss 16 : सलमान खानने घेतली 'या' स्पर्धकाची शाळा म्हणाला, "तुझं वागणं ढोंगी आणि दुटप्पीपणाचं"

मालिका-ए-रोज
Updated Nov 05, 2022 | 16:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 16 : बिग बॉस 16 (Bigg Boss 16 ) चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने (Salman Khan) साजिद खानला (Sajid khan) ढोंगी म्हटले आहे. इतकंच नाही तर साजिदच्या खेळाबद्दलही तो चांगलाच संतापला आहे. साजिदचं वागणं दुटप्पीपणाचं असल्याचं सलमान खानच म्हणणं आहे.

Bigg Boss 16 salman khan on sajid khan call him double standards
सलमान खानने घेतली 'या' स्पर्धकाची शाळा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खानने घेतली साजिद खानची शाळा
  • सलमान आणि साजिदमध्ये शाब्दिक चकमक
  • साजिद खानच्या उत्तरावर सलमान खान भडकला

Bigg Boss 16 : बिग बॉस 16 (Bigg Boss 16 ) चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने (Salman Khan) साजिद खानला (Sajid khan) ढोंगी म्हटले आहे. इतकंच नाही तर साजिदच्या खेळाबद्दलही तो चांगलाच संतापला आहे. साजिदचं वागणं दुटप्पीपणाचं असल्याचं सलमान खानच म्हणणं आहे. (Bigg Boss 16 salman khan on sajid khan call him double standards)

सध्या बिग बॉस 16 (Bigg Boss 16 ) मध्ये धमाल पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसमधी सर्व स्पर्धकांचा खेळ दिवसेंदिवस बहरत चाललेला दिसत आहे. दुसरीकडे, साजिद खान हा घरातील एकमेव स्पर्धक आहे ज्याचा खेळ दिसत नाही. त्याने सर्वांशी खूप चांगले नाते निर्माण केले आहे. तो कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाहीत, पण एकांतात सर्वांना समजावताना दिसताो. बिग बॉस 16 चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान साजिद खानला फटकारताना दिसत आहे. सलमानने साजिद खानची शाळा घेतलेली आहे. 

अधिक वाचा : हेल्दी वेट लॉस नंतर शरीरात होतात हे बदल

साजिदला सलमानने फटकारले

बिग बॉस 16 च्या नव्या प्रोमोनुसार, "सलमान खान साजिद खानला फटकारताना दिसत आहे. प्रोमोमध्ये तो साजिद खानला ढोंगी म्हणतो. सलमान खान म्हणतो की साजिद या घरात काय करतोय. यानंतर साजिद म्हणतो की, मी येत्या काळात माझा खेळ दाखवेन. माझे पत्ते अजून मी ओपन केलेले नाहीत, ते करायची आता वेळ आलेली आहे."


साजिदवर भडकला सलमान

साजिद खानचे उत्तर ऐकून सलमान खान चांगलाच संतापला. सलमान म्हणतो की "इथे वेळ मिळत नाही, तुम्हीच तुम्हाला बाहेर काढण्याची संधी प्रेक्षकांना देत आहात, मला हे प्रकरण समजले आहे. तुम्ही ढोंगी दिसता. स्टँड घ्या किंवा स्टँड बदला. सलमानच्या बोलण्यामुळे साजिदला खूप वाईट वाटलेले दिसत आहे" 

अधिक वाचा :  या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला असतात इच्छूक

साजिद खानच्या सहभागामुळे झाला होता गोंधळ

बिग बॉसच्या घरात साजिद खानने एन्ट्री घेतल्यापासून लोक प्रचंड संतापले आहेत. खरं तर, 2018 मध्ये त्याच्यावर MeToo चे आरोप झाले होते. 9 हून अधिक अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यामुळे सलमान खान आणि बिग बॉसला टीकेला सामोरे जावे लागले होते. 

त्यातच आता साजिद खानचा खेळ दिसत नसल्याने सलमान खानने साजिद खानची शाळा घेतलेली आहे. तो साजिदवर भडकलेला प्रोमोमध्ये दिसत आहे. आता यामुळे साजिदच्या परफॉर्मन्समध्ये काही फरक पडणार का? बिग बॉसच्या घरात आणखी काय काय पाहायला मिळणार याचीच प्रतीक्षा करूया..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी