बिग बॉस मराठी २ घरातून बाहेर गेल्यानंतर सुरेखा पुणेकर यांची 'या' स्पर्धकाला येतेय खूप आठवण

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 00:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 contestants miss Surekha Punekar: बिग बॉस मराठी घरातून सुरेखा पुणेकरांनी नुकताच निरोप घेतला. पण त्यांच्या जाण्याने घरात बरेच जण दुखावलेत. त्यातही पाहा कोणाला त्यांची फारंच आठवण येत आहे.

Bigg Boss Marathi 2 Abhijeet Kelkar speaks on missing Surekha Punekar
बिग बॉस मराठी २ घरातून बाहेर गेल्यानंतर सुरेखा पुणेकर यांची 'या' स्पर्धकाला येतेय खूप आठवण 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस घरात अभिजीत केळकरला आली सुरेखा पुणेकरांची आठवण
  • सुरेखा यांच्या जाण्याने अभिजीत झाला भावुक
  • बालपणीतल्या या भावनिक गोष्टीशी केली सुरेखा यांची तुलना

मुंबई: बिग बॉस मराठी २चा खेळा आता बराच रंजक झाला आहे आणि त्यातही खेळाचा उत्तरार्ध सुरु झाला आहे. त्यामुळे आता घरात उरलेल्या काही लाडक्या स्पर्धकांना सुद्धा घराचा निरोप घ्यावा लागतो आहे. जसं नुकतंच सुरेखा पुणेकर यांच्या बाबतीत घडलं. घरात खेळ उशिरा कळला पण प्रत्येकाच्या मनात घर करण्यात सुरेखा यांनी अजिबात उशिर केला नाही. त्यामुळे त्या घरातून बाहेर गेल्या तेव्हा घरातला प्रत्येक स्पर्धक भावुक झाला होता. आता त्या घरातून गेल्या असल्या तरी त्यांची आठवण काही केल्या जात नाहीए. खास करुन अभिजीत केळकरला तर त्यांची खूपच आठवण येत आहे.

वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मधील एका क्लिपमध्‍ये भावुक झालेला अभिजीत सुरेखा ताईंबाबत बोलताना आणि स्‍वत:च्‍या जीवनातील अनुभव सांगताना दिसला. रुपालीसोबत बोलताना अभिजीत म्‍हणतो, ''सुरेखा ताई बाहेर गेल्‍यामुळे मी थोडा सायकोलॉजिकली डाऊन झालो, डिस्‍टर्ब झालो. मोठा माणूस असला की एक आधार असतो ना... की, काही झालं घरात तर आहेत ते!'' रूपालीसुद्धा यावर होकार देत म्‍हणताना दिसते, “बाप्‍पा व सुरेखा ताईंच्‍या बाहेर जाण्‍याने बीबी घरामध्‍ये अनेक बदल झाले आहेत.”

 

यो दोघांची ही भावनिक चर्चा पुढे सुरु राहते आणि नंतर अभिजीतकडून एक हृदयस्‍पर्शी गोष्ट व्यक्त होते. अभिजीत भावुक झाल्याने त्याला त्याच्या बालपणातली एक गोष्ट आठवते आणि तो सुरेखा यांची तुलना त्याच्या बालपणीतल्या त्याच्या केअरटेकरसोबत करताना दिसतो. ही गोष्ट सांगताना तो म्हणतो, ''मी ज्‍यांच्‍याकडे लहानाचा मोठा झालो ना त्‍या एक्‍झॅक्‍ट सुरेखा ताई सारख्‍याच आहेत. मी फार बोललो नाही कधी त्‍यांच्‍याशी पण अटॅचमेंट होती मला. आई बाबा जॉबला जायचे, त्‍यांच्‍याकडेच असायचो आम्‍ही. त्‍यांनी खूप केलं आहे माझ्यासाठी, कोणाचा मुलगा आहे हे चाळीतल्‍या लोकांना कळायचं नाही. हौस, मौज माझी, काय हवं असेल ते आणून दिलं त्‍यांनी... ह्या सगळ्या गोष्‍टी त्‍यांच्‍याशी बोललो नाही पण होतो त्‍यांच्‍याशी अटॅच्‍ड!''

 

हे ऐकल्यावर रुपाली सुद्धा थोडी भावुक होते. या दोघांच्या या संवादातून अभिजीतचं सुरेखा यांच्याशी असलेली एक गोड बॉण्डिंग अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या कुटुंबापासून लांब राहत असताना या कलाकारांना या बिग बॉसच्या घरात एक नवीन कुटुंब मिळालं आहे हे नक्की. सगळेच कधी ना कधी भांडतात पण त्यांच्यात सुद्धा एक नातं निर्माण झालं आहेच कुठेतरी. त्यातही अभिजीत आणि सुरेखा यांचं नातं तर खरंच खूपंच गोड आणि भावुक करणारं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ घरातून बाहेर गेल्यानंतर सुरेखा पुणेकर यांची 'या' स्पर्धकाला येतेय खूप आठवण Description: Bigg Boss Marathi 2 contestants miss Surekha Punekar: बिग बॉस मराठी घरातून सुरेखा पुणेकरांनी नुकताच निरोप घेतला. पण त्यांच्या जाण्याने घरात बरेच जण दुखावलेत. त्यातही पाहा कोणाला त्यांची फारंच आठवण येत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles