बिग बॉस मराठी २ घरात ‘हाफ तिकीट’ या नॉमिनेशन टास्क अंती 'हे' ६ स्पर्धक झाले नॉमिनेट

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 11:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Nominations for the week: बिग बॉस मराठी २मध्ये नवीन कॅप्टन होताच घरात नॉमिनेशनचं बिगुल वाजलं, हाफ तिकीट हा टास्क घरात रंगला. त्यामध्ये अखेर काही स्पर्धक घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले.

Bigg Boss Marathi 2 half ticket nomination task announced
बिग बॉस मराठी २ घरात ‘हाफ तिकीट’ या नॉमिनेशन टास्क अंती 'हे' ६ स्पर्धक झाले नॉमिनेट 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस घरात रंगला 'हाफ तिकीट' हा नॉमिनेशन टास्क
  • शिवला मिळाली पूर्ण तिकीट आणि झाला सेफ
  • टास्क अंती ६ स्पर्धक झाले घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात सध्या  वेगळंच कोल्ड वॉर सुरु आहे. आणि ते सुरु आहे घरातल्या सगळ्यात स्ट्राँग आणि पहिला बनलेला ग्रुप केव्हीआर म्हणजेच किशोरी शहाणे, वीणा जगताप, आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये.नुकताच पार पडलेला भाग सुरु झाला तोच या गोष्टीवर आणि हाच विषय पुढे सरकताना दिसला आणि या तिघी जणी पुन्हा एकदा चर्चा करताना दिसल्या की आता त्यांच्यात काही उरलं आहे की नाही. पण या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही आणि ग्रुपमध्ये आलेली फूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यातंच बिग बॉस यांनी या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क हाफ तिकीट जाहीर केलं.

या टास्कमध्ये गार्डन एरियामध्ये एक बसस्टॉप उभारला गेला होता आणि तिथे एक बाक ठेवला गेला होता. थोड्या-थोड्या वेळाने बिग बॉस एका जोडीचं नाव जाहीर करणार असं सांगितलं गेलं आणि प्रत्येक जोडीतल्या दोघांना एक-एक हाफ तिकीट दिली जाणार होती. आणि या जोडीतल्या कोणा एकाला एक पूर्ण तिकीट घेऊन स्वतःला सेफ करायचं होतं. त्यासाठी समोरच्या स्पर्धकाला पटवून द्यायचं होतं की आपण समोरच्या स्पर्धकापेक्षा तिकीट मिळवण्यासाठी योग्य का आहोत. अखेर टास्क सुरु झाला आणि पहिली जोडी वीणा आणि नेहाची जाहीर झाली. नेहा आणि वीणा यांनी एकमेकींना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण दोघीही खूप स्ट्राँग असल्यामुळे आपल्याकडचं हाफ तिकीट कोणीही देण्यास तयार नव्हतं. एका क्षणाला दोघी सुद्धा काही प्रयत्न करत नाहीत हे लक्षात आल्यावर बिग बॉस यांनी घरातल्या स्पर्धकांना हे टास्क किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा सांगितलं. पुढे टास्क सुरु राहिलं पण नेहा आणि वीणा दोघी अडून राहिल्यामुळे दोघीही घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाल्या.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

पुढची जोडी होती हिना आणि शिवची. शिवने आणि हिनाने एकमेकांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. शिवने हिनासोबत खूप इमोश्नल अत्याचार केला आणि अखेर हिनाने शिवला आपलं हाफ तिकीट देऊन टाकलं. त्यामुळे हिना नॉमिनेट तर शिव सेफ झाला. यावर तिच्या ग्रुपने तिला थोडा समजवण्याचा प्रयत्न केला की कदाचित तिने चुकीचा निर्णय घेतला पण हिना तिने घेतलेल्या निर्णयावर फार पश्चाताप करताना दिसली नाही.

 

 

यानतंर वेळ होती किशोरी आणि वैशाली एकमेकींसमोर येण्याची. दोघींची चर्चा तर चांगल्या नोटवर सुरु झाली पण हळू-हळू ही चर्चा थोडी वादाचे स्वरुप घेताना दिसली. दोघींनीही सुरुवातीला आपली बाजू मांडली आणि नंतर मात्र दोघींनी एकमेकींवर आरोप करायला सुरुवात केली. अखेर दोघीही हाफ तिकीट देण्यास तयार झाल्या नाहीत आणि किशोरी आणि वैशाली दोघीही नॉमिनेट झाल्या. थोड्या वेळाने टास्कमधली शेवटची जोडी रुपाली आणि माधव एकमेकांसमोर आले. दोघांनी सुद्धा हाफ तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. दोघांनी एकमेकांना समजवण्याचा खूप प्रयत्न ही केला पण दोघांनीही एकमेकांना हाफ तिकीट दिलं नाही आणि दोघंही घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. यावर टास्क संपला असं बिग बॉस यांनी जाहीर केलं आणि टास्क अंती अभिजीत जो घरचा कॅप्टन आहे तो आणि शिव सोडल्यास इतर ६ स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. या ६ स्पर्धकांसाठी पुढचे दोन दिवस खूप महत्त्वाचे असतील कारण याच दोन दिवसात कोणाचा गेम अखेर संपेल ते मिळणाऱ्या वोट्सवरुन कळेलच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ घरात ‘हाफ तिकीट’ या नॉमिनेशन टास्क अंती 'हे' ६ स्पर्धक झाले नॉमिनेट Description: Bigg Boss Marathi 2 Nominations for the week: बिग बॉस मराठी २मध्ये नवीन कॅप्टन होताच घरात नॉमिनेशनचं बिगुल वाजलं, हाफ तिकीट हा टास्क घरात रंगला. त्यामध्ये अखेर काही स्पर्धक घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles