Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी २च्या घरात नेहाच्या ‘या’ वक्तव्यावर हिनाने मांडलं ठाम मत

मालिका-ए-रोज
Updated Jul 10, 2019 | 15:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2- Hina has firm thoughts: बिग बॉस मराठी २ घरात आता अनेकांना आपले जवळचे मित्र दुसऱ्यांच्या जवळ जातील अशी भीती आहे. अशीच चर्चा आज खास मैत्रिणी हिना आणि नेहामध्ये होताना दिसेल जिथे माधव ही असेल.

Bigg Boss Marathi 2 Hina and Neha discuss this important topic in the house
Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी २च्या घरात नेहाच्या ‘या’ वक्तव्यावर हिनाने मांडलं ठाम मत 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी घरात नेहा आणि हिनामध्ये गहन चर्चा होणार
  • नेहासमोर हिना माडणार आपलं ठाम मत
  • कोणाला एकटं पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला- हिना

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात सध्या खेळ अशा टप्प्यावर आहे की घरात अनेक नात्यांची समिकरणं बदलेली आहेत. एकीकडे घरातला सगळ्यात स्ट्राँग ग्रुप केव्हीआर म्हणजेज रूपाली भोसले, किशोरी शहाणे आणि वीणा जगताप यांचा ग्रुप जवळपास तुटल्यात जमा आहे. त्यामुळं किशोरी आणि रूपाली इतर स्पर्धकांशी बोलताना, त्यांच्याकडे व्यक्त होताना दिसतात खासकरून हिनाकडे. त्यात नेहा शितोळेचं सुद्धा तिच्या सध्याच्या असलेल्या अभिजीत केळकर आणि वैशाली माडेच्या ग्रुपसोबत पटत नाहीये. त्यामुळे घरात आता सध्याची स्थिती बघता आपल्या जवळचा मित्र किंवा मैत्रीण दुसऱ्या कोणाच्या गटात सामिल होणार नाही ना ही भीती सगळ्यांनाच सतायवतेय. खास करून नेहाला.

नेहाची खास मैत्रीण घरातली पहिली वाईव्ड कार्ड एन्ट्री हिना पांचाळबद्दल सुद्धा नेहाला हिच भीती आहे. सध्याची घरातली परिस्थिती बघता हिना रूपाली आणि किशोरी यांच्यासोबत खूप वेळ घालवताना दिसते. त्यांच्याशी तासनतास गप्पा मारताना दिसते किंवा त्यांची काळजी घेताना सुद्धा दिसते. त्यामुळे आज घरात नेहा आणि हिनामध्ये एक चर्चा रंगेल या विषयावर जिथे माधव सुद्धा हजर असेल. नेहाचे म्हणणे असेल, “अभिजीत आणि वैशाली जर कोणामध्ये भांडण झाले असेल तर ते अजून वाढविण्याचा प्रयत्न करतात आपण ते पण करूया नको... लोकांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये आपण पडायचे नाही... जर त्यांचे भांडण झाले आहे तर त्यांचे त्यांना मिटवू दे, कोणाच्याही मध्ये जाऊ नका...”

यावर हिना आपल्या बाजूने स्पष्टीकरण देताना दिसेल आणि म्हणेल, “मी नाही जात कोणच्यामध्ये, समोरचा माणूस जर येत असेल तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकतं. मला अस वाटत, जर त्यांना वाटत आहे बोलायचे आहे तर त्यांना बोलू दे... घरामध्ये जर कोणाला एकटं वाटत आहे किंवा त्याला एकटं पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला... त्या माणसाशी पाच मिनीट बोलले तर माझ काहीच बिघडणार नाहीये.”

कालच्या भागात नेहा, हिना आणि माधव रात्री एकत्र बसून अशीच चर्चा करताना दिसले होते. ज्यामध्ये नेहा भावूक झाली होती आणि तेव्हा ती हिनाला म्हणताना दिसली होती की मी कोणालाच कोणाशी बोलावं की नाही हे सांगत नाही तरीसुद्धा तिला डॉमिनेटिंग म्हंटलं जातं. पण आज मात्र ती हे बोलून स्वतःच्याच वाक्याच्या विरोधाभास बोलताना दिसेल. त्यामुळे नेमकी ती नेहा बरोबर की ही हेच कळेनासं होईल. पण हे सगळं सध्या सगळ्यांकडूनंच होताना दिसणार आहे कारण आता खेळ ७व्या आठवड्यात पोहोचला आहे त्यामुळे आता खेळ अधिक कठीण होताना दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी २च्या घरात नेहाच्या ‘या’ वक्तव्यावर हिनाने मांडलं ठाम मत Description: Bigg Boss Marathi 2- Hina has firm thoughts: बिग बॉस मराठी २ घरात आता अनेकांना आपले जवळचे मित्र दुसऱ्यांच्या जवळ जातील अशी भीती आहे. अशीच चर्चा आज खास मैत्रिणी हिना आणि नेहामध्ये होताना दिसेल जिथे माधव ही असेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola