बिग बॉस घरात जेवणावरून हिनाचा राडा तर वैशाली-रूपालीने ‘या’ स्पर्धकाबद्दल दर्शवली नाराजी

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Hina to create drama over food: बिग बॉस मराठी २मध्ये आज एक वेगळंच नाट्य घडणार आहे. एकीकडे जेवणावरून हिना पांचाळ आज भयंकर चिडणार आहे. दुसरीकडे वैशाली आणि रूपाली आपली नाराजी दर्शवणार आहेत.

Bigg Boss Marathi 2 Hina creates drama on food while Vaishali and Rupali get angry on Kishori
बिग बॉस घरात जेवणावरुन हिनाचा राडा तर वैशाली-रूपालीने ‘या’ स्पर्धकाबद्दल दर्शवली नाराजी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस घरात जेवणावरून हिना करणार राडा
  • किशोरी सोडून संपूर्ण घर जाणार हिनाच्या विरोधात?
  • वैशाली-रूपाली व्यक्त करणार किशोरी यांच्यावर नाराजी

मुंबई: बिग बॉस मराठी घरात रोज नवीन नाट्य घडत असतं. कधी कोणतं कारण वादाचं कारण ठरेल हे काही सांगता येत नाही. तसंच काहीसं आज घडताना दिसणार आहे आणि जेवणावरून बराच राडा घरात निर्माण होईल. स्पर्धकांनी मागच्या काही दिवसात बिग बॉस घरातले बरेच नियम तोडले आहेत. त्यामुळे शिक्षा म्हणून त्यांच्याकडून सगळेच अत्यावश्यक खाण्याचे पदार्थ जप्त केले गेले आहेत. त्यामुळे घरात काही मोजकंच खाण्याचं सामान उरलं आहे. म्हणूनच सध्या घरात फार विचारपूर्वक स्वयंपाक केला जातो. त्यावरूनच आज हिना पांचाळचे घरात खटके उडणार आहेत.

आज घरात सगळ्यांसाठी चपात्या बनवल्या जाणार आहेत पण हिनाला मात्र भाकरी खायची आहे. त्यामुळे ती घरात किचनमध्ये सगळ्यांना विनंती करताना दिसेल पण त्यावर तिथे हजर असलेले वीणा, वैशाली आणि इतर काही स्पर्धक तिच्यावर भडकताना दिसतील. घरात एकच गोष्ट बनणार आणि तिने ती खावी असं अनेकांचं मत असेल. ती त्यानंतर ती स्वतः बनवून खाईल असं म्हणताना दिसेल पण त्यावर पण काही स्पर्धक वाद उकरून काढतील. त्यावर हिना चिडून आरडा-ओरडा करताना दिसेल आणि हा वाद थोडा चिघळताना दिसेल. यावर नंतर चर्चा होताना दिसेल आणि सगळे स्पर्धक त्यात सहभाग घेताना दिसतील. पण त्यात किशोरी शहाणे थोडीफार हिनाची बाजू घेताना दिसतील. गेले काही दिवस किशोरी यांना घरात एकटं पाडलं जात आहे. पण हिना मात्र त्यांच्यासोबत बोलून त्यांना बराच धीर देताना कायम दिसत आहे. त्यामुळे सुद्धा किशोरी यांना हिनाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे. म्हणूनच त्या तिची बाजू घेताना आज दिसतील. पण ते काय सगळ्यांनाच आवडेल असं नाही. त्यावर वीणाचा सुद्धा किशोरीसोबत वाद होताना दिसेल आणि विषयाचं पुन्हा भांडणात रूपातंर होईल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

हे होतं ना होतं बेडरूममध्ये वैशाली आणि रूपाली याच विषयावर चर्चा करताना दिसतील आणि किशोरी यांनी हिनाची बाजू घेतली यावर नाराजी व्यक्त करतील. याबद्दल बोलताना रूपाली म्हणेल “सतत कसं मला बोलूच देत नाही अस म्हणतात... सारख नका ना तेच तेच बोलू... तुमच्याकडे मुद्दे असतील तर बोलाना” वैशालीचं यावर म्हणणं असेल की किशोरी या बोलल्या की ती (हिना) करू शकत असेल तर तिला करू द्या. पुढे रूपाली म्हणताना दिसेल की मग मला पण आता भाताचे काही तरी वेगळे करायचे आहे. तर वैशाली म्हणेल मग मी पण म्हणू शकते मला फ्राईड राईस करून द्या.

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

यापुढे वैशाली पुन्हा एकदा हिनाकडे रोष वळवत म्हणेल, “मी तिला देखील हे सांगणार आहे तू जर सुरूवातीला म्हणाली असतीस ‘माझ चुकलं, मी आधी नाही सांगितलं... मी सगळ्यांना विनंती करते आणि घेऊ का विचारले असते तर कोणीच नाही नसते म्हटले...’ अभिजीत पण म्हणाला तिचा अॅटिट्यूड चुकला... त्यानेच सगळे बिघडवले... ज्याप्रकारे ती आली आणि बोलली ते चुकले.” असं होत किचनमध्ये सुरू झालेला वाद थेट बेडरूमपर्यंत पोहचताना दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस घरात जेवणावरून हिनाचा राडा तर वैशाली-रूपालीने ‘या’ स्पर्धकाबद्दल दर्शवली नाराजी Description: Bigg Boss Marathi 2 Hina to create drama over food: बिग बॉस मराठी २मध्ये आज एक वेगळंच नाट्य घडणार आहे. एकीकडे जेवणावरून हिना पांचाळ आज भयंकर चिडणार आहे. दुसरीकडे वैशाली आणि रूपाली आपली नाराजी दर्शवणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles