Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी घरात अजून एक आश्चर्यजनक एलिमिनेशन, हीना घरातून बाहेर

मालिका-ए-रोज
Updated Aug 19, 2019 | 12:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली ती म्हणजे डान्सिंग क्विन हीना पांचाळ. हिनाने घरात एन्ट्री घेतल्यानंतर ती उत्तम खेळी खेळली पण गेल्या आठवड्यात ती नॉमिनेट झाली आणि मग एलिमिनेट.

bigg boss marathi 2 hina Panchal gets eliminated from the house
Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी घरात अजून एक आश्चर्यजनक एलिमिनेशन, हीनाची घरातून एक्झीट 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठीच्या घरातून हीना पांचाळ झाली एलिमिनेट
  • या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड पण उत्तम प्रवास
  • नॉमिनेशन टास्कमध्ये कमी वोट्स मिळाल्याने झाली होती नॉमिनेट

मुंबई: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची सुरुवात झाली ती 15 स्पर्धकांना घेऊन. त्यात तब्बल तीन आठवड्यानंतर खेळात एन्ट्री घेतली ती या सीझनच्या पहिल्या वाइल्ड कार्ड कन्टेस्टंटने. शिवानी सुर्वेला घरातून काढलं गेलं आणि त्याचक्षणी घरात आली हीना पांचाळ. हीनाने खूप उत्तम खेळ खेळला पण गेल्या आठवड्यात मात्र ती नॉमिनिट झाली ते शिव ठाकरेच्या विरोधात आणि अखेर तिला या आठवड्यात घर सोडावं लागलं.

हीना खेळात तीन आठवडे उशिरा दाखल तर झाली पण ती कुठेही खेळात मागे पडली नाही. आल्या दिवसापासून तिला माहिती होतं खेळ कसा खेळायचा. कधीकधी ती खेळात कन्फ्युज वाटली पण तिने त्या-त्या वेळेला स्वतःला सावरलं सुद्धा. घरात येताच ती अभिजीत बिचुकलेसोबत गट्टी जमवताना दिसली. तर माधवसोबत सुद्धा तिने छान मैत्रीची सुरुवात केली. कुठेतरी जेव्हा ती खेळात आली तेव्हा केव्हीआरपी ग्रुप फार स्ट्राँग होता. ग्रुप मधला मोरक्या परागला तिने टार्गेट केलं आणि त्याच्यासोबत सुद्धा ती छान मैत्री करताना दिसली. पण नंतर पराग घरातून एविक्ट झाला. तसाच बिचुकले सुद्धा घरातून त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी निघून गेला. मग तिने आपला कल वळवला ते माधव आणि नेहाकडे. या दोघांसोबत आणि स्वतःचं डोकं लावत तिने उत्तम खेळायला सुरुवात केली आणि पुढे खेळात ती स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरली.

त्यानंतर अनेकदा अनेक टास्कमध्ये तिने स्वतःची एक छान, एक वेगळी छाप पाडली. तिच्या सततच्या बडबडीने, तिच्या मराठीच्या होणाऱ्या घोळाने आणि सतत एखादा विषय ताणून धरल्यामुळे ती अनेकदा महेश मांजरेकरांच्या टीकेची धनी सुद्धा झाली. पण ती कुठेही खचली नाही. खेळात तिने आपला एक स्वतःचा स्टँड कायम ठेवला. नंतर शिवानी घरात परत आली आणि माधव-नेहा-हीना हे त्रिकुट ढासळलं. नंतर तिने अभिजीत केळकर आणि ग्रुपकडे कल वळवला. वैशालीसोबत तिने छान मैत्री केली. वैशाली एलिमिनेट झाल्यानंतर अभिजीत, शिव आणि वीणासोबत एकत्र आली आणि तिने आपला खेळ सुरू ठेवला. पण त्यांच्याशी सुद्धा खटके उडताना दिसले आणि कुठेतरी खेळात ती एकटी पडली.

मध्यंतरी झालेल्या रूपालीच्या एलिमिनेशनच्या वेळी तिला रूपाली एक सुवर्ण संधी दिली आणि तिला त्या आठवड्यासाठी एलिमिनेशन पासून सेफ केलं. पण त्या आठवड्यातल्या टास्कमध्ये हीनाने खूप मोठा घोळ केला. कॅप्टन्सी टास्क खांब-खांबमध्ये हिना सेफ असल्या कारणाने संचालिका झाली. पण त्यामध्ये हीनाने अनेकदा दिलेला निर्णय बदलला आणि आपले शब्द मागे घेताना दिसली. कॅप्टन्सी सारख्या एका महत्त्वाच्या टास्कमध्ये इतका गोंधळ संचालिकेने केल्यामुळे बिग बॉसकडून तिला मोठी शिक्षा मिळाली. त्या आठवड्यात ती सेफ केली गेली होती पण ती मिळालेली सुवर्ण संधी हीनाकडून बिग बॉस यांनी काढून घेतली. पण तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती त्या आठवड्याला नमिनिट सुद्धा झाली नाही आणि त्यामुळे एलिमिनेट सुद्धा नाही झाली.

पुढे मात्र तिचा खेळ तिच्या हिशोबाने सुरू राहिला. वेगवेगळे वाद, टास्क मधला तिचा परफॉर्मन्स, तसंच दर विकेंडच्या डावाला होस्ट महेश मांजरेकरांकडून घेतली जाणारी शाळा. या सगळ्या गोष्टीने हीनाचा खेळातील प्रवास उत्तम रंगत होता. पण गेल्या आठवड्यात जेव्हा आपल्यासोबत तीन स्पर्धक फिनालेमध्ये कोण असणार हा टास्क रंगला तेव्हा सगळ्यात कमी वोट्स मिळाल्यामुळे हीना नॉमिनेशनमध्ये आली. याशिवाय इतर स्पर्धकांना समान गुण मिळाल्यामुळे फक्त हीनाचा या टास्कमध्ये नॉमिनेट झाली. तर त्या आठवड्यात आरोहला चावल्यामुळे शिवला नॉमिनेट केलं गेलं होतं. तिथेच कुठेतरी हीना या आठवड्याला जाणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. पण गेल्या आठवड्यात अभिजीत केळकर गेल्यामुळे हा अंदाज कधीही बदलू शकतो असं सुद्धा बोललं जात होतं. पण अखेर शिवला जास्त वोट्स मिळाल्याने हीनाचा खेळातला प्रवास थांबला. बिग बॉस मराठी सीजन 2 फिनाले पासून अवघा दोन आठवडे लांब असताना खेळातून रजा घ्यावी लागणं हे हीनासाठी नक्कीच दुर्दैवी आहे. पण या खेळाने या घराने हीनाला बरंच काही दिलंय. त्यामुळे इथून पुढे तिच्या करिअरचा प्रवास कसा रंगतो ते पहावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी घरात अजून एक आश्चर्यजनक एलिमिनेशन, हीना घरातून बाहेर Description: बिग बॉस मराठीचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली ती म्हणजे डान्सिंग क्विन हीना पांचाळ. हिनाने घरात एन्ट्री घेतल्यानंतर ती उत्तम खेळी खेळली पण गेल्या आठवड्यात ती नॉमिनेट झाली आणि मग एलिमिनेट.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO
मिलिंद नार्वेकरांशी फोनवरून चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी केले मोठे वक्तव्य 
मिलिंद नार्वेकरांशी फोनवरून चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी केले मोठे वक्तव्य 
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट
अरं अरं... खतरनाक... प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत
अरं अरं... खतरनाक... प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत
[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 
[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 
आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 
आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 
[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ 
[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ