बिग बॉस मराठी २ मध्ये अभिनेत्री सईला वाईल्ड कार्ड एन्ट्री? जाणून घ्या सत्य

मालिका-ए-रोज
Updated Jul 04, 2019 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sai Lokur not the wild card contestant: सई लोकूर बिग बॉस मराठी २च्या घरात पाहुणी म्हणून दाखल झाली खरी पण ती वाईल्ड कार्ड असल्याचं जाहीर होताना आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. यात किती तथ्य आहे हे पाहा...

Bigg Boss Marathi 2 is Sai Lokur the new wild card entry
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची स्पर्धक सई लोकूर या सीझनची वाईल्ड कार्ड एन्ट्री? जाणून घ्या सत्य 

मुंबई: बिग बॉस मराठी २ च्या घरात बीबी हॉटेल टास्क सुरु होताच घरात एन्ट्री झाली ती बिग बॉसच्या पहिल्या सीझनच्या लोकप्रिय स्पर्धक सई लोकून, पुष्कर जोग, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांची. हे सगळे पूर्व स्पर्धक या बीबी हॉटेलचे पाहुणे म्हणून आले आणि त्यांनी घरात असलेल्या स्पर्धकांची शाळा घ्यायला सुरुवात केली. नंतर घरातले स्पर्धक आणि घरा बाहेरुन आलेले हे पूर्व स्पर्धक आपआपलं टास्क खेळतना दिसले. पण अवघे दोन दिवस घरात रहायला आलेले हे स्पर्धक घरात कायमंच राहणार असतील तर? अशी काहीशी परिस्थिती आज घरात निर्माण होताना दिसेल जेव्हा सई लोकूर ही पाहुणी नसून घरातली दुसरी वाईल्ड कार्ड असल्याचं खुद्द बिग बॉस जाहीर करतील. पण यात किती तथ्य आहे चला बघूया.

घरात आज टास्कदरम्यान आलेल्या पूर्व स्पर्धकांमधून एक-एक जण घराबाहेर पडताना दिसेल. आधी स्मिता, मग शर्मिष्ठा आणि मग पुष्कर असं झाल्यानंतर पहिल्या सीझनच्या स्पर्धकांपैकी या बिग बॉस मराठी सीझन २च्या घरात सई एकटी मागे राहील. आणि मग बिग बॉस जाहीर करतील की सई ही पाहुणी नसून या सीझनची दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री आहे. यावर सगळेच स्पर्धक अवाक होतील पण खुश ही झालेले दिसतील, सई सुद्धा खुश होऊन बिग बॉसचे आभार मानताना दिसेल. पण यानंतर काय?, खरंच सई घरात राहणार आणि हे सीझन स्पर्धक म्हणून खेळणार का? तर याचं उत्तर आहे नाही. सई घरात पाहुणी म्हणून आली आहे आणि पाहुणी म्हणूनच ती घरात राहील.

ती वाईल्ड कार्ड स्पर्धक नसल्याची ठाम माहिती आम्ही आमच्या सूत्रांकडून मिळवली आहे. त्यामुळे घरातल्या स्पर्धकांना एक धक्का देण्यासाठी आणि प्रेक्षकांना सुद्धा थोडा ट्विस्ट अनुभवता यावा म्हणून हे निव्वळ मनोरंजनासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी हे जाहीर केलं जाणार आहे.

असंच काहीसं बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये ही घडलं होतं जेव्हा हर्षदा खानविलकरला घरात नवीन स्पर्धक म्हणून आणलं गेलं. पण आठवडाभर राहुन ती घरातून बाहेर आली होती. तसंच सईच्या बाबतीत होताना दिसेल, दोन दिवस सई घरात राहील, वाईल्ड कार्डची उत्सुकता ताणून धरेल, घरात थोडा ड्रामा निर्माण करेल आणि मग घरातून बाहेर जाईल. त्यामुळे सध्या सुरु असलेला बीबी हॉटेल टास्क अधिक रंजक होईल त्यात हा नवीन ट्विस्ट येईल आणि मग पुन्हा एक ट्विस्ट येत सई घराला पुन्हा एकदा राम राम म्हणताना दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ मध्ये अभिनेत्री सईला वाईल्ड कार्ड एन्ट्री? जाणून घ्या सत्य Description: Sai Lokur not the wild card contestant: सई लोकूर बिग बॉस मराठी २च्या घरात पाहुणी म्हणून दाखल झाली खरी पण ती वाईल्ड कार्ड असल्याचं जाहीर होताना आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. यात किती तथ्य आहे हे पाहा...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola