'साम, दाम, दंड, भेद'चा लागला बिग बॉस घरात नारा, पुन्हा एकदा शिव Vs पराग-नेहा

मालिका-ए-रोज
Updated Jun 20, 2019 | 17:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi it's Shiv Vs Parag-Neha again: बिग बॉस मराठी घरात सध्या एक डाव धोबी पछाड हे टास्क सुरु आहे. आणि टास्क म्हटलं की भांडण हे आलंच. पुन्हा एकदा शिव विरुद्ध पराग आणि नेहा असं चित्र तयार होणार आहे.

Bigg Boss Marathi 2 its shiv Vs Parag and Neha again
'साम, दाम, दंड, भेद'चा लागला बिग बॉस घरात नारा, पुन्हा एकदा शिव Vs पराग-नेहा 

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात सध्या एक डाव धोबी पछाड हे टास्क अगदी जोरदार सुरु आहे. टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम्स पडल्या असून दोन्ही टीम्स हे टास्क मनापासून खेळताना दिसत आहेत. पण घरात नवीन ग्रुप निर्माण झाल्याचा परिणाम टास्कच्या टीम्सच्या बांधणीवर दिसला आणि यंदा टीम ए नेहा, पराग, हिना, बिचुकले, सुरेखा आणि माधव अशी बनवली गेली तर टीम बीमध्ये किशोरी, वीणा, शिव, रुपाली, विद्याधर उर्फ बाप्पा आणि अभिजीत यांना एकत्र आणलं गेलं. तर घरची कॅप्टन वैशाली टास्कची संचालिका झाली. अता अशा टीम्स पडल्यामुळे घरात आधीच धुमसत असलेले काही वाद पुन्हा उकरुन आले नाहीत तरंच नवल.

तर टास्कमध्ये एका टप्प्यावर काहीच घडत नाहीये हे दिसल्यावर खुद्द बिग बॉस यांनी पराग आणि बाप्पा यांना कन्फेशन रुममध्ये बोलवून टास्क कसा खेळावा याची कल्पना दिली. शिवाय खेळात साम, दाम. दंड, भेद योग्य पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे असा इशारा सुद्धा दिला. हे होताच परागचं डोकं पुन्हा एकदा चालू लागलं आणि त्याने त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. यामुळे घरात बरेच गोंधळ निर्माण झाले आणि काही वादसुद्धा. यातच शिव आणि पराग-नेहाचं आधीच वाकडं आहे त्यात शिव आणि हे दोघं अपोझिट टीममध्ये आहेत. शिव यंदा नॉमिनेट झाला ते नेहासोबत केलेल्या शारीरिक बळाच्या वापरामुळे, आणि त्यासाठी परागने पण त्याला सुनवलं होतं आणि बहुमत दर्शवताना परागने मत दिलं होतं. हे सगळच शिवच्या मनात धुमसत असणारच. त्यामुळे खेळात ही खुन्नस निघताना दिसणार आहे.

 

 

टीम बी ने टीम एला २ कपडे देण्याचं वचन दिलं असताना मात्र खेळी खेळत आमचा मॅनेजर सुट्टीवर आहे असं सांगता टीम एचा पारा निश्चित चढणार आहे. यामुळे वीणा आणि परागमधये सुद्धा भांडण होताना दिसेल. त्यामुळेच बहुदा शिव आणि नेहामध्ये वाद सुरु होताना दिसेल, शिव मोठमोठ्याने साम, दाम,दंड, भेद हा नारा म्हणायला लागताना दिसेल. नेहा त्याच्याशी वाद घालत असतानाच तिचा टीम मेंबर असलेला परागसुद्धा यात सामिल होत शिवच्या आवाजाच्या वरचढ आवाज लावत हाच साम, दाम, दंड, भेदचा नारा म्हणताना दिसेल. दोघंही यात माघार घेणार नाहीत आणि बराच वेळ हा नारेबाजीचा खेळ रंगेल असं दिसतंय. त्यातच हे तिघंही हा वाद इतक्या सहजासहजी संपवतील असं वाटत नाही. त्यामुळे आता या वादाचा परिणाम टास्कवर होणार का आणि झालाच तर टास्कचं पुढे काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'साम, दाम, दंड, भेद'चा लागला बिग बॉस घरात नारा, पुन्हा एकदा शिव Vs पराग-नेहा Description: Bigg Boss Marathi it's Shiv Vs Parag-Neha again: बिग बॉस मराठी घरात सध्या एक डाव धोबी पछाड हे टास्क सुरु आहे. आणि टास्क म्हटलं की भांडण हे आलंच. पुन्हा एकदा शिव विरुद्ध पराग आणि नेहा असं चित्र तयार होणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles