बिग बॉस मराठी २ घरात आज किशोरी आणि वीणामध्ये होणार जोरदार भांडण

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 16:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Veena-Kishori’s fight: बिग बॉस मराठी २चा सगळ्यात पहिला ग्रुप केव्हीआरमध्ये फूट पडली आहे त्यामुळे यांच्यात सतत वाद दोताना दिसतात. पण आज मात्र कधी नाही ते किशोरी वीणाला खडसावताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 2 Kishori and Veena to end up in a big fight today in the house
बिग बॉस मराठी २ घरात आज किशोरी आणि वीणामध्ये होणार जोरदार भांडण 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी घरात आज किशोरी आणि वीणामध्ये रंगणार वाद
  • अखेर किशोरी यांचा संयम सुटणार आणि वाढणार आवाज
  • वीणाच्या उद्धट वागण्यामुळे उडणार वादाची ठिणगी

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या पहिल्या दिवसापासून घरात कोणाचं बॉडिंग घट्ट होतं तर ते होतं घरातला सगळ्यात पहिला बनलेल्या केव्हीआर ग्रुपचं म्हणजेच किशोरी शहाणे, वीणा जगताप आणि रुपाली भोसलेमध्ये. पुढे त्यांना पराग कान्हेरे जॉईन झाला आणि ते चौघं सुद्धा उत्तम खेळत होते. पण मग पराग घरातून गेला आणि हा ग्रुप कुठेतरी कोलमडलाच. त्यांच्यातली एकी हळू-हळू कमी होताना दिसली. आता तर गेल्या काही दिवसात ती संपलीच आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यात ही या सगळ्याला वीणाचा उद्धटपणा आणि अॅटिट्यूड कारणीभूत आहे हे पण तितकंच खरं आहे. आज तर या ग्रुपमध्ये आलेली फूट अगदी स्पष्टपणे दिसणार आहे कारण कधी नव्हे ते किशोरी यांचा आवाज वाढताना दिसेल.

किशोरी आल्यापासून तशा शांतपणे खेळत आहेत. त्यांचे अनेकांशी मतभेद झाले पण त्यांनी त्यांची मर्यादा पाळून ती भांडणं केली. आज मात्र त्यांचा पारा चढताना दिसेल. घरात डायनिंग टेबलवर सगळे स्पर्धक बसले असता त्यांच्यात काहीतरी चर्चा होताना आज दिसेल. तेव्हाच हा वाद उकरुन निघणार आहे. वीणा या दरम्यान सतत किशोरी यांना “तू थांब…” असं म्हणून टोकण्याचा किशोरी यांना राग येईल आणि तिचं हे बोलणं खटकलेल्या किशोरी तिला तिचा प्रॉब्लेम काय आहे असं विचारताना दिसतील. इथे वादाची ठिणगी उडेल. विकेंडच्या डावात होस्ट महेश मांजरेकरांनी वीणाला सांगितलं होतं की स्पष्टवक्तेपणा आणि रुड म्हणजे उद्धटपणामध्ये एक पुसटची रेघ असते आणि ती सध्या उद्धपणाकडे जास्त कल देत आहे. तसंच काहीसं किशोरी यांना आज वाटेल आणि त्या वीणाला म्हणतील, “स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा वेगळा असतो वीणा… मी शांत बसते याचा अर्थ असा नाही तू मला काहीपण बोलशील... तू अजिबात माझ्याशी बोलू नकोस.”

त्यावर वीणा पुन्हा एकदा उद्धटपणे त्यांना उत्तर देताना दिसेल आणि म्हणेल, “मला पण नाहीच बोलायचे आहे तुझ्याशी.” तिचं हे वाक्य ऐकून किशोरी या तिला विचारतील, “माझं, रुपाली आणि तिसऱ्याचं बोलण सुरु असताना तू मध्ये का पडतेस ?  ग्रुप-ग्रुप करून सुरूच आहे तुझा सततचा उद्धटपणा. आता नाहीये आपला ग्रुप त्यामुळे तू नकोना बोलूस माझ्याशी... तुझं सकाळपासून किती वेळा बोलून झालं आहे “तू नको बोलू” सगळे बघत आहेत वीणा...”

 

हे ऐकताच त्यावर वीणाचं म्हणणं असेल, “बघू देत...त्यांना पण माहिती आहे काय खरं आहे.” वीणाचा लागलेला सूर बघत त्यावर किशोरी तिला कडक शब्दात सांगिताना दिसतील, “ तुला काही हक्क नाही मला तू बोलू नकोस हे म्हणण्याचा.” यावर आता पुढे वीणा काय उत्तर देते आणि त्यावर किशोरी या पुढे हा वाद थांबतात की या वादाचं स्वरुप टोक गाठतं ते आजच्या भागात कळेलंच. पण जिथे किशोरी यांना आई म्हणत वीणाने या नात्याची सुरुवात केली होती तिथे आज खेळासाठी त्यांना अशा सुरात आणि शब्दात बोलणं कितपत योग्य आहे खरंच कळत नाहीये. या विकेंडच्या डावात होस्ट महेश मांजरेकर यावर काही बोलतील का ते पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ घरात आज किशोरी आणि वीणामध्ये होणार जोरदार भांडण Description: Bigg Boss Marathi 2 Veena-Kishori’s fight: बिग बॉस मराठी २चा सगळ्यात पहिला ग्रुप केव्हीआरमध्ये फूट पडली आहे त्यामुळे यांच्यात सतत वाद दोताना दिसतात. पण आज मात्र कधी नाही ते किशोरी वीणाला खडसावताना दिसणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles