VIDEO: आणि बिग बॉसच्या घरात रुपालीला रडू कोसळलं

मालिका-ए-रोज
Updated Jun 18, 2019 | 16:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Rupali breaks down: बिग बॉस घरात काल धक्कादायक वळण आलं जेव्हा केव्हीआरपी ग्रुप परागने सोडला आणि त्याने नवा ग्रुप तयार केला. आता हे होण्यापासून रोखण्यासाठी रुपाली-किशोरी परागची मनधरणी करतायत.

Bigg Boss Marathi 2 Kishori-Rupali request Parag to not leave the group
VIDEO: आणि बिग बॉसच्या घरात रुपालीला रडू कोसळलं  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठीचं घर आहेच असं की ज्यात कधी काय होईल सांगता येत नाही. घरात प्रत्येक क्षणाला डाव बदलत असतो आणि त्याप्रमाणे घरात विविध गोष्टी घडताना दिसतात. काल घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये शिव आणि परागमध्ये झालेला वाद बराच रंगला आणि त्याचे पडसाद केव्हीआरपी या ग्रुपच्या बॉण्डिंगवर होताना दिसले. घरात नवीन कॅप्टन तर बनलाच पण त्याचसोबत एक नवीन ग्रुप बनताना ही दिसला. हा ग्रुप होता परागने बनवलेला नवीन ग्रुप. शिवमुळे केव्हीआरपी या सगळ्यात स्ट्राँग ग्रुपवर वेगळं होण्याची वेळ आली आणि ह्यासाठी कुठेतरी वीणा पण जबाबदार होतीच. परागने अखेर मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि नेहाला सामिल होत नवीन ग्रुप बनवण्याच्या निर्णयावर ठाम झाला. हे सगळं होताना परागला अश्रू अनावर झाले होते, तो फारच भावूक झाला. हा निर्णय अखेर त्यांनी आधीचा ग्रुपमधल्या किशोरी आणि रुपालीला सांगितला.

किशोरी आणि रुपालीला हा निर्णय सांगताना परागला खूप जड गेलं पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता असं त्याने म्हटलं. त्यावेळेला तर रुपाली आणि किशोरी यांनी ते ऐकून घेतलं पण त्यांना धक्का बसला होता हे निश्चित. त्यामुळे आज रुपाली, पराग आणि किशोरी पुन्हा एकदा गार्डनमध्ये रात्री बसलेले दिसणार आहेत. त्यांच्या जुन्या सवयी प्रमाणे... पण ही बैठक त्यांची नेहमीची गप्पा-प्लॅनिंग करण्याची बैठक नसून परागची मनधरणी करण्यासाठी असणार आहे.

किशोरी-रुपाली दोघीही परागला हा नवीन ग्रुप बनवण्यासाठी परावृत्त करताना दिसतील. तर हे सांगताना रुपालीला रडू कोसळणार आहे. कुठेतरी रुपाली-पराग या दोघांना मस्करीत चिडवत असले तरीही दोघांमध्ये मैत्रीचं घट्ट नातं निर्माण झालं होतं. त्यात मध्येच परागच्या या निर्णयाने रुपाली फारच खचलेली दिसली. खेळातलं त्यांचं बॉण्डिंग ही आता फिसकटणार म्हंटल्यावर तिला ते सहन झालं नाही आणि तिच्या भावना डोळ्यातून बोलत्या झाल्या.

किशोरी यांनी पण परागला या वेळी असं करु नकोस, परत ये असं सांगितलं पण परागने मन पक्कं केलं आहे असं दिसतंय. आतापर्यंत मी ज्या लोकांच्या विरोधात होतो ज्यांना घरातून एक-एक करुन बाहेर काढायचा माझा प्लॅन होता त्यांच्यासोबतंच मी आता खेळणार आहे असं तो सांगताना दिसतो. पण मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार आहे हे पण तो या वेळी नमूद करतो. किशोरी आणि रुपाली परागशी बरीच चर्चा करताना दिसतात आणि त्याचं मन वळवण्याचे सगळे प्रयत्न करताना सुद्धा. पण यातून कितपत फायदा होईल आणि पराग खरंच त्यांचं ऐकत या नवीन ग्रुपकडे जाणं टाळेल का ते कळेल लवकरच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: आणि बिग बॉसच्या घरात रुपालीला रडू कोसळलं Description: Bigg Boss Marathi Rupali breaks down: बिग बॉस घरात काल धक्कादायक वळण आलं जेव्हा केव्हीआरपी ग्रुप परागने सोडला आणि त्याने नवा ग्रुप तयार केला. आता हे होण्यापासून रोखण्यासाठी रुपाली-किशोरी परागची मनधरणी करतायत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola