Bigg Boss Marathi 2: घरात मेघा धाडेचा पुन्हा जलवा सोबतीला रेशम-सुशांत आणि जोरदार टास्क

मालिका-ए-रोज
Updated Aug 15, 2019 | 10:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस मराठीच्या घरात नुकतच एक खास सरप्राईज स्पर्धकांना मिळालं, जेव्हा घरात मेघा धाडेसोबत रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार दाखल झाले. हे फक्त पाहुणे नसून या पाहुण्यांनी नंतर साप्ताहिक टास्कमध्ये पण भाग घेतला.

bigg boss marathi 2 megha dhade sushant shelar and resham tipnis enter as guests are a part of task too
Bigg Boss Marathi 2: घरात मेघा धाडेचा पुन्हा जलवा सोबतीला रेशम-सुशांत आणि जोरदार टास्क 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठीच्या घरात पूर्व स्पर्धक मेघा धाडे, रेशम टिपणीस आणि सुशांत शेलारची एन्ट्री
  • आलेले पाहुणे झाले साप्ताहिक टास्कचा महत्त्वाचा भाग
  • बिचुकले आणि वीणामध्ये पाहुण्यांसमोरंच मोठा राडा

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरात नवीन एपिसोड सुरू झाला तोच एका मोठ्या सरप्राईजनं. अचानक घरात पहिल्या सीझनचं गाणं वाजायला लागलं आणि घरात एन्ट्री झाली ते पहिल्या सीझनचे स्पर्धक सुशांत शेलार, रेशम टिपणीस आणि खुद्द पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडेची. घरात आलेले हे पाहुणे फक्त पाहुणे म्हणून आले नव्हते तर होणाऱ्या साप्ताहिक टास्कचा भाग सुद्धा असणार होते. काही वेळानं या आठवड्याचा साप्ताहिक टास्क 'जुना गडी नवं राज्य' जाहीर झाला. घरात आलेले पूर्व स्पर्धक मेघा, रेशम आणि सुशांत या टास्कचे राजा आणि राणी झाले. तर इतर स्पर्धक झाले राज्यातील रहिवाशी. रेशमची टीम झाली नेहा आणि शिव, तर मेघाची टीम होती शिवानी आणि आरोह आणि सुशांतच्या टीमध्ये होते वीणा आणि हीना, त्याचसोबत किशोरी झाल्या टास्कच्या संचालिका. प्रत्येक बझरनंतर बिग बॉसच्या घराचा एका भागासाठी सामना रंगणार होता. जी टीम सर्वाधिक भाग मिळवण्यात आणि आपल्या राजा किंवा राणीचा झेंडा रोवण्यात यशस्वी होतील ती टीम हा टास्क जिंकेल असं जाहीर झालं.

पहिल्या बझरनंतर बाथरूम एरिया जिंकण्यासाठी लढत रंगली. ज्यामध्ये मेघा आणि रेशमची टीम आमने सामने आल्या. ज्या टीमचा बाथटब राऊंडअंती जास्त स्वच्छ असेल ती टीम या राऊंडची विजेती असेल असा नियम होता. बझर वाजताच दोन्ही टीम जोरदार खेळ खेळताना दिसल्या. समोरच्या टीमचं बाथटब खराब करतानाच आपला बाथटब साफ करायचा सुद्धा होता. असं होत अखेर राऊंड संपल्याचा बझर झाला. पहिल्या राऊंडनंतर टीम मेघाचा बाथटब जास्त साफ असल्यानं तिची टीम विजेती ठरली आणि बाथरूम एरिया त्यांनी जिंकला.

 

टास्क संपताच मात्र टीम सुशांतमधल्या हीना आणि वीणाने युक्ती लढवत मेघाचा असलेल्या बेडरूम एरियावर कब्जा मिळवला. त्यावर थोडेफार मतभेद निर्माण झाले पण नंतर त्यावर तोडगा सुद्धा मिळाला. अखेर बिग बॉस यांनी टास्कचा पहिला दिवसाचा अवधी संपल्याची घोषणा केली. त्याचसोबत दिवे बंद झाल्यावर संपूर्ण घर तर सगळ्यांच्या वापरासाठी मोकळं असेल हे जाहीर तर केलं पण त्याचसोबत दुसऱ्या दिवशी गाणं वाजताच सगळा परिसर पुन्हा प्रत्येकाच्या ताब्यात जाईल असं सुद्धा नमुद केलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

पाहुणे आल्याने आणि ते टास्कचा भाग असल्यानं तशी टास्कमध्ये भांडणं अजिबात झाली नाहीत. पण अखेर दिवस संपता-संपता बिचुकलेनं मात्र घरात राडा घातलाच. वीणा त्याला काहीतरी बोलली ज्याचा त्याला प्रचंड राग आला आणि तो वीणावर डाफरताना दिसला. त्यावर आलेल्या पाहुण्यांनी आणि घरातल्या स्पर्धकांनी त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो वीणाला सॉरी म्हणताना सुद्धा दिसला. हे झाल्यानंतर नेहा आणि शिव दुसऱ्या दिवसासाठी प्लॅन आखताना दिसले. त्या प्लॅनच्या मध्येच आरोहने आपली एक स्ट्रॅटर्जी आखली जी कोणाला आवडली नाही आणि त्यामुळे सगळ्यांनी किशोरीला सांगून त्याला डिसक्वालिफाय करायला सांगितलं. अखेर किशोरी यांनी त्याला डिसक्वालिफाय केलं. आता पुढे काय होणार ते पुढच्या भागात स्पष्ट होईल. त्याचशिवाय खेळ अधिक रंजकही होईल हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Bigg Boss Marathi 2: घरात मेघा धाडेचा पुन्हा जलवा सोबतीला रेशम-सुशांत आणि जोरदार टास्क Description: बिग बॉस मराठीच्या घरात नुकतच एक खास सरप्राईज स्पर्धकांना मिळालं, जेव्हा घरात मेघा धाडेसोबत रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार दाखल झाले. हे फक्त पाहुणे नसून या पाहुण्यांनी नंतर साप्ताहिक टास्कमध्ये पण भाग घेतला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...