बिग बॉस मराठी २ मध्ये 'असा' रंगला मर्डर मिस्ट्रीचा टास्कचा अंतिम टप्पा, अभिजीत परतला तर हिना...

मालिका-ए-रोज
Updated Jul 20, 2019 | 10:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस मराठी घरात मर्डर मिस्ट्री हा टास्क तुफान सुरु असताना त्याचा अंतिम टप्पा आला आणि त्याचसोबत घरात बरेच वादही रंगले. खासकरुन हिनाला टार्गेट केलं गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. तर अभिजीत घरात परताना दिसला.

Bigg Boss Marathi 2 Murder mystery reaches final stage and Abhijeet returns in the house today
बिग बॉस मराठी २चा मर्डर मिस्ट्री टास्कचा अंतिम टप्पा रंगला,अभिजीत घरात परतला, तर हिना झाली टार्गेट 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठीच्या घरातील मर्डर मिस्ट्री टास्क अंतिम टप्पा
  • अभिजीत केळकर अखेर घरात परतला
  • माधव-नेहा-शिवानी-रुपाली ग्रुप हिनाच्या विरोधात

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात मर्डर मिस्ट्री हा टास्क ऐन रंगात आला असतानाच घरात नवीन खुनी निवडला गेला आणि ती होती नेहा शितोळे. तर घरात नवीन एपिसोडची सुरुवात झाली तिच भांडण आणि वादांनी. घरात एकेकाळ मैत्री असलेला ग्रुप माधव देवचक्के, नेहा आणि हिना पांचाळ यांच्यात सतत वाद होताना दिसत आहेत आणि हेच वाद अधिक वाईट झालेले दिसले. नेहा, माधव, रुपाली आणि शिवानी हे सगळे हिनाच्या विरोधात गेले आहेत आणि ते तिला टार्गेट करताना दिसले. हिनाने रागात येऊन नेहाचं पत्र लपवलं होतं त्यामुळे आता तिचा सूड घ्यायचा म्हणून हे चौघं तिच्या वस्तू लपवताना दिसले आणि त्यातून ही अनेक वाद घरात रंगले.

अशातच घरात टास्क सुरु झाल्याचा बझर वाजला आणि पहिली सुपारी दिली गेली ती वीणाच्या खुनाची. ज्यासाठी अभिजीतने नेहाला निवडलं. वीणा आणि शिवला एकत्र डान्स करायला लावून वीणाचा खून करण्यास सांगितलं गेलं. नेहाने फार चतुराईने ते निभावून नेलं आणि वीणाचा खून झाल्याचं घरात जाहीर झालं. वीणाला आपला खून कसा झाला असा अंदाज येताच ती शिववर चिडलेली दिसली. यानंतर लगेच घरात पुन्हा एकदा बझर वाजला आणि घरात पुढच्या खुनाची वेळ झाली असं जाहीर झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

या बझरला हिनाच्या खुनाची सुपारी दिली गेली आणि अभिजीतने शिवानीला त्यासाठी निवडलं. हिनाच्या अंगावर पाणी टाकून तिचा खून करायचा होता जे शिवानीने केलं. पण त्यातून हिना आणि शिवानीमध्ये वाद निर्माण झाला. अखेर हिनाचा खून झाल्याची घोषणा झाली आणि तसंच घरातला पाचवा खून पार पडला असं सुद्धा स्पष्ट झालं. पुढे घरात दोनंच नागरिक खून व्हायचे बाकी होते तर अभिजीतला बिग बॉस यांनी सांगितलं की, या दोघांपैकी एकाचा खून होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे अभिजीतने नेहाला रुपालीचा तर शिवानीला माधवचा खून करण्यास सांगितलं. माधवच्या पाटीवर काळं फासून शिवानीने नेहाच्या आधी माधवचा खून केला आणि घरातला सहावा खून झाल्याचं जाहीर झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

टास्क संपलं असल्याचं यातून स्पष्ट झालं आणि त्याचप्रमाणे अभिजीतचा सिक्रेट रुममध्ये राहण्याचा काळ ही संपला असं बिग बॉस यांनी सांगितलं. अभिजीतला अडगळीच्या खोलीत पाठवलं गेलं आणि त्याने तिथून टाहो फोडला की त्याला तिथून बाहेर काढावं. रुपालीला शिव, वैशाली आणि वीणाने विनंती करुनही अडगळीच्या खोलीची चावी देण्यास नकार दिला. यावरुन एक नवा वाद घरात झाला. सगळ्यांनी सांगून आणि बिग बॉस यांनी घरात टास्क संपल्याचं जाहीर होऊनही रुपाली चावी द्यायला तयार नव्हती. अखेर अडगळीच्या खोलीचं दार उघडून अभिजीतला बाहेर काढलं गेलं. अभिजीत घरात येताच टास्कच्या गंमती-जंमती घरात रंगताना दिसल्या. तर थोड्या वेळात घरात हिना आणि शिवानी-नेहामध्ये पुन्हा मोठा वाद होताना दिसला. हा वाद संपतो ना संपतो किचनमध्ये हिनासोबत नेहा आणि रुपालीचा नवीन वाद सुरु झाला. एकंदरीत हिनाला टार्गेट केलं जातंय हे अगदी सहज दिसत होतं. तर काही वेळात घरात कब्बडीचा एक धमाल मुकाबला रंगला आणि या नोटवर अजून एक दिवस या बिग बॉस घरात संपला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ मध्ये 'असा' रंगला मर्डर मिस्ट्रीचा टास्कचा अंतिम टप्पा, अभिजीत परतला तर हिना... Description: बिग बॉस मराठी घरात मर्डर मिस्ट्री हा टास्क तुफान सुरु असताना त्याचा अंतिम टप्पा आला आणि त्याचसोबत घरात बरेच वादही रंगले. खासकरुन हिनाला टार्गेट केलं गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. तर अभिजीत घरात परताना दिसला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स