बिग बॉस मराठी २चा या आठवड्याचा कॅप्टन जाहीर, केव्हीआरपी ग्रुप समोर नव्या ग्रुपचं आव्हान

मालिका-ए-रोज
Updated Jun 25, 2019 | 08:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi New group forms: बिग बॉस मराठीच्या घरात नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी चुरस रंगली आणि या आठड्याचा कॅप्टन जाहीर झाला. त्याचसोबत घरात एक नवीन ग्रुपसुद्धा तयार होताना दिसला.

Bigg Boss Marathi 2 New captain announced in the house
बिग बॉस मराठी २चा या आठवड्याचा कॅप्टन जाहीर तसंच घरात केव्हीआरपी ग्रुप समोर नव्या ग्रुपचं आव्हान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच विकेन्डच्या डाव नंतरचा परिणाम घरात होताना दिसला. जिथे काही स्पर्धक विद्याधर उर्फ बाप्पा जोशी गेल्याने दुखावलेले दिसले तिथे केव्हीआरपी ग्रुप सगळे हेवेदावे विसरत पुन्हा एकदा एकत्र येताना दिसला. यासोबतच बिग बॉसच्या घरातील एक दिवस संपला आणि 'आ देखे जरा..' या गाण्यावर नव्या दिवसाची सुरुवात झाली. या गाण्यानेच घरात एकंदरीत कॅप्टन्सी टास्कची नांदी झाली होती असंच म्हणावं लागेल. मग घरात छान निवांत क्षण, धमाल मस्ती बघायला मिळाली. त्यात बिग बॉसच्या घरातल्या किचनची जबाबदारी पुरुषांनी स्विकारली होती आणि त्यामुळे सुरेखा पुणेकर याबद्दल सगळ्या पुरुषांना स्वावलंबनचा सल्ला देताना दिसल्या. लगेचंच या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क मनोरा विजयाचा हा जाहीर केला गेला.

या टास्क अंतर्गत प्रत्येक स्पर्धकाला दोन्ही कॅप्टन्सीच्या उमेदवारांचे फोटो असलेले ठोकळे देण्यात आले होते. सर्वात जास्त ठोकळे मिळवून सर्वाधिक समर्थन मिळवत सगळ्यात मोठा मनोरा तयार करणारा उमेदवार हा टास्क जिंकणार असं जाहीर केलं गेलं. हे जाहीर होताच दोन्ही उमेदवार किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे आपआपलं प्लॅनिंग करत स्पर्धकांना त्यांना समर्थन देण्यासाठी पटवताना दिसले.

आणि थोडया वेळात टास्क सुरु होण्यासाठा बझर वाजला. दोन्ही उमेदवार शिव आणि किशोरी जोमाने ठोकळे लावत आपला मनोरा रचायला सुरुवात करताच त्यांच्या समर्थकांनी बॉल मारुन एकमेकांचे मनोरे पाडायला सुरुवात केली. टास्क म्हटल्यावर वाद आणि भांडणं ही आलीच. तेच होताना दिसलं आणि अनेक छोटे मोठे वाद या टास्कमध्ये पण निर्माण झाले. अखेर टास्क संपला असं जाहीर झालं आणि शिवचा मनोरा किशोरी यांच्यापेक्षा मोठा होता. त्यामुळे शिवला विजेता म्हणून जाहीर केलं गेलं. अशा पद्धतीने शिव दुसऱ्यांदा कॅप्टन झाला.

यानंतर घरात एक नवीन ग्रुप बनताना दिसला आणि त्यात माधव, अभिजीत, वैशाली, हिना, नेहा, सुरेखा आणि शिव एकत्र येताना दिसले. टास्कनंतर आनंद साजरा करताना शिव वीणाला उचलून कॅप्टन रुममध्ये नेताना दिसला तसंच त्याने हिनासोबत करावं असं त्याच्या नवीन ग्रुपचं म्हणणं होतं. यानंतर जे झालं त्याबद्दल पुन्हा एकदा शिव आणि वीणामध्ये एक छोटं भांडण झालं. वीणाला हे फार मनाला लागलं आणि ती रडताना सुद्धा दिसली. हे सगळं पार पडताच घरात रात्री दोन्ही ग्रुप एकत्र बसून टास्कबद्दल बोलताना दिसले आणि टास्कबद्दल पुन्हा एक चर्चा होत अजून एक दिवस बिग बॉस मराठी घरात संपताना दिसला. आता घरात केव्हीआरपी हा ग्रुप पुन्हा एकदा एकत्र आला असला तरी एक नवीन ग्रुप घरात निर्माण झाला आहे त्यामुळे या नवीन ग्रुपचा केव्हीआरपी ग्रुपवर आणि त्यांच्या खेळावर काय परिणाम होतो ते पाहणं रंजक ठरणार आहे हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २चा या आठवड्याचा कॅप्टन जाहीर, केव्हीआरपी ग्रुप समोर नव्या ग्रुपचं आव्हान Description: Bigg Boss Marathi New group forms: बिग बॉस मराठीच्या घरात नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी चुरस रंगली आणि या आठड्याचा कॅप्टन जाहीर झाला. त्याचसोबत घरात एक नवीन ग्रुपसुद्धा तयार होताना दिसला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles