Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात आज बिचुकले-नेहाचा मोठा वाद, पाहा कसा असेल आजचा एपिसोड

मालिका-ए-रोज
Updated Aug 12, 2019 | 18:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस मराठीच्या घरात नवीन आठवड्याची सुरुवात होते ते कॅप्टन्सी टास्कपासून. तसंच आज होईल पण त्याचसोबत घरात आज एक मोठा वाद रंगताना दिसणार आहे. हा वाद असेल नेहा आणि बिचुकलेमध्ये. वाचा सविस्तर आणि जाणून घ्या.

bigg boss marathi 2 new captaincy task to begin while neha and bichukale end up in a fight 
Bigg Boss Marathi 2: बिग बॉस घरात आज कॅप्टन्सीसाठी निवड रंगणार तर बिचुकले-नेहाचा मोठा वाद 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी घरात आज कॅप्टन्सी उमेदवारांची निवड होणार
  • नेहा-बिचुकलेमध्ये रंगणार टोकाचा वाद
  • "मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही...”- अभिजीत बिचुकले

मुंबई: बिग बॉस मराठीचा विकेंडचा डाव नुकताच पार पडला आणि अभिजीत केळकरला घराचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर आज बिग बॉस घरात १२वा आठवडा सुरु होणार आहे. त्यामुळे आता खेळ अधिक कठीण त्याचसोबत रंजक ही होताना दिसेल. आज घरात नवीन आठवडा सुरु होणार म्हणजे घरात नवीन कॅप्टनची निवड सुद्धा होणार हे नक्की. त्यासाठी आज घरात एक अनोखा टास्क रंगताना दिसेल. सगळ्या स्पर्धकांना एकत्र येत कॅप्टन्सीचे उमेदवार निवडायचे असणार आहेत. त्यासाठी घरात आज काय नवीन ड्रामा रंगणार ते पाहुयात.

तर कॅप्टन्सी उमेदवारांसाठी आज स्पर्धकांना निवड करताना अनेक गोष्टींचा विचार करायचा असणार आहे. घराचा कॅप्टन म्हणजे संपूर्ण घराची जबाबदारी घेणे. तर ही पात्रता एखाद्या उमेदवारामध्ये असणं गरजेचं आहे असा नियम असेल. त्याचसोबत त्याची क्षमता आहे का घराची कॅप्टन्सी निभावून नेण्याची आणि खेळातील आजवरचा प्रभाव सुद्धा विचारात घेतला जाणार हे नक्की. या सगळ्याचा विचार करत जसे उमेदवार निवडायचे असतील तसंच पात्र नसलेल्या स्पर्धकाला या रेसमधून बाहेर सुद्धा काढायचं असेल. त्यामुळे नेमका हा टास्क कसा रंगतो आणि कोण ही बाजी मारतं ते आजच्य भागात स्पष्ट होणार आहे.

या सोबतच घरात एक मोठा वाद सुद्धा होताना दिसणार आहे. हा वाद होणार आहे अभिजीत बिचुकले आणि नेहा शितोळे यांच्यामध्ये. गेले अनेक दिवस या दोघांमध्ये एक कोल्ड वॉर सुरु आहेच. खरंतर खेळाच्या अगदी सुरुवातीपासूनच या दोघांचं काही केल्या पटत नाहीये. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात खटके उडताना दिसले आणि आज असंच होत एक खूप मोठा वाद निर्माण होणार आहे. नेहा काहीतरी कारणावरुन बिचुकले ज्यांना आईचा दर्जा देतात अशा व्यक्तीला उलट बोलतात असं सुनावताना दिसेल. त्यावर बिचुकले खूप चिडेल आणि ती तिसरी व्यक्ती आता खेळात पण नाही तरी हा विषय काढण्यात काही पॉईंट नाही असं बिचुकले बोलताना दिसेल. यावर या दोघांमधला हा वाद बराच चिघळेल.

एका टोकाला हा वाद बराच गाजत असताना नेहा त्यांच्यावर आवाज चढवून ओरडताना दिसेल. नंतर तर नेहा त्याला गप्प बसायला सांगेल. हे ऐकून बिचुकले “मी गप्प वगैरे नाही बसत... मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही...” हे बोलत नेहावर उलटा डाफरताना दिसले. असं होत हा वाद बराच रंगेल. नेहा आणि बिचुकले यांचा वाद होणार म्हणजे घरात इतर स्पर्धक सुद्धा त्यावर काहीतरी टिप्पणी देताना दिसतीलंच. आता या वादात निघालेला नेमका विषय आणि या वादाचा शेवट काय होतो ते आजच्या भागात पहावं लागणार आहे. पण एकंदरीत आज घरात बऱ्याच गोष्टी घडताना दिसतली हे नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात आज बिचुकले-नेहाचा मोठा वाद, पाहा कसा असेल आजचा एपिसोड Description: बिग बॉस मराठीच्या घरात नवीन आठवड्याची सुरुवात होते ते कॅप्टन्सी टास्कपासून. तसंच आज होईल पण त्याचसोबत घरात आज एक मोठा वाद रंगताना दिसणार आहे. हा वाद असेल नेहा आणि बिचुकलेमध्ये. वाचा सविस्तर आणि जाणून घ्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली