बिग बॉस मध्ये काय झालं असं की घरातल्याना मिळाली ही शिक्षा आणि किचनमधले लक्झरी पदार्थ काढून घेतले

मालिका-ए-रोज
Updated Jul 09, 2019 | 09:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 new punishment: बिग बॉस मराठी २चा खेळ रंजक होत चालला आहे. नुकताच घरात नवीन ड्रामा निर्माण झाला आणि बिग बॉस यांनी स्पर्धकांना मोठी शिक्षा दिली. किचनमधील लक्झरी पदार्थ काढून घेतले गेले आहेत.

Bigg Boss Marathi 2 new drama and new punishment for housemates and captaincy candidates Rupali and Abhijeet
बिग बॉस मराठी गरात काय झालं असं की घरातल्याना मिळाली ही शिक्षा आणि किचनमधले लक्झरी पदार्थ काढून घेतले 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी २च्या घरात नवीन राडा
  • बिग बॉस यांनी दिली स्पर्धकांना मोठी शिक्षा, लक्झरी पदार्थ काढून घेतले
  • अखेर केव्हीआर ग्रुपमध्ये पडली फूट

मुंबई: बिग बॉस मराठी २चा नुकताच पार पडलेला एपिसोड सुरु झाला तोच विकेंडचा वारचा परिणाम दिसत. यंदाच्या विकेंडच्या वारमध्ये एकच फाईट वातावरण ताईट हा टास्क रंगला आणि त्यात रुपाली भोसले आणि वीणा जगतापने किशोरी शहाणे यांचा फोटो लावला आणि त्यांना बरंच बोलल्या सुद्धा. त्यावरुन घरात सगळ्यात पहिला बनलेला ग्रुप केव्हीआरमध्ये पडलेली फूट लक्षात आली. तिघींचं बॉडिंग बदल्याचं सुद्धा स्पष्ट झालं. या नोटवर एक दिवस संपला आणि त्याच नोटवर नवीन दिवस घरात सुरु झाला. पुन्हा तोच विषय घरात जिथे तिथे रंगताना दिसला.

आपला ग्रुप तुटला आहे आणि आपला आधी सारखं महत्त्व राहिलं नाही असं लक्षात आलेल्या किशोरी या घरात इतरांशी बोलताना दिसल्या. किशोरी यांना ही गोष्ट फारंच मनाला लागली होती आणि म्हणूनंच त्या घरात प्रत्येकाशी संवाद साधताना दिसल्या. या सगळ्यात अभिजीत, शिव, वैशाली आणि वीणा एकत्र बसून नॉमिनेशनची चर्चा करताना दिसले, त्यावर बिग बॉस यांनी त्यांना ते करण्यापासून थांबवत त्यांना सक्त ताकीद दिली.

 

 

 

 

बिबि हॉटेल टास्क उत्तम पार पडल्यामुळे बिग बॉस यांनी कॅप्टन्सीसाठी दोन्ही टीम्सला संधी दिली आणि दोन्ही टीममधून एक-एक स्पर्धकाचं नाव कॅप्टन्सी उमेदवारसाठी जाहीर करावं असं सांगीतलं. टीम एमधून रुपालीचं नाव दिलं गेलं तर टीम बीमधून अभिजीतचं नाव दिलं गेलं. हे सगळं सुरु असताना अनेक नियम घरात मोडले जात होते आणि त्यावर सतत बिग बॉस स्पर्धकांना त्याची जाणीव करुन देत होते. या सगळ्यात हिनाची सुद्धा एक चूक झाली आणि ती माईक न घालता बोलत होती त्यामुळे बिग बॉस यांनी तिला हटकलं. हे ती वैशालीला किचनमध्ये सांगायला आली जिथे शिवसुद्धा होता. शिवने हिनाची मस्करी केली आणि त्यावरुन शिव आणि हिनामध्ये वाद झाला. पुढे घरात होणाऱ्या चुका सुरुच राहिल्या आणि त्यावरच्या सुचना सतत घरात होताना दिसल्या. घरात हे सगळं सुरु असतानाच किशोरी यांचं वेगळं दुःख त्या सतत मांडताना दिसल्या. त्यांना होणारा त्रास सतत घरात दिसत होता.

 

 

 

 

 

 

अचानकंच घरातल्या सगळ्या स्पर्धकांना बिग बॉस यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमायला सांगितलं. उरलेले ९ स्पर्धक घरातले टॉप नऊ स्पर्धक झाले असते पण त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याने बिग बॉस यांनी घरातल्याना शिक्षा सुनावली. घरातले खाण्याचे अत्यावश्यक पदार्थ सोडून घरातले सगळे लक्झरी पदार्थ घरातून बाहेर नेले गेले. एवढच काय तर स्पर्धकांकडे असलेली चॉकलेट्स सुद्धा काढून घेतली गेली. यावर सुद्धा स्पर्धकांमध्ये थोडी बाचाबाची होताना दिसली. नंतर सगळे स्पर्धक कान पकडून बिग बॉस यांची माफी मागताना दिसले. पण नंतर घरात मिळालेल्या शिक्षेवरुन अनेक वाद होताना दिसले. प्रत्येकजण भांडणात अडकताना दिसला आणि घरात बराच आरडोरडा आणि गोंधळ झाला. काही वेळाने बिग बॉस यांनी घरात कॅप्टन्सी टास्क जाहीर केलं. आणि यंदाचा टास्क वेगळाच असल्याचं समोर आलं. यंदा टास्कमध्ये दोन्ही उमेदवारांची कसोटी लागणार होती. टास्क अंती सगळ्यात जास्त गुण कमावणारा स्पर्धक यंदा कॅप्टन म्हणून जाहीर होणार आहे. आता हा कॅप्टन्सी टास्क अधिक रंगणार आहे आणि यामध्ये कोण जिंकणार हे लवकरच कळणार आहे, त्यामुळे आता खेळाची उत्सुकता अधिक वाढली आहे हे निश्चित.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मध्ये काय झालं असं की घरातल्याना मिळाली ही शिक्षा आणि किचनमधले लक्झरी पदार्थ काढून घेतले Description: Bigg Boss Marathi 2 new punishment: बिग बॉस मराठी २चा खेळ रंजक होत चालला आहे. नुकताच घरात नवीन ड्रामा निर्माण झाला आणि बिग बॉस यांनी स्पर्धकांना मोठी शिक्षा दिली. किचनमधील लक्झरी पदार्थ काढून घेतले गेले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles