बिग बॉस मराठी घरात हिशोब पाप-पुण्याचा टास्क रंगताच पाहा कोणता ग्रुप झाला नॉमिनेट

मालिका-ए-रोज
Updated Jun 26, 2019 | 09:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Paap-Punya nomination task: बिग बॉस मराठीत नवीन आठवडा सुरु होताच वेद लागतात ते कॅप्टनचे. ते निवडताच सुरु होतो नॉमिनेशन टास्क. हिशोब पाप-पुण्याचा हा टास्क रंगताच कोण नॉमिनेट झालं ते पाहा.

Bigg Boss Marathi 2 new nomination task announced for fifth week
बिग बॉस मराठी घरात हिशोब पाप-पुण्याचा टास्क रंगताच पाहा कोणता संपूर्ण ग्रुप झाला नॉमिनेट 

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात नुकतीच नवीन म्हणजेच पाचव्या आठवड्याला सुरुवात झाली आणि घरात मनोरा विजयाचं हे टास्क जिंकत या आठवड्यासाठी शिव ठाकरे कॅप्टन जाहीर झाला. याचसोबत घरात पुन्हा एकदा केव्हीआरपी या स्ट्राँग ग्रुपचं बॉण्डिंग नव्याने खुलताना दिसलं. सगळे हेवेदावे मागे टाकत किशोरी शहाणे, वीणा जगताप, रुपाली भोसले, आणि पराग कान्हेरे पुन्हा एकत्र आले. तर दुसरीकडे अजून एक नवीन ग्रुप घरात बनताना दिसला. शिव, हिना पांचाळ, वैशाली म्हाडे, अभिजीत केळकर, माधव देवचक्के, सुरेखा पुणेकर आणि नेहा शितोळे हे घरातले उरलेले स्पर्धक एकत्र आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन ग्रुप आमने सामने खेळ खेळताना दिसणार हे निश्चित झालं. आणि हे दोन्ही ग्रुप बनले आहेत हे नवीन नॉमिनेशन टास्क हिशोब पाप-पुण्याचा मध्ये अगदी अधोरेखीत झालं.

घरात नवीन दिवसाची सुरुवात झाली ते नवीन टास्क जाहीर होतात. हिशोब पाप-पुण्याचा हा या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क जाहीर झाला आणि घरात पडलेले दोन्ही ग्रुप अगदी स्पष्टपणे उघड झाले. या टास्कमध्ये घराचा कॅप्टन असलेला शिव निर्णायक खुर्चीत बसला होता तर त्याला सल्लागार म्हणून या आठवड्यात विद्याधर जोशी यांनी घरातून एलिमिनेट होताना सेफ केलेली नेहा होती आणि तिला सोबत म्हणून माधव देखील होता. दोन स्पर्धकांना आमने-सामने उभं करत प्रत्येकाचा घरातला पाप-पुण्याबद्दल बोलत त्यापैकी एकाला स्वर्गात टाकत सेफ करायचं तर दुसऱ्याला नरकात टाकत नॉमिनेटड करण्याचा निर्णय शिव सल्लागारांच्या मदतीने घेणार होता. आणि हे जाहीर होताच तेव्हाच खरंतर टास्कचा निकाल लागला होता काहीसा. आणि ठरल्याप्रमाणे टास्क सुरु झाला.

 

 

 

 

पराग-अभिजीत ही पहिली जोडी असून यातून अभिजीत स्वर्गात तर पराग नरकात पाठवला गेला. नंतर किशोरी-सुरेखा यांच्यातून सुरेखा स्वर्गात तर कोशोरी यांना नरकात पाठवलं गेलं. पुढे वीणा-हिना ही जोडी येताच मात्र शिवची तारांबळ उडाली. आता ग्रुप निवडत हिनाला सेफ करायचं की आपली खास मैत्रीण वीणाला यात त्याचा भलताच गोंधळ झाला. अखेर हिनाला सेफ करत शिवने ग्रुपकडे असलेला कल दर्शवला. त्यानंतर वैशाली-रुपाली ही जोडी आली आणि अपेक्षेप्रमाणे शिवने वैशालीला सेफ केलं तर रुपाली नॉमिनेट झाली. आणि मग आला गेमचा खरा ट्विस्ट जो बिग बॉस खेळले. या टास्कमधला शेवटी उरला होता तो माधवचा फैसला कारण तो सल्लागार होता. त्यामुळे त्याच्यासमोर कोणी उरलं नसल्याने बिग बॉस यांनी डाव खेळत सेफ झालेल्यांपैकी एकाला अनसेफ करावं आणि मग पुन्हा माधवसोबत त्यांची बाजू मांडावी असं जाहीर केलं. हे ऐकताच पुन्हा एकदा शिवचा गोंधळ उडाला. सेफ केलेले सगळेच त्याच्या जवळचे आणि ग्रुपमधले होते, त्यात माधव ही तितकाच जवळचा होता. अखेर बराच वेळ घेतल्यावर शिवने हिनाला अनसेफ केलं. माधव-हिनामध्ये नंतर माधव सेफ झाला आणि हिना अनसेफ. यावर वीणाने बराच वाद निर्माण केला की जर तिला अनसेफ केलं होतं त्यावेळी त्या कारणांसाठी तर आता हिना पुन्हा अनसेफ कशी होऊ शकते वगैरे. यावर घरात बरेच वाद झाले आणि पुन्हा दोन्ही ग्रुप आमने-सामने आले. अखेर या आठवड्यासाठी पराग, किशोरी, वीणा, रुपाली हा संपूर्ण केव्हीआरपी ग्रुप नॉमिनेट झाला तर त्यांच्यासोबत हिनासुद्धा नॉमिनेट झाली आहे. त्यामुळे या आठवड्याअंती केव्हीआरपी ग्रुपमधल्या एकाला राम राम म्हणावं लागणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी घरात हिशोब पाप-पुण्याचा टास्क रंगताच पाहा कोणता ग्रुप झाला नॉमिनेट Description: Bigg Boss Marathi 2 Paap-Punya nomination task: बिग बॉस मराठीत नवीन आठवडा सुरु होताच वेद लागतात ते कॅप्टनचे. ते निवडताच सुरु होतो नॉमिनेशन टास्क. हिशोब पाप-पुण्याचा हा टास्क रंगताच कोण नॉमिनेट झालं ते पाहा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles