बिग बॉस मराठी २ घरात असलेली रुपाली-वीणाची सगळ्यात घट्ट मैत्री संपुष्टात?

मालिका-ए-रोज
Updated Jul 09, 2019 | 16:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Veena-Rupali’s friendship over: बिग बॉस मराठी २मध्ये गेले २-३ दिवस घट्ट मैत्रीणी वीणा-रुपालीच्या भांडणामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात. त्यामुळे आता ही मैत्री संपल्यात जमा आहे असं दिसतंय.

Bigg Boss Marathi 2 Rupali and Veena’s friendship is finally over
बिग बॉस मराठी २ घरात असलेली रुपाली-वीणाची सगळ्यात घट्ट मैत्री संपुष्टात?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • रुपाली-वीणाची घट्ट मैत्री अखेर तुटली?
  • वीणा-रुपालीमधला वाद आज जाणार टोकाला
  • रुपाली घेणार इतर स्पर्धकांचा आधार

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात वाद-भांडणं हे आता नेहमीचे शब्द झाले आहेत. त्यामुळे वाद झाले तर त्यावर बोललं तर जातं पण ते आता सवयीचे झाले आहे. पण हाच वाद जर दोन घट्ट मैत्रिणींमध्ये रंगला तर मात्र त्यावर बरंच बोललं जातं आणि अनेक प्रतिक्रिया ही उमटतात. असंच काहीसं सध्या या बिग बॉस घरातल्या दोन खास मैत्रिणी असलेल्या वीणा जगताप आणि रुपाली भोसलेच्या बाबतीत घडताना दिसत आहे. गेले काही दिवस त्यांचा घरात असलेला सगळ्यात स्ट्राँग ग्रुप केव्हीआर तुटल्यातंच जमा आहे पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात रुपाली आणि वीणा अजून ही त्यांची मैत्री टिकवून होत्या. पण गेले ४-५ दिवस यामध्ये सुद्धा अनेक वाद होताना दिसत आहेत. त्या वादांवर तोडगा काढत या दोघी एकत्र येताना दिसत होत्या पण आता गोष्टी टोकाला गेल्या आहेत.

काल घरात झालेल्या शिक्षेनंतर वीणा, शिव, अभिजीत आणि वैशाली हसताना, मज्जा करताना दिसले जे रुपाली आणि इतंर स्पर्धकांना आवडलं नाही. पण जेव्हा वीणाला हे सांगितलं गेलं तर तिने सगळ्यांवर आरडा-ओरडा केला आणि ते रुपालीला आवडलं नाही. त्यात वीणा हे होण्या आधी असं सुद्धा बोलताना दिसली की मी इथून पुढे शिवसोबत किंवा एकटी खेळणार असं ठरवलंय. ज्याचं रुपालीला फार वाईट वाटलं. काल परवा विकेंडच्या डावात ‘मी रुपालीबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे’ असं म्हणणारी वीणा अचानक हे बोलल्यामुळे रुपालीला धक्का बसला. त्यामुळे दोघींमध्ये फूट तर पडली. हाच वाद आज अगदी टोकाला जाताना दिसेल.

 

आज घरात कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे आणि त्याच दरम्यान एक नवा वाद सुरु होईल जिथे रुपाली वीणावर भ़डकवून म्हणताना दिसेल, “हक्क हा फक्त एका बाजूनेच नसतो तो दोन्ही बाजूंनी हवा. मी काय पूर्ण आजारी आहे अशातला भाग नाहीये, पण मला खरच दुखत आहे पायाला...कोणीच नाहीये मला इथे मी हे बोलते आहे पण, माझ्याकडे “शिव” सारखा कोणी मित्र नाहीये, जो मला भरवेल किंवा दिवसभर माझी काळजी घेईल. पण तू जर ठामपणे म्हणतेस तू ती व्यक्ती आहेस मग तू दिसत नाहीस. वाग ना मग तशी, काल मी रात्री झोपले तेंव्हा सुध्दा रडत होते, पण बाजूला झोपलेल्या माणसाच्या मनामध्ये इतका राग आहे कि मला एकदाही विचारलं नाही खरच त्रास होतो आहे का खूप दुखत आहे का?”

 

 

यावर वैशाली तिला सल्ला देताना दिसेल की तुमच्या मैत्रीवर तुम्ही विचार करावा, तर अभिजीत तिला थांबवत हा पूर्णतः त्या दोघींचा निर्णय असल्याचं बोलताना दिसेल, कोणीही कोणाची बाजू घेऊ नये किंवा वाईट बोलू नये असं मत सुद्धा अभिजीत माडंले. तर हिनाशी देखील रुपाली बोलताना काय झालं पुन्हा सांगत तिच्याकडे व्यक्त होईल ज्यावर हीनाचं म्हणणं असेल की वीणाचं “कामा पुरता कामा” असत तस आहे. त्यामुळे एकंदरीत आजनंतर या दोन खास मैत्रीणींच्या मैत्रीची समीकरणं तर बदलतीलंच शिवाय ही मैत्री जवळपास तुटल्यातंच जमा आह असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ घरात असलेली रुपाली-वीणाची सगळ्यात घट्ट मैत्री संपुष्टात? Description: Bigg Boss Marathi Veena-Rupali’s friendship over: बिग बॉस मराठी २मध्ये गेले २-३ दिवस घट्ट मैत्रीणी वीणा-रुपालीच्या भांडणामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात. त्यामुळे आता ही मैत्री संपल्यात जमा आहे असं दिसतंय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles