बिग बॉस मराठी २ घरात रूपाली भोसले आईबद्दल बोलताना झाली भावूक

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 11:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Rupali gets emotional: बिग बॉस मराठी २च्या घरात सगळेच स्पर्धक आपल्या कुटुंबापासून लांब राहतायेत. त्यामुळे मध्येच त्यांची आठवण येत भावूक होणं सहाजिक आहे.

Bigg Boss Marathi 2 Rupali Bhosle gets emotional while talking about her mother
बिग बॉस मराठी २ घरात रूपाली भोसले आईबद्दल बोलताना झाली भावूक 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस घरात रुपाली भोसले कुटुंबाची आठवण काढत झाली भावूक
  • आईच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल केला उलघडा
  • खडतर प्रवासाबद्दल ऐकून अभिजीत केळकरसुद्धा झाला भावूक

मुंबई: बिग बॉस मराठी २ घरात सगळेच स्पर्धक आपल्या कुटुंबासून लांब राहत आहेत आणि खेळात बऱ्याच वेळेला निवांत बसले असताना किंवा विरंगुळा म्हणून गप्पा रंगल्या असताना अनेकदा या स्पर्धकांना त्यांच्या घरच्यांची आठवण येताना दिसते आणि ते होणं खूपच साहजिक आहे. मध्यंतरी नेहाला तिच्या नवऱ्याची आठवण आली तर नुकतीच वैशालीला तिच्या मुलीचा वाढदिवस असल्याने तिची आठवण आली. असंच रुपालीच्या बाबतीत ही घडताना दिसलं.

वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्‍या एका क्लिपमध्‍ये रुपाली तिच्या कुटुंबाची खास करुन आईची आठवण काढताना दिसली. नुकत्याच पार पडलेल्या विकेंडच्या डावानंतरची ही क्लिप आहे जिथे गार्डन एरियामध्ये अभिजीत केळकर आणि सुरेखा पुणेकर यांच्‍यासोबत गप्‍पा मारताना रुपाली दिसते आणि या दरम्यान तिच्‍या कुटुंबाबाबत बोलताना ती थोडी भावूक होताना ही दिसते.

 

 

या क्लिपमध्ये दिसतं की रूपाली गार्डनमध्‍ये फेरफटका मारत आहे आणि तेव्हा ती सांगताना दिसते की, तिची आई स्‍वावलंबी असून आजही या वयात शिलाई मशिनवर काम करते. रूपाली पुढे सांगते की, ती कायम तिच्‍या आईला प्रेरित करण्यावर भर देते आणि ती म्हणते, ''जे तुला आवडतं ते कर... माझ्या आईने १० वर्षाची असताना तिच्‍या वडिलांना गमावले आणि तेव्‍हापासून तिने कपडे शिवण्‍याचे काम हाती घेतले... मी म्‍हणते लाजू नको, कर! तिला असं वाटतं की मी वेगळ्या फिल्‍डमध्‍ये आहे तर लोक म्‍हणतील की रूपालीची आई असं करते. तर मी तिला म्‍हणाले की 'काही गरज नाही, मी म्‍हणतेय ना, तर कर!''

 

 

पुढे हा संवाद अधिक खुलतो आणि ही ३५ वर्षीय अभिनेत्री तिचा भाऊ संकेतच्‍या रॉड बसवलेल्‍या पायाबद्दल सांगताना दिसते. बिग बॉस घरामध्‍ये येण्‍यापूर्वी संकेतला दिलेल्‍या सल्‍ल्‍याबात सांगताना ती म्हणते, ''खूप पाऊस असेल, बंद असेल बस तर प्‍लीज थांब घरी, दगदग नको करू कारण पाय इतका स्‍ट्रॉंग नाही आहे त्‍याचा की प्रवास करू शकेल खूप वेळ.'' हे ऐकून अभिजीत या गोष्टीबद्दल भावूक होऊन संकेतच्‍या स्थितीबाबत विचारतो. रूपाली त्‍याला त्‍याच्‍या पायामध्‍ये रॉड बसवण्‍यात आला आहे आणि २ वर्षांमध्‍ये स्थिती कशी होती याबद्दल सांगते. ती तिच्‍या भावाच्‍या निश्‍चयाची प्रशंसा करत म्‍हणते, ''काहीही एक्‍स्‍पेरिअन्‍स नाही ऑटोमोबाइलचा, तरी मल्‍टीनॅशनल कंपनीमध्‍ये तो कामाला लागला.'' असं सांगणाऱ्या रुपालीच्या खडतर प्रवासाची जाणीव तिच्या बोलण्यातून नक्कीच जाणवते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २ घरात रूपाली भोसले आईबद्दल बोलताना झाली भावूक Description: Bigg Boss Marathi 2 Rupali gets emotional: बिग बॉस मराठी २च्या घरात सगळेच स्पर्धक आपल्या कुटुंबापासून लांब राहतायेत. त्यामुळे मध्येच त्यांची आठवण येत भावूक होणं सहाजिक आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola