Big Boss Marathi 2: बिग बॉस मराठी २च्या घरात आज रंगणार हा कॅप्टन्सी टास्क

मालिका-ए-रोज
Updated Jul 09, 2019 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 new Captaincy task: बिग बॉस मराठी २च्या घरात काल खुपच ड्रामा रंगला त्यामुळे स्पर्धकांमध्ये बरेच वादही झाले. आज पुन्हा एक नवीन सुरूवात होत अभिजीत-रूपालीमध्ये हा कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे.

Bigg Boss Marathi 2 Rupali or Abhijeet who will win this new captaincy challenge
बिग बॉस मराठी २च्या घरात आज रंगणार हा कॅप्टन्सी टास्क, वैशालीकडून रुपाली विरुद्ध वैयक्तिक विधान 

थोडं पण कामाचं

  • आज बिग बॉस घरात रंगणार रूपाली-अभिजीतमध्ये कॅप्टन्सी टास्क
  • रूपाली-अभिजीतमध्ये कोण जिंकणार बाजी?
  • वैशालीकडून रूपालीवर होणार टोकाचा आरोप

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात काल एक वेगळंच नाट्य घडलं आणि स्पर्धकांकडून होत असलेल्या सततच्या चूकांची शिक्षा देण्यासाठी बिग बॉस यांनी घरातील सगळे अत्यावश्यक पदार्थ म्हणजेच लक्झरी बजेटमध्ये आलेले खाद्यपदार्थ काढून घेतले. यानंतर घरात बरेच वाद आणि भांडणं झाली. तर घरात बरीच समीकरणं बदलताना ही दिसली. एकीकडे नेहमीप्रमाणे वीणा शिवसोबत आणि अभिजीत-वैशालीसोबत चर्चा करताना दिसली तिथेच दुसरीकडे मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. जेव्हा रूपली चक्क-चक्का नेहा आणि हिनाकडे व्यक्त होताना दिसली. यातच कॅप्टनसी उमेदवारांची नावं घोषित करण्यास सांगितली गेली.

गेल्या आठवड्यातील बिबि हॉटेल हा टास्क उत्तम पार पाडल्यामुळे दोन्ही टीम्सला कॅप्टन्सी उमेदवार निवडण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. त्यात टीम एमधून रूपाली तर टीम बीमधून अभिजीतचं नाव जाहीर झालं. पण घरात सतत सुरू असलेल्या भांडणांमुळे कोणाचा पाठींबा नेमका कोणाला असेल याचा अंदाज बांधणं खरंच कठीण होऊन बसलं आहे.

 

 

 

 

यंदाचं कॅप्टन्सी टास्क ही काहीतरी वेगळं असणार असं बिग बॉस यांनी कालंच जाहीर केलं आहे. त्यामध्ये काल बिग बॉस यांनी कॅप्टन्सी उमेदवार रूपाली आणि अभिजीतला कन्फेशन रूममध्ये बोलावून पहिल्या आठवड्यात त्यांनी गमावलेल्या वस्तू रूपालीच्या भावाने तिला दिलेला टेडी तिचा भिडू तर अभिजीतच्या फॅमिली फोटोचा समावेश होता. या वस्तू परत मिळवणाऱ्याला एक गुण मिळणार असं जाहीर झालंय. पण कोणीही ती वस्तू दिली नाही तर सामन्याचा निर्णय अनिश्चित राहील असं सुद्धा बिग बॉस यांनी सांगितलंय. त्यामुळे या दोघांना काहीतरी निर्णय घेत एकाला कोणाला तरी एक गुण देणं अनिवार्य राहणार आहे.

तर पुढे याच कॅप्टन्सी टास्कचा पुढचा टप्पा फोन टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये दोन्ही कॅप्टन्सी उमेदवारांना समर्थक असणार आहेत. ज्यासाठी दोन टीम बनवल्या जातील. या टास्कमध्ये फोनवर बोलत काहीतरी युक्ती काढत विरूद्ध टीमच्या उमेदवाराला फोन खाली ठेवण्यासाठी भाग पाडायचे आहे. यामध्ये आज बऱ्याच गोष्टी होताना दिसतील आणि बरेच वैयक्तिक ताशेरे ही ओढले जातील. कारण एका क्षणी रूपाली काही केल्या फोन ठेवत नाहीये हे लक्षात आलेली वैशाली खूप टोकाचं विधान करताना दिसेल.

पहिल्या आठवड्यात आपल्या भावानं दिलेला लाडका टेडी भिडू रूपालीनं टास्कमध्ये बहाल केला होता. त्यामुळे, “तू टास्क जिंकण्यासाठी तुझ्या भावाला वापरलंस” हे वाक्य वैशाली रूपालीला फोनवर बोलताना दिसेल. यावर रूपालीला खूप मोठा धक्का बसेल आणि ती खाली कोसळताना दिसेल. ज्यानंतर नेहा तिच्या मदतीला धावून जाईल. त्यामुळे आज घरात बराच ड्रामा रंगणार आहे. एकंदरीत या कॅप्टन्सी टास्कचा निर्णय काय होतो आणि कोण ही बाजी मारते त्याकडे आता सगळ्याचंच लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Big Boss Marathi 2: बिग बॉस मराठी २च्या घरात आज रंगणार हा कॅप्टन्सी टास्क Description: Bigg Boss Marathi 2 new Captaincy task: बिग बॉस मराठी २च्या घरात काल खुपच ड्रामा रंगला त्यामुळे स्पर्धकांमध्ये बरेच वादही झाले. आज पुन्हा एक नवीन सुरूवात होत अभिजीत-रूपालीमध्ये हा कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles