बिग बॉस १३साठी सलमानचं मानधन २०० कोटी तर मराठी बिग बॉस होस्ट महेश मांजरेकरांचं इतकंच?

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Mahesh Manjrekar fees: बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन लवकरच सुरु होणार असल्याने सलमान खानच्या मानधनाची चर्चा रंगली. आता चर्चा करुयात मराठी बिग बॉस होस्ट महेश मांजरेकरांच्या मानधनाची.

Bigg Boss Marathi 2 Salman charges 200crores and this is how much Marathi Bigg Boss host Mahesh Manjrekar charges
बिग बॉस १३साठी सलमानचं मानधन २०० कोटी तर मराठी बिग बॉस होस्ट महेश मांजरेकरांचं इतकंच?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस होस्ट म्हणून सलमानचं मानधन २०० कोटी तर महेश मांजरेकरांचं एवढं?
  • बिग बॉस मराठी आणि हिंदीच्या पार्ईज मनीमध्ये सुद्दा असते मोठी तफावत
  • बिग बॉस हिंदी १३ सीझनवर तर मराठीचं दुसरंच सीझन

मुंबई: बिग बॉस हिंदीचा १३वा सीझन लवकरच भेटीला येणार आहे आणि दर वर्षी प्रमाणे यंदा सुद्धा बॉलिवूडचा दबंग खान सलमान तो होस्ट करणार आहे. मध्यंतरी सीझनची चर्चा जोरदार रंगली त्याचसोबत चर्चा रंगली ती सल्लू मियाँच्या मानधनाची. सलमान प्रत्येक एपिसोडसीठी तब्बल १६ कोटी घेत पूर्ण सीझनसाठी तब्बल ४०० घेणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला पण नंतर खरा आकडा समोर आला आणि प्रत्येक आठवड्याला तो १३ कोटी घेत असल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे पूर्ण सीझनसाठी १९५ कोटींच्या आसपास. याच चर्चेमुळे अनेकांनी आपल्या मराठी बिग बॉसकडे सुद्धा लक्ष वळवलं आणि आपले मराठी बिग बॉस होस्ट महेश मांजरेकर किती मानधन घेतात हा प्रश्न उपस्थित झाला.

बहुतेक वेळा मानधन गुपित ठेवलं जातं त्यामुळे या शोबाबतीत ही असंच घडत होतं. पण तरीसुद्धा आम्ही या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं ठरवलं आणि सल्लू मियाँच्या मानधनाचा सुगावा लागू शकतो तर आपल्या मराठीच्या होस्टच्या का नाही असा विचार आम्ही केला. अखेर आमच्या सूत्रांकडून आम्ही मांजरेकरांच्या मानधनाचा शोध लावलाय. मराठी बिग बॉससाठी मांजरेकरांना तब्बल २२ लाख रूपये प्रत्येक एपिसोडसाठी मिळतात अशी माहिती आमच्या हाती लागली आहे. त्यामुळे पूर्ण सीझनसाठी जवळपास हा आकडा ५ कोटींच्या घरात जातो. हा आकडा थोडाफार जवळ जाणारा आहे असं समजतंय. त्यामुळे या आकड्याच्या आसपास त्यांचं मानधन आहे हे सांगण्यात आलं आहे.

 

 

मराठी आणि हिंदीच्या मानधनात एवढी तफावत आहे हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल हे नक्की. तसं बिग बॉस हिंदीची विजयी रक्कम आणि मराठीची विजयी रक्कम यात पण जमीन अस्मानाचा फरक आहे. कारण जिथे बिग बॉस हिंदी विजेत्याला ५० लाखांचा धानदेश मिळतो तिथे मराठी बिग बॉसच्या विजेत्याला २५ लाखांवर समाधान मानावं लागतं. खरंतर हे सगळं बजेटवरुन ठरत असतं. त्यामुळे हिंदीमध्ये निश्चितंच शोचं बजेट खूप मोठं आहे तर मराठीत त्या मानाने बजेट कमी आहे म्हणून ही तफावत बघायला मिळते. त्यातही बिग बॉस हिंदीचा हा १३वा सीझन आहे तर मराठी बिग बॉसची ही नुकतीच सुरुवात असून हा फक्त दुसराच सीझन आहे. त्यामुळे जिथे यंदाच्या १३व्या सिझनच्या अंती सल्लू मियाँ २०० कोटी घरी नेणार तिथे आपले मराठी होस्ट मांजरेकर ५ कोटींच्या आसपास मानधन घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा आकडा पुढच्या सीझनला वाढतो का याकडे नक्कीच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस १३साठी सलमानचं मानधन २०० कोटी तर मराठी बिग बॉस होस्ट महेश मांजरेकरांचं इतकंच? Description: Bigg Boss Marathi 2 Mahesh Manjrekar fees: बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन लवकरच सुरु होणार असल्याने सलमान खानच्या मानधनाची चर्चा रंगली. आता चर्चा करुयात मराठी बिग बॉस होस्ट महेश मांजरेकरांच्या मानधनाची.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles