‘तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन’ पाहा बिग बॉसच्या घरात कोणासाठी निघाले शिवच्या तोंडून हे शब्द

मालिका-ए-रोज
Updated Jul 22, 2019 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Shiv Gets Emotional: बिग बॉस मराठीत नुकताच विकेंडचा डाव पार पडला. त्यातही गेल्या आठवड्यात ज्या कारणावरुन शिवला झापलं गेलं तेच कारण यंदा ही होतंच. त्यावर काय म्हणतोय शिव आणि कोणाला ते पाहा.

Bigg Boss Marathi 2 Shiv gets emotional while talking to Veena
‘तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन’ पाहा बिग बॉसच्या घरात कोणासाठी निघाले शिवच्या तोंडून हे शब्द 

थोडं पण कामाचं

  • ‘तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन’ - शिव ठाकरे
  • विकेंडच्या डावामध्ये मिळालेल्या सल्ल्यावर शिव झाला व्यक्त
  • वीणाचं मत सुद्धा शिवसारखंच असेल?

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात आज नवव्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. तसंच काल पार पडलेल्या विकेंडच्या डावात सुरांची राणी वैशाली माडेचा खेळातील प्रवास संपलेला दिसला आणि तिने घराचा निरोप घेतला. पण त्याआधी होस्ट महेश मांजरेकरांनी अनेकांची शाळा घेतलेली दिसली. नेहा शितोळे आणि माधव देवचक्के यांना हीना पांचाळला टार्गेट केल्याबद्दल खडे बोल सुनावताना मांजरेकर दिसले. तर त्याचसोबत त्यांनी शिव ठाकरे आणि वीणा जंगतापला सुद्धा बरंच सुनावलं. खासकरुन शिवला ते गेल्या आठवड्यात ज्या कारणासाठी सुनावताना दिसले तेच कारण यंदासुद्धा होतं.

गेल्या काही आठवड्यापासून शिवचा खेळावरचा फोकस हलला आहे असं अनेकांचं मत आहे. तेच मत मांजरेकरांचं ही होतं. शिव सतत वीणाच्या अवती भवती दिसतो आणि त्याचा खेळ सुद्धा तिच्याप्रमाणे बदलतो. जसं गेल्या आठवड्यातल्या मर्डर मिस्ट्री टास्कमध्ये शिव खूनी असताना त्याला वीणाचा टॉप फाडून खून करण्यास सांगितलं ते त्याने केलं नाही आणि स्वतः शिक्षा भोगली. याबद्दल त्याला या आठवड्यात प्रेक्षकांकडून आरोपी ही ठरवलं गेलं. जे काही घडलं आणि जे काय त्याला सुनावलं गेलं त्यावरंच शिव आज घरात चर्चा करताना दिसणार आहे. ही चर्चा निश्चितंच तो दुसरं-तिसरं कोणी नाही तर खास मैत्रीण वीणासोबत करताना दिसेल.

याबद्दल बोलताना शिवचे म्हणणे असेल की मांजरेकरांना वाटतंय की शिव आणि वीणा हे दोघं एकमेकांच्या मध्ये येत आहेत आणि म्हणून आता आपल्याला त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागणार आहे. पुढे तो बोलताना दिसेल, “पण त्याचा अर्थ असा नाही की आपण बोलायचं नाही. एक तर आपण जसे बोलत आहोत तसेच बोलू फक्त लक्ष देऊ कुठे काय करायचे आहे. पण जसं होत तसंच ठेऊ आणि तसं नाहीतर पूर्ण बंद. याच्यासाठी जर मी तुझ्याकडे आलो आणि खोट हसलो तर ते नाटकी बोलण होईल, ते मी नाही करु शकत. तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन असे मला वाटते...”

पुढे तो वीणाला असं सुद्धा सांगताना दिसेल की सरांनी जे सांगितलं ते आपण सकारात्मक पद्धतीने घेऊया, चुका सुधारू, टास्क मध्ये लक्ष देऊ आणि आपण टास्कच्या वेळेस एकमेकांच्यामध्ये नाही येणार याची काळजी घेऊ. हे सगळं बोलून शिव तर आपलं मत मांडेल आणि पुन्हा एकदा वीणा किती महत्त्वाची आहे हे तो सिद्ध तर करेल. पण त्यावर वीणा सुद्धा त्याला होकार देते की तिचं काही वेगळं मत यावर असेल ते आजच्या भागात स्पष्ट होईलंच. शिवाय या सगळ्याचा यांच्या नात्यावर काही परिणाम होतो का ते पण येत्या काही दिवसात स्पष्ट होईलंच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
‘तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन’ पाहा बिग बॉसच्या घरात कोणासाठी निघाले शिवच्या तोंडून हे शब्द Description: Bigg Boss Marathi Shiv Gets Emotional: बिग बॉस मराठीत नुकताच विकेंडचा डाव पार पडला. त्यातही गेल्या आठवड्यात ज्या कारणावरुन शिवला झापलं गेलं तेच कारण यंदा ही होतंच. त्यावर काय म्हणतोय शिव आणि कोणाला ते पाहा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...