Bigg Boss Marathi 2: टास्कमध्ये शिव चक्क आरोहला चावला, शिवला मिळाली भयंकर शिक्षा

मालिका-ए-रोज
Updated Aug 14, 2019 | 08:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठीमधील टास्कमध्ये शिव चक्क आरोहला चावला. त्यामुळे बिग बॉसकडून त्याला खूप मोठी शिक्षा मिळाली. नंतर घरात या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क देखील पार पडला.

bigg boss marathi 2 shiv gets nominated as a punishment for biting Aroh
Bigg Boss Marathi 2: टास्कमध्ये शिव चक्क-चक्क आरोहला चावला, शिक्षा म्हणून  खुद्द बिग बॉसने केलं थेट नॉमिनेट  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • शिवानी आणि आरोहने केलं वीणाला टार्गेट, तिघांमध्ये जोरदार वाद रंगला
  • कॅप्टन्सी टास्कमध्ये शिव आरोहला चावला, झाला बिग बॉसकडून थेट नॉमिनेट
  • किशोरी नवीन कॅप्टन तर हीना कमी वोट्स मिळाल्याने नॉमिनेट

मुंबई: बिग बॉस मराठीचा नवीन एपिसोड सुरु झाला तोच एका मोठ्या वादाने. आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वे हे वीणा जगतापसोबत वाद उकरुन काढताना दिसले. कारण फारच शुल्लक होतं पण यावरुन या तिघांनी वाद उगाच ताणला. वीणा सुद्धा त्यांना तोडीस तोड उत्तर देताना दिसली पण त्यामुळे वाद उगाच वाढला. काही वेळाने मात्र या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क म्हातारीचा बूट याची घोषणा झाली आणि पुन्हा सगळ्या स्पर्धकांनी कंबर कसली.

आदल्या दिवशी पार पडलेल्या टास्कमधून किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे यांची निवड कॅप्टन्सीसाठीचे उमेदवार म्हणून झाली होती. त्यामुळे कॅप्टन्सी टास्क या दोघांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये रंगणार होता. शिवला नेहा, शिवानी आणि बिचुकले समर्थक दिले गेले. तर किशोरीच्या टीममध्ये वीणा, हीना आणि आरोह हे होते. पहिल्या राऊंडमध्ये शिवच्या टीमने बूटात लेस घालायची होती तर दुसऱ्या टीमने त्यांना अडवायचं होतं. टास्कमध्ये युक्तीचा वापर करायचा होता पण नेहमीप्रमाणे टास्कमध्ये बळाचा वापर झालाच आणि शिव आरोहला चक्क चावला. त्यावरुन घरात बराच राडा होताना दिसला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

अखेर बिग बॉस यांनी मध्यस्थी केली आणि टास्क स्थगित केलं गेलं. काही वेळाने सगळ्या स्पर्धकांना एकत्र करत बिग बॉस यांनी टास्कमध्ये झालेल्या बळाच्या वापरावरावरुन सगळ्यांची कानउघडणी केली. अनेकदा टास्कमध्ये चातुर्याचा वापर करण्याचं सांगून देखील बळाचा वापर होताना दिसतो याबद्दल बिग बॉस यांनी नाराजी दर्शवली. नंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या बळाच्या वापरामुळे कॅप्टन्सी टास्क रद्द केलं गेलं. त्याचसोबत टास्कमध्ये शिवकडून आरोहला चावलं गेल्याची शिवला खूप मोठी शिक्षा मिळाली. त्याची कॅप्टन्सी उमेदवारी तर गेलीच पण त्याचसोबत त्याला या आठवड्यासाठी बिग बॉसकडून थेट नॉमिनेट केलं गेलं. तसंच बिग बॉसकडून किशोरी यांना या आठवड्याची कॅप्टन म्हणून जाहीर करण्यात आलं. बिग बॉसच्या या निर्णयाचा शिववर खूप परिणाम होताना दिसला. तो खचलेला दिसला, त्यासोबत तो रडताना सुद्धा दिसला.

पुढे या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क जाहीर झाला. यंदाचा नॉमिनेशन टास्क अनोखा होता कारण यंदा घरात कोण नकोपेक्षा फिनालेमध्ये आपल्यासोबत कोण दोन स्पर्धक हवे आहेत त्यांची नावं द्यायची होती. नेहा पहिली गेली आणि तिने शिवानी आणि आरोहची नावं घेतली. त्यानंतर वीणाने नेहा आणि हीनाला सेफ केलं. नंतर शिवानी गेली आणि तिने नेहा आणि आरोहला सेफ कलं. त्यानंतर हिनाने वीणा आणि आरोहला सेफ केलं. पुढे आरोहने नेहा आणि शिवानीला सेफ केलं. शिवने नंतर वीणा आणि हीनाचं नाव घेतलं. त्यानंतर शेवटी गेल्या किशोरी आणि त्यांनी वीणा आणि शिवानाला सेफ केलं. असं होत टास्क अंती सगळ्यात कमी वोट्स मिळाल्यामुळे हीना नॉमिनेट झाली. हा टास्क आणि बिग बॉसचा एक एपिसोड तर संपला पण या आठवड्यात घरात बऱ्याच घडामोडी घडताना दिसतील एवढं नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bigg Boss Marathi 2: टास्कमध्ये शिव चक्क आरोहला चावला, शिवला मिळाली भयंकर शिक्षा Description: Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठीमधील टास्कमध्ये शिव चक्क आरोहला चावला. त्यामुळे बिग बॉसकडून त्याला खूप मोठी शिक्षा मिळाली. नंतर घरात या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क देखील पार पडला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली