Big Boss Marathi 2: शिवनं वीणाच्या नावाचा काढलेल्या टॅटूवर काय म्हणतेय शिवानी पाहा

मालिका-ए-रोज
Updated Jul 22, 2019 | 18:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Shiv and Shivani discussion: बिग बॉस मराठी घरात अनेकदा स्पर्धक सगळे हेवेदावे विसरत गप्पा मारताना दिसतात. तसंच आज शिव-शिवानी सुद्धा करताना दिसतील आणि यांच्या गप्पा रंगतील ते शिवच्या टॅटूवरून.

Bigg Boss Marathi 2 Shivani and Shiv discuss Shiv’s tattoo of Veena’s name
बिग बॉस मराठी २ घरात शिवने वीणाच्या नावाच्या काढलेल्या टॅटूवर काय म्हणतेय शिवानी पाहा 

थोडं पण कामाचं

  • वीणाच्या नावाच्या काढलेल्या शिवच्या टॅटूवर शिवानीचा सल्ला
  • शिवला नातं असंच बिग बॉस घराच्या बाहेरही टिकवून ठेवण्यास सांगणार शिवानी
  • "टॅटूला बघितल्यावर राग नाही आला पाहिजे...”- शिव ठाकरे

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरातला खेळ सध्या उत्तरार्धात पोहोचला आहे आणि नवव्या आठवड्यात पोहोचलेल्या या खेळाला अधिक चेव आलाय. त्यामुळे घरात आता फार स्पर्धक उरलेले नाहीत. म्हणूनच अनेकदा हे स्पर्धक आपली सगळी भांडणं विसरत एकत्र येताना दिसतात आणि बऱ्याचदा यांच्यात गप्पा सुद्धा रंगतात. कधी-कधी तर त्या फार गहन आणि वैयक्तिक विषयावर असतात. जसं आज शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरेमध्ये रंगताना दिसतील. या दोघांचं फारसं घरात आजवर पटलेलं नाहीये. पण आज मात्र हे दोघं एका वेगळ्याच विषयावर बोलताना दिसतील आणि तो विषय असेल शिवनं काढलेला वीणा जगतापच्या नावाचा टॅटू.

बिग बॉसचा खेळ जसजसा पुढे सरकतोय तसतसा खेळ कठीण होत चालला आहे. गेल्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्क दरम्यान तर चक्क-चक्क परमनन्ट टॅटू काढण्याचं एक कार्य होतं. रूपाली भोसले आणि वीणा या दोघी कॅप्टन्सीसाठी लढत होत्या. त्यात त्यांच्या टीममधल्या  एका समर्थकानं हातावर परमनन्ट टॅटू काढल्यानं प्रत्येकीला एक-एक गुण मिळणार होता. जिथे रूपालीसाठी हीना पांचाळनं टॅटू काढणं स्विकारलं तिथे अगदी सहज शिव वीणाच्या नावाचा टॅटू काढण्यासाठी हसत-हसत तयार झाला. याच टॅटूबद्दल बोलताना आज शिवानी दिसेल तिथे माधव आणि नेहासुद्धा असतील. यावेळी शिवानी शिवला म्हणेल, “तुझा टॅटू खूप छान आहे...“

 

 

हिच चर्चा पुढे सरकेल आणि आज शिवानी आणि शिवमध्ये विणा आणि शिवच्या नात्याबद्दल सुद्धा चर्चा होताना दिसेल. शिवानी शिवला थोडाफार सल्ला दोताना ही दिसेल. डायनिंग टेबलवर गप्पा सुरू असताना शिवच्या टॅटूचं कौतुक केल्यावर पुढे शिवानी म्हणताना दिसेल की ती घराबाहेर गेल्यावर तिचा बॉयफ्रेन्ड अजिंक्यच्या नावाचा टॅटू काढणार आहे. यावर शिवचं म्हणणं असेल, “टॅटू म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ना?” त्यावर शिवानी लगेचच सांगताना दिसेल की अजिंक्यनं तिच्या नावाचा टॅटू आधीच काढलेला आहे.

पुढे शिव म्हणताना दिसेल, “खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यभर आपल्या शरीरावर रहणार, टॅटूला बघितल्यावर राग नाही आला पाहिजे...” हे ऐकून शिवानीला शिवला सल्ला द्यावासा वाटेल आणि ती शिवला सांगताना दिसेल की जर आता वीणा आणि शिव दोघांकडून देखील सारखी भावना आहे असे समजू शकतंय, तर बाहेर जाईपर्यंत आणि गेल्यावर देखील असचं राहू दे. त्यावर शिव म्हणेल, “बघू” हे ऐकल्यावर शिवानीला धक्का बसेल आणि त्यावर ती तडक विचारताना दिसेल, “बघू?” त्यावर शिवचं उत्तर असेल, “बघू म्हणजे माझी देखील तीच इच्छा आहे, पण आपण कोणावर जबरदस्ती नाही ना करू शकत. मी इथे जसा दिसत आहे तसा शंभर टक्के खरा आहे आणि ती देखील खरीच आहे. त्यामुळे बाहेर जाऊन देखील असचं राहिल नाही बदलणार…” असं म्हणत शिव आपली बाजू तर मांडेल पण खरंच त्याला त्याची खात्री आहे का हे या वाक्यावरुन वाटत तरी नाहीये. शिवाय घराबाहेर पडताच सगळी गणितं बदलतील पण त्याप्रमाणे शिव-वीणाचं नातं पण बदलेल का ते तर येणारा काळंच ठरवेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Big Boss Marathi 2: शिवनं वीणाच्या नावाचा काढलेल्या टॅटूवर काय म्हणतेय शिवानी पाहा Description: Bigg Boss Marathi Shiv and Shivani discussion: बिग बॉस मराठी घरात अनेकदा स्पर्धक सगळे हेवेदावे विसरत गप्पा मारताना दिसतात. तसंच आज शिव-शिवानी सुद्धा करताना दिसतील आणि यांच्या गप्पा रंगतील ते शिवच्या टॅटूवरून.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...