बिग बॉस मराठी घरात शिवानी सुर्वेची होणार पुन्हा एन्ट्री

मालिका-ए-रोज
Updated Jul 12, 2019 | 19:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Shivani Surve will return as Wild card: बिग बॉस मराठी २च्या घरातून उत्तम खेळत असताना सुद्धा शिवानी सुर्वे वैयक्तिक कारणासाठी खेळातून बाहेर गेली. पण आता ती पुन्हा घरात एन्ट्री घेणार असं समजतय

Bigg Boss Marathi 2 Shivani Surve to return in the house as wild card
बिग बॉस मराठी घरात शिवानी सुर्वेची होणार वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा एन्ट्री  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी घरात होणार शिवानी सुर्वेची पुन्हा एन्ट्री
  • शिवानी सुर्वे ठरणार यासीझनची दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक
  • या संधीचं सोनं करणार का शिवानी याकडे लागणार सगळ्यांचं लक्ष

मुंबई: बिग बॉस मराठी २चा खेळ सध्या उत्तरार्धात पोहचला आहे. खेळाच्या पहिल्या दिवसापासून घरात उत्तम खेळताना दिसले आणि ज्यांची सर्वाधिक चर्चा झाली ते तीन स्पर्धक होते पराग कान्हेरे, अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे. पण हे तिनही स्पर्धक नको त्या कारणासाठी घरातून बाहेर गेले. आता यातील शिवानी सुर्वेची घरात पुन्हा एकदा एन्ट्री होणार असल्याची पक्की खबर आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आजच शिवानी घरात पुन्हा जाणार असून उद्याच्या एपिसोडपासून ती दिसायला लागेल अशी सुद्धा माहिती मिळाली आहे.

शिवानी घरात आल्यापासून तिला बरं वाटत नव्हतं आणि ती घराच्या बाहेर जाण्यासाठी विनंती करताना दिसली. नंतर काही दिवसांनी तिचा सूर बदलला आणि ती घरातून बाहेर जाण्यास दिलं नाही तर ती बिग बॉस निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करेल असं बोलू लागली. यावर बिग बॉस यांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि घरातील सह स्पर्धकांनी सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण शिवानी काही केल्या ऐकली नाही. अखेर तिला घरातून बाहेर काढलं गेलं. आता मात्र तिला पुन्हा एक संधी दिली जाणार आहे आणि ती पुन्हा घरात आणि खेळात परतताना दिसेल.

 

 

 

 

शिवानी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात शिरेल आणि पुन्हा तिच्या खेळाला नव्याने सुरुवात होईल असं आम्हाला आमच्या सूत्रांकडून समजलं आहे. बिग बॉसच्या इतिहासात असं फार क्वचितच होतं की एखाद्या स्पर्धकाला अशी संधी मिळते बिग बॉस हिंदी सीझन ४मध्ये डॉली बिन्द्राला अशी संधी मिळाली होती. कारण खेळाचे नियम फार काटेकोर आहेत आणि त्याप्रमाणे खेळाचं कॉन्ट्रॅक्ट ही त्याच पद्धतीत बनवलं गेलं आहे. पण असं असताना सुद्धा खेळाची सध्याची परिस्थिती बघता खेळात जर रंजक वळण आणलं नाही तर खेळातील मनोरंजनाचा भाग खूपच कमी होताना दिसेल.

 

सध्या खेळात ९ स्पर्धक उरले आहेत पण त्यांच्यात हवा तेवढा खेळ रंगत नाहीये. त्यामुळे शिवानीला घरात आणून शोच्या टीमने एक नवीन खेळी खेळायचा निर्णय घेतला आहे. शिवानी घरात येताच घरातील सध्याच्या स्पर्धकांच्या खेळात नक्कीच खूप गोष्टी बदलतील त्यातही अनेक नात्यांची गणितं सुद्धा बदलताना दिसतील. त्यामुळे शिवानी फॅक्टर पुन्हा एकदा आपली कमाल घरात दाखवू शकेल का हे तर येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. त्यातही होस्ट महेश मांजरेकर यावर उद्याच्या विकेंडच्या डावात काय बोलतील ते पण पहावं लागेल. तर शिवानीचा खेळ नव्याने अनुभवण्यासाठी सज्ज होऊयात आणि येणाऱ्या एपिसोडची वाट पाहूयात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी घरात शिवानी सुर्वेची होणार पुन्हा एन्ट्री Description: Bigg Boss Marathi 2 Shivani Surve will return as Wild card: बिग बॉस मराठी २च्या घरातून उत्तम खेळत असताना सुद्धा शिवानी सुर्वे वैयक्तिक कारणासाठी खेळातून बाहेर गेली. पण आता ती पुन्हा घरात एन्ट्री घेणार असं समजतय
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola