पराग-शिवच्या भांडणामुळे बिग बॉस मराठी घरातला सगळयात घट्ट ग्रुप केव्हीआरपी अखेर तुटला?

मालिका-ए-रोज
Updated Jun 18, 2019 | 10:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

KVRP Group breaks apart in Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी 2च्या घरात कॅप्टन्सी टास्कमुळे बरेच चढ उतार पाहायला मिळाले. पण सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा केव्हीआरपी हा स्ट्राँग ग्रुप तुटला

Bigg Boss Marathi 2 shocking decision Parag forms new group with Neha
पराग-शिवच्या भांडणामुळे बिग बॉस मराठी घरातला सगळयात घट्ट ग्रुप केव्हीआरपी अखेर तुटला?  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठी 2च्या घरात काल या विकेन्डच्या डावामध्ये एक नाहीतर दोन स्पर्धक बाहेर जाताना दिसले, जिथे शिवानीला घरातून बाहेर खऱ्या अर्थाने हाकललं गेलं तिथे दिगंबर मात्र अधिकृतपणे एलिमिनेट होऊन बाहेर गेला. पण हे दोघं घरातल्या एकाच ग्रुपचा भाग असल्यामुळे त्या ग्रुपमध्ये अचानक पोकळी निर्माण झाली. त्यातच घरात एक नवीन स्पर्धक हिना पांचाळ ही वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आली. त्यामुळे ही आता कोणाच्या ग्रुपमध्ये सामील होणार यावरुन खलबतं सुरु झाली आहेत. त्यात बिचुकलेंच्या अगदी जवळ असलेली शिवानी गेल्यामुळे बिचुकले मात्र हिनाला आपल्या बाजूने करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये दिवसभर तर खूप काही घडलं पण दिवसाच्या शेवटी एक धक्कादायक वळण येताना दिसलं आणि घरातला सगळ्यात घट्ट ग्रुप तुटला.

तर दिवसाची सुरुवात झाली आणि त्याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्याला देखील सुरुवात झाली. आणि याच क्षणी बिग बॉस यांनी कॅप्टनसीसाठीचा एक मोठा निर्णय जाहीर केला. वैशाली आणि दिगंबर गेल्या आठवड्यात कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून जाहीर झाले होते पण दिगंबर घरातून एलमिनेट झाल्यामुळे त्याच्या जागी नवीन उमेदवार म्हणून इतर स्पर्धकांमधून एक नाव जाहीर कराण्यासाठी बिग बॉस यांनी सांगीतलं. बराच विचारविनिमय आणि चर्चेनंतर अखेर विद्याधर यांचं नाव जाहीर झालं. यानंतर बिग बॉस यांनी पुन्हा एक खेळी खेळली आणि दोन नाहीतर तीन उमेदवारांमध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल असं जाहीर केलं. टास्क बजर वाजताच सगळ्यात पहिले जो स्पर्धक कन्फेशन रुममध्ये पोहचेल तो स्पर्धक उमेदवार म्हणून जाहीर होईल असं बिग बॉस यांनी जाहीर केलं. टास्क बजर वाजताच शिव, नेहा आणि अभिजीत एकत्र धावले यात धक्काबुक्की होत नेहा पडली आणि त्यातून जागा काढत अभिजीत कन्फेशन रुममध्ये पोहचण्यास यशस्वी झाला.

पण यामध्येच शिव आणि परागमध्ये वादाची ठिणगी उडाली, पराग शिवला जो प्रकार झाला आणि नेहा पडली याबद्दल समजावून सांगत होता. शिवला हे आवडलं नाही आणि या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. झालेला प्रकार चुकीचाच असल्याने नंतर बिग बॉस यांनी सुद्धा यावर आपला निर्णय देत स्पर्धकांकडून बहुमत घेत शिवला एलिमिनेशनसाठी नॉमिनेट केलं. पुढे लगेचच या आठवड्याचं कॅप्टनसी टास्क सही रे सही जाहीर झालं. अभिजीत, वैशाली आणि विद्याधर यांच्यामध्ये हे टास्क रंगणार होतं, या तिघांपैकी स्वतःच्या सगळ्यात जास्त स्वाक्षऱ्या करणारा स्पर्धक कॅप्टनसी टास्क जिंकणार असं जाहीर झालं. आणि खेळ सुरु झाला, प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे समर्थक जोमाने टास्क खेळायला लागले. टास्क अंती सगळ्यात जास्त स्वाक्षऱ्या करुन वैशाली कॅप्टनसी टास्क जिंकत या आठवड्याची कॅप्टन बनली.

केव्हीआरपी ग्रुप अखेर तुटला?

हे टास्क संपताच घरात एक मोठी धक्कादायक गोष्ट होताना दिसली. शिव आणि परागच्या भांडणाचे पडसाद केव्हीआरपी ग्रुपवर उमटताना दिसले. जेव्हा बिग बॉस यांनी टास्कमध्ये शिवने बळाचा वापर केल्यासाठी त्याला नॉमिनेट करण्यासाठी घरातल्यांचे बहुमत विचारलं तेव्हा पराग, किशोरी आणि रुपाली यांनी सुद्धा इतर 5 स्पर्धकांसोबत हात वर केला. हे शिवला पटलं नाही कारण तो त्यांच्या ग्रुपचा भाग होता. शिव आणि वीणा हे दोघं यावर नाराज दिसले आणि ग्रुपमध्ये फूट पडायला सुरुवात झाली. शिव ग्रुपमध्ये आला त्या दिवसापासून परागला याची जाणीव झाली होती की, शिव हा ग्रुप तोडण्यासाठी कारणीभूत असेल आणि तेच झालं. हे सगळे परागच्या जिव्हारी लागलं आणि त्याला रडू अनावर झालं, अखेर त्यांने नेहाचा प्रस्ताव ऐकत एक स्वतंत्र ग्रुप निर्माण केला. भावुक झालेला पराग अखेर किशोरी आणि रुपालीकडे जाऊन रडत ही गोष्ट त्यांना सांगताना दिसला. आता यानंतर घरात बऱ्याच गोष्टी बदलताना दिसतील असं दिसतंय. शिवाय खरंच हा ग्रुप तुटला आहे का की काही दिवसात यांच्यातलं सूत पुन्हा जुळेल हे येणारी वेळंच ठरवेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पराग-शिवच्या भांडणामुळे बिग बॉस मराठी घरातला सगळयात घट्ट ग्रुप केव्हीआरपी अखेर तुटला? Description: KVRP Group breaks apart in Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी 2च्या घरात कॅप्टन्सी टास्कमुळे बरेच चढ उतार पाहायला मिळाले. पण सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा केव्हीआरपी हा स्ट्राँग ग्रुप तुटला
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles