बिग बॉस मराठी 2: 'टिकेल तो टिकेल' टास्कमधले वाद टोकाला, टास्कमध्ये बळाचा वापर आणि शारीरिक हिंसा

मालिका-ए-रोज
Updated Jun 28, 2019 | 07:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Task turns Worse: बिग बॉस मराठीमधील टास्कमध्ये वाद होणं हे काय नवी गोष्ट नाहीये पण 'टिकेल तोच टिकेल' टास्क भलताच टोकाला गेला. इतकं की वाद तर झालेच, बळाचा वापर ही झालेला दिसला आणि शारीरिक हिंसा पण.

Bigg Boss Marathi 2 Tikel toch tikel task gets worse
बिग बॉस मराठी मधल्या टिकेल तो टिकेल टास्कमधले वाद टोकाला, टास्कमध्ये बळाचा वापर आणि शारिरीक हिंसा 

मुंबई: बिग बॉस मराठीचा नुकताच पार पडलेला एपिसोड सुरु झाला ते घरात सुरु असलेल्या 'टिकेल तोच टिकेल' या टास्कवर. हा टास्क घरात जाहीर झाला असून आधीच्या भागात त्यासाठी घरात दोन टीम निवडल्या गेल्या. टीम 'ए'मध्ये पराग कान्हेरे, किशोरी शाहाणे, रुपाली भोसले, वीणा जगताप आणि शिव यांना निवडलं गेलं तर टीम बी ही नेहा शितोळे, अभिजीत केळकर, वैशाली माडे, हिना पांचाळ आणि माधव यांची होती. तर सुरेखा पुणेकर या टास्कच्या संचालिका म्हणून जाहीर झाल्या.

पहिल्या दिवशी टीम एची सिंहासनावर बसण्याची वेळ होती त्यामुळे शिव पहिल्यांदा त्यावर बसला आणि रुपाली त्याला संरक्षण देत होती. टीम बीने त्याला सिंहासनावरुन उठवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले पण तो काही केल्या उठला नाही. शिवच्या अंगावर तीन लोकं बसून सुद्धा राहीले, संचालिकेला सांगून पण काही होत नाहीये म्हटल्यावर अखेर खुद्द बिग बॉस यांनी हे चुकीचं असल्याचं जाहीर करता टीम बीचे सदस्य सिंहासनावरुन खाली उतरले.

अखेर शिव शेटचा बझर होईपर्यंत आसनावर बसल्यामुळे तो जिंकलं हे जाहीर झालं. नंतर वेळ आली किशोरी यांच्या आसनावर बसण्याची. त्यांना सुद्धा तिथून उठवण्यासाठी बरेच प्रयत्न करताना टीम बी दिसली. पण त्यासुद्धा उठल्या नाहीत आणि त्यासुद्धा जिंकल्याचं जाहीर झालं. यावर टास्कचा पहिला दिवस तर संपला पण घरात टास्कमध्ये जे झालं होतं त्यामुळे नवीन वाद निर्माण होताना दिसले. परागने टीम बीला विनंती केली की रुपालीचं नाव उगाच बदनाम करु नका पण टीम बी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती आणि यावर खूप मोठा वाद घरात होताना दिसला. या गोंधळाच्या नोटवरंच एक दिवस घरात संपताना दिसला.

एक नवीन दिवस घरात सुरु झाला तोच आधीच्या दिवसात झालेल्या वादाच्या चर्चेवर. नंतर लगेचंच टास्कची सुरुवात झाल्याचं जाहीर होताच टीम ए मधून पराग आसनावर बसला. त्यानंतर टीम बी पेटलीच, परागला आसनावरुन उठवण्यासाठी परागला प्रचंड त्रास दिला जात होता. बळाचा वापर होत असताना सुद्धा संचालिका काहीही बोलत नव्हत्या. अखेर बिग बॉस यांनी नेहा हिला कन्फेशन रुममध्ये बोलवून बळाचा वापर करु नये असं सांगितलं तरीपण टीम बी काही केल्या ऐकत नव्हती.

परागला आसनावरुन अक्षरशः खाली ओढून काढलं गेलं त्यानंतर सगळेच खवळले आणि सगळे आक्रमक झालेले दिसले. अखेर बिग बॉस यांनी टास्क रद्द केला. टास्क दरम्यान परगच्या हातून नेहाला लागलं असल्याचं बोललं जात आहे ज्यावर आजच्या भागात बिग बॉस कारवाई करताना दिसणार आहेत. पण परागला घरातून काढून टाकलं जाणार की यावर काही वेगळी शिक्षा होणार हे आजच्या भागात स्पष्ट होईलं. शिवाय या सगळ्यावर होस्ट महेश मांजरेकर काय शाळा घेतात ते पाहणं ही रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी 2: 'टिकेल तो टिकेल' टास्कमधले वाद टोकाला, टास्कमध्ये बळाचा वापर आणि शारीरिक हिंसा Description: Bigg Boss Task turns Worse: बिग बॉस मराठीमधील टास्कमध्ये वाद होणं हे काय नवी गोष्ट नाहीये पण 'टिकेल तोच टिकेल' टास्क भलताच टोकाला गेला. इतकं की वाद तर झालेच, बळाचा वापर ही झालेला दिसला आणि शारीरिक हिंसा पण.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola