बिग बॉस मराठीच्या घरात कोणाविरूद्ध आखणार आज शिव, अभिजीत आणि वैशाली योजना?

मालिका-ए-रोज
Updated Jul 12, 2019 | 13:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Shiv-Abhijeet-Vaishali’s plan: बिग बॉस घरात आज एक डाव भुताचा हा टास्क पुढे सरकेल. तर नेहमीप्रमाणे टीम शिव, वैशाली आणि अभिजीत या स्पर्धकांविरूद्ध योजना आखताना दिसतील. माधव-अभिजीतचं पण बिनसेल.

Bigg Boss Marathi 2 Vaishali Abhijeet and Shiv plan and plot for Ek Daav Bhutacha
बिग बॉस मराठी घरात कोणाविरुद्ध आखणार आज शिव, अभिजीत आणि वैशाली योजना? 

थोडं पण कामाचं

  • शिव, अभिजीत आणि वैशाली या स्पर्धकांच्या विरोधात आखणार योजना
  • माधव-अभिजीतचं एका पॅन्टवरून बिनसणार
  • अखेर आज मिळणार पुढच्या आठवड्याचे कॅप्टन्सी उमेदवार

मुंबई: बिग बॉस मराठी २ घरात कालच्या भागात एक डाव भुताचा हा साप्ताहिक टास्क जाहीर झाला. त्यात दोन टीम निवडल्या गेल्या ज्यामध्ये टीम ए मध्ये रूपाली, नेहा, माधव आणि हिना एकत्र आले. टीम बी मध्ये वैशाली, अभिजीत, शिव आणि वीणा एकत्र आले आणि किशोरी या टास्कच्या संचालिका म्हणून जाहीर झाल्या. टास्कच्या पहिल्या दिवशी टीम बी भूतं झाली तर टीम ए शिकारीच्या भूमिकेत दिसली. त्यात पहिल्या बजरनंतर अभिजीत, शिव आणि वीणा आपआपल्या बाहुल्या घेऊन भुतांच्या सेफमध्ये पोहचले तर वैशाली पोहचू शकली नाही आणि टास्क आणि कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर झाली. आज हाच टास्क पुढे सरकताना दिसेल. त्यात नेहमीप्रमाणे टीम बीमधील शिव, अभिजीत आणि वैशाली काही योजना आखताना दिसतील.

काल टास्क सुरू असतानाच टीम बीमध्ये नेहा आणि हिनावरून चर्चा रंगली होती. की उद्या समोरची टीम भूतं झाल्यावर या दोघींना काही केल्या सेफमध्ये पोहचू द्याचं नाही. तिच चर्चा आजही शिव, अभिजीत आणि वैशालीमध्ये रंगेल. या टीमला टीम ए मधून नेहा आणि हिनाला अजिबात कॅप्टन होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे अभिजीत म्हणताना दिसेल की त्यानं कालच विचार करून ठेवला आहे की नेहा आणि हिनाच्या बाहुल्या कुठे लपवायच्या आहेत. पुढे तो या दोघांना सांगताना दिसेल की गार्डन एरियामधील कॅमेराच्यावर, तुळशीच्या खाली असलेल्या खड्ड्यात वगैरे ठिकाणी लपवू शकतो. यावरून आजसाठी ते सज्ज होताना तर दिसतीलच पण नेहा आणि हिनावर असलेला त्यांचा रोष पुन्हा एकदा अधोरेखित होईल.

ही सगळी टास्कची चर्चा झाल्यावर अभिजीत आणि माधवमध्ये थोडाफार मतभेद निर्माण होईल. काल टास्कमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केलं की भुतांच्या टीमनं काळे तर शिकारी टीमनं पांढरे कपडे घालणं अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येकानं तसाच पेहराव केला. आज टीम बीची शिकारी बनण्याची पाळी असेल पण अभिजीतकडे पांढरी पॅन्ट नसल्यानं तो माधवकडे पॅन्ट मागताना दिसेल. पण माधवकडे असलेल्या दोन पॅन्टपैकी एक त्यानं टास्क दरम्यान वापरल्याने ती खराब झालेली असणार आणि ती खराब झाली म्हणून दुसरी पांढरी पॅन्ट ही होईल ही चिंता माधवच्या डोक्यात येईल. तो पॅन्ट देण्यास नकार देईल, त्यावर अभिजीत त्याला त्याची फार धावपळ नाही आहे तर ती नाही होणार फार खराब असं पटवताना दिसेल.

यावर माधवचं त्याने फार धावपळ केली नाही तरी त्याची पॅन्ट खराब झाली असं कारण असेल. यावर अभिजीत हा विषय सोडून देईल आणि थोडा चिडून तिथून निघून जाईल. हा विषय माधव किशोरी आणि नेहासोबत बोलताना हे सगळं सांगेल आणि म्हणताना दिसेल की जर अभिजीत म्हणाला असता की खराब झाली तर तो ती धुऊन देईल तर मी लगेच दिली असती पॅन्ट. काल हिनाला खाण्यावरून फार सुनावलं तेव्हा अभिजीतचं म्हणणं होतं की विचारायची पद्धत चुकीची होती, तसंच अभिजीतनं आता योग्य पद्धतीने विचारतो तर मी नक्कीच दिली असती असं माधवचं मत असेल. अशा पद्धतीत आज बऱ्याच गोष्टी घरात रंगतील पण त्यामधूनच पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सी उमेदवारांची नावं सुद्धा समोर येताना दिसतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठीच्या घरात कोणाविरूद्ध आखणार आज शिव, अभिजीत आणि वैशाली योजना? Description: Bigg Boss Marathi Shiv-Abhijeet-Vaishali’s plan: बिग बॉस घरात आज एक डाव भुताचा हा टास्क पुढे सरकेल. तर नेहमीप्रमाणे टीम शिव, वैशाली आणि अभिजीत या स्पर्धकांविरूद्ध योजना आखताना दिसतील. माधव-अभिजीतचं पण बिनसेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola