बिग बॉस मराठी २च्या घरात आज ‘एक डाव भुताचा’ टास्क जाहीर होताच घर होणार भयावह

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2019 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 2 Ek Daahv Bhutacha Task: बिग बॉस घरात आठवडा संपत आला की साप्ताहिक टास्क जाहीर होतो. ज्याचा परिणाम पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीवर होतो. असाच एक डाव भुताचा टास्क आज जाहीर होईल आणि धमाल रंगेल.

Bigg Boss Marathi 2 weekly task Ek Dhaav Bhutacha to be played today in the house
बिग बॉस मराठी २च्या घरात आज ‘एक डाव भुताचा’ टास्क जाहीर होताच घर होणार भयावह 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस घरात आज 'एक डाव भुताचा' टास्क होणार जाहीर
  • टास्कसाठी पुन्हा निवडल्या जाणार दोन टीम
  • टास्कमध्ये ठरणार पुढच्या आठवड्यातील कॅप्टन्सीचे उमेदवार

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात दर आठवड्याला नवनवीन टास्क रंगत असतात आणि त्यातून खूप मनोरंजन होताना दिसतं. आठवडा संपत आला की घरात साप्ताहिक टास्क जाहीर होतो आणि त्यातून नाट्य तर घडतंच पण त्याचसोबत त्यातून पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठीच्या उमेदवारांचा अंदाज घेता येतो. आज असंच एक धमाल साप्ताहिक टास्क बिग बॉस घरात रंगणार आहे. एक डाव भुताचा जाहीर होताच सगळेच स्पर्धक कंबर कसून त्यात भाग घेताना दिसतील. पण आज घराचा माहोल काही वेगळाच असणार आहे. कारण आज घरात एक भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे.

घरात एक डाव भुताचा या टास्कसाठी गार्डन एरियामधील व्यायाम शाळेच्या जागेत एक भुतांचा सेफ उभारण्यात येणार आहे. तर त्याच्या समोर एक वेगळी खोली उभाराली जाणार आहे. यामध्ये सुद्धा दोन टीम निवडल्या जातील. ज्यात एक टीम आज भूत तर एक टीम उद्याच्या भागात भुताची भूमिका पार पाडले. आज भूत बनलेल्या टीमला बझर वाजल्यावर बनवलेल्या खोलीतून भुतांसाठी बनवलेल्या सेफमध्ये पोहोचायचं आहे. अर्थात दुसरी टीम त्यांच्यासाठी अडथळा निर्माण करणार हे तर अगदी उघड आहे. तर हे अडथळे पार करत जो स्पर्धक त्या सेफमध्ये बझर वाजल्यावर पोहचणार नाही तो पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सी रेसमधून बाहेर होईल. यात नवीन वाद नवीन ड्रामा रंगणार हे काही वेगळं सांगायला नको. यामध्ये कोणती टीम बाजी मारते त्यावरून पुढचा गेम आखायला सुरूवात होईल.

या प्रत्येक स्पर्धकाच्य नावाच्या बाहुल्या सुद्धा बनल्या जाणार आहेत. जो बाहेर होईल त्याच्या नावाची बाहुली सुद्धा बाहेर जाईल असं टास्क मध्ये होताना दिसेल. यात आज कोणत्या टीम एकत्र येणार आणि काय नवीन नाट्य घडणार ते आज स्पष्ट होईलंच. पण सध्याची घरातली परिस्थिती बघता माधव-नेहा-रूपाली आणि हिना अशी एक टीम बनेल तर वैशाली-शिव-वीणा-अभिजीत अशी एक टीम बनेल तर किशोरी यंदा संचालिकेच्या भूमिकेत असतील असं वाटत आहे. 

 

सध्या सगळ्यांच्याच नात्यातील गणितं बदलली आहेत. पण त्यातल्या त्यात अभिजीत-वैशाली-शिव अजूनही एकत्र आहेत. तर शिवसोबत खास मैत्री असलेल्या वीणाचं सुद्धा त्यांच्याशी पटतं त्यामुळेच कॅप्टन्सी टास्कच्या वेळी यांची एक टीम झालेली दिसली. तर दुसरीकडे नेहा-माधव-हिना यांचं त्रिकुट ही गेममध्ये टिकून आहे आणि नेहा आणि हिनासोबत सध्या रूपालीचं चांगलं जमत आहे त्यामुळे हे सुद्धा कॅप्टन्सी टास्कमध्ये एकत्र आणले गेले. त्यात सध्या किशोरी यांना फारंच एकटं पाडलं जात आहे त्यामुळे त्यांचा अंदाज बांधणं जरा कठीण आहे सध्या. त्यामुळे या सगळ्यात आज या खेळात काय होतं आणि कोण पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सी रेसमधून बाहेर होतं ते पाहणं रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी २च्या घरात आज ‘एक डाव भुताचा’ टास्क जाहीर होताच घर होणार भयावह Description: Bigg Boss Marathi 2 Ek Daahv Bhutacha Task: बिग बॉस घरात आठवडा संपत आला की साप्ताहिक टास्क जाहीर होतो. ज्याचा परिणाम पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीवर होतो. असाच एक डाव भुताचा टास्क आज जाहीर होईल आणि धमाल रंगेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles