Bigg boss marathi 3 । यामुळे टीमवर सुरेखाताई नाराज...

बिग बॉस मराठीच्या घरात टास्क दरम्यान सदस्य एकमेकांवर नाराज नाही झाले किंवा त्यांच्यात मतभेद नाही झाले असे कमीच दिसून येते. काही ना काही कारणास्तव वाद विवाद हे होतातच.

Bigg boss marathi 3 day 17 Surekha kudchi angry
यामुळे टीमवर सुरेखाताई नाराज... 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस सतरावा
  • गायत्रीने केली आदिशची नक्कल
  • “तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही”  - स्नेहा वाघ

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात टास्क दरम्यान सदस्य एकमेकांवर नाराज नाही झाले किंवा त्यांच्यात मतभेद नाही झाले असे कमीच दिसून येते. काही ना काही कारणास्तव वाद विवाद हे होतातच. असं काहीसं होताना आज पुन्हा एकदा दिसून येणार आहे असं वाटतं आहे. टास्कच्या मध्ये टीममधील चर्चेत सुरेखा ताई थोड्या नाराज असल्याचे दिसून येणार आहे. सुरेखाताईंनी टीमला विचारले, “तुमचं काय ठरतयं मग.  कसं करायचं”.  यावर मीनल म्हणाली, “जेव्हा बजर वाजेल तेव्हा आपण निर्णय घेऊ काय करायचे. आता मी विचारत होते याची काय चर्चा झाली. तेव्हा उत्कर्ष त्याला कुठे ना कुठे convince करण्याचा प्रयत्न करतो आहे तू ये तुला सेफ करू. उत्कर्षचं हेचं सुरू आहे तो प्रत्येकाला वेगवेगळी कहाणी सांगतो आहे. त्यावर तृप्तीताई म्हणाल्या, “पण आता तर ते म्हणाले की त्यांनी विकासला सांगितला सुरेखाताईंना पाठवा”.  त्यावर विकास म्हणाला “दादुस आमचं ठरलेलं आहे”. त्यानंतर प्रत्येकाने त्यांची त्यांची नावं नावं दिली... मीनलने आविष्कारचे नाव घेतले, तृप्ती देसाई यांनी सुरेखाताईंचे नाव घेतलं, विशाल म्हणाला आविष्कार. बहुमताने आविष्कार दारव्हेकरच नाव पुढे आल्यामुळे सुरेखा ताई म्हणाल्या मला माहिती होतं हे म्हणूनच....” आता नक्की काय झालं ? कळेलच.


“आदिश कॉमेडी आहे”- उत्कर्ष गायत्रीने केली आदिशची नक्कल

बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पुर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे. दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. काल जय आणि आदेशमध्ये खूप मोठा राडा झाला. आदिश घरामध्ये आल्यापासून घरातील काही सदस्यांचे त्याच्याविषयीचे मत बरं नाही असे दिसून येत आहे. काल त्यावर चर्चा झालीच आणि आजदेखील होणार आहे. जय, स्नेहा, गायत्री आणि उत्कर्ष त्याच्याविषयी बोलताना दिसणार आहेत.


 
जय गायत्रीला सांगणार आहे, “एक खरं बोलू का गायत्री, आवडतं मला तुझं अॅटीट्यूड”. गायत्री म्हणाली, “माझ्या फ्रेंडला कोणी काही बोल तर मी तोंडावर बोलणार. उत्कर्ष म्हणाला, “तो कॉमेडी” आहे, जयचं पण म्हणण पडलं कसा चालतो तो बघितलं का ? जसा काही हा कोणी सव्वाशेर, खरंच कॉमेडी आहे...गायत्री तो कसं चालतो याची नक्कल करून दाखवणार आहे. स्नेहा म्हणाली, “मी त्याच्याकडे बघून बोलत नव्हते तर तो मला बोला तू माझ्याकडे बघत पण नाहीये. उत्कर्ष म्हणाला, “त्याचा हा सगळा दिखावा आहे”. इथे सगळ्यांना वाटतं आहे दोन दिन की चांदी है ! बघूया पुढे या चर्चे मध्ये काय काय बोललं गेलं आजच्या भागामध्ये.


स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय डावपेच आखणार ?


मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे नॉमिनेशन कार्य. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे. आणि जीपमध्ये बसलेले सदस्य आहेत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. उत्कर्षचं म्हणण आहे स्नेहा म्हणत आहेत दोघी. आता स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणता डावपेच आखणार ? जयची साथ स्नेहाला मिळेल ? जाणून घेण्यासाठी बघा आजचा बिग बॉस मराठीचा भाग.


 
याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी. आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी तर काही त्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गृपमध्ये नकारात्मक भावना आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जय नंतर आता स्नेहा आणि आदिश मध्ये देखील वाद होणार आहे. एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे पण, त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे असं दिसत आहे. काही ना काही मुद्द्यांवरून खटके उडायला सुरुवात झाली आहे. आदिशचं म्हणण आहे “तुझं वैयक्तिकरित्या इरिटेशन असेल तर... पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलतो आहे ते देखील काऊंट होणार आहे”. यावर स्नेहाचे म्हणणे आहे “तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही तुम्हाला असं वाटतं असेल मी तुमच्याकडे यावं प्रतिक्रिया मागायला तर तसं होणार नाहीये. मी काय विचारू”. या नंतर आदिशने देखील विचारले काय? त्यानंतर हा वाद वेगळाच दिशेला गेला. बघूया नक्की काय झालं पुढे ते आजच्या भागामध्ये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी