Bigg boss marathi 3 बिग बॉसकडून घरातील काही सदस्यांना मिळाली कठोर शिक्षा...

Bigg boss marathi 3 ।  बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या घारतील काही सदस्यांनी नियमभंग देखील केले

Bigg boss marathi 3 Some members of the household received harsh punishment from Bigg Boss ...
बिग बॉसकडून घरातील काही सदस्यांना मिळाली कठोर शिक्षा...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 24!
  • विशाल, स्नेहा आणि गायत्री बिग बॉसकडून थेट नॉमिनेट !
  • बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले.

Bigg boss marathi 3 ।  मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या घारतील काही सदस्यांनी नियमभंग देखील केले. आणि याचमुळे बिग बॉस यांनी सदस्यांची कडक शब्दात केवळ कानउघडणीच नाही केली तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणाम देखील भोगावे लागले. कुठलेही कार्य पार पाडताना वेगवेगळया युक्त्या वापरणे योग्यच असते. पण, ते पार पाडत असताना धक्काबुक्की होणे, कुठल्याही सदस्याला शारीरिक इजा होणे अतिशय निंदनीय आहे.

बिग बॉस यांनी जय, उत्कर्ष, विकास आणि आदिशला सक्त ताकीद दिली. तर, विशाल निकमने काल बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टिचे नुकसान केले आणि त्यामुळे या कृत्याचा बिग बॉस यांनी तीव्र शब्दात निषेध केला. प्रॉपर्टिचे नुकसान ही अक्षम्य चूक असल्याने विशालला बिग बॉस यांनी शिक्षा म्हणून पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले. ताकीद दिल्यानंतर देखील काही सदस्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आली. हे कार्य खिलाडूवृत्तीने खेळायचे होते. पण तसे नाही झाले.

आक्रमकता आणि धक्काबुक्की कार्यामध्ये केली गेली. ही वागणूक लज्जास्पद असून बिग बॉस यांनी घरातील सर्व सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. बिग बॉस यांनी साप्ताहिक कार्य रद्द केले. तर गायत्री आणि स्नेहा रागावरचे नियंत्रण गमावून आक्रमक झाल्या ज्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होऊ शकत होती आणि बिग बॉस यांना हे अमान्य आहे. आणि म्हणूनच त्या दोघींना देखील पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले.
 
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्नेहा आणि जयची मस्ती बघायला मिळणार आहे. त्यांच्यामधील मैत्रीची चर्चा तर सगळीकडेच आहे. बघूया आज काय होणार घरामध्ये. आज घरामध्ये कॅप्टन कोण बनणार याची उत्सुकता सगळ्यांन लागून राहिली आहे. कारण, कालच्या भागामध्ये दाखविल्याप्रामाणे आज एका कार्याद्वारे घरातला कॅप्टन कोण हे आपल्याला समजणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी