Bigg Boss Marathi तृप्ती देसाई घराबाहेर

Bigg Boss Marathi 3 Trupti Desai Evicted बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये एक मोठा खेळाडू घराबाहेर पडला आहे. आज (रविवार ७ नोव्हेंबर २०२१) झालेल्या 'इव्हिक्शन'मध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई घराबाहेर पडल्या.

Bigg Boss Marathi 3 Trupti Desai Evicted
Bigg Boss Marathi तृप्ती देसाई घराबाहेर 
थोडं पण कामाचं
  • Bigg Boss Marathi तृप्ती देसाई घराबाहेर
  • ५० दिवसांनंतर तृप्ती देसाई घराबाहेर
  • महिलांच्या हक्कांसाठी आंदोलनं सुरू राहतील आणि बलात्कारमुक्त महाराष्ट्र ही नवी मोहीम हाती घेणार - तृप्ती देसाई

Bigg Boss Marathi 3 Trupti Desai Evicted मुंबईः बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये एक मोठा खेळाडू घराबाहेर पडला आहे. आज (रविवार ७ नोव्हेंबर २०२१) झालेल्या 'इव्हिक्शन'मध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई घराबाहेर पडल्या. तब्बल ५० दिवसांनंतर तृप्ती देसाई घराबाहेर पडल्या.

मागील आठवड्यात झालेल्या एका टास्कमध्ये ज्यांना 'नॉमिनेट' करायचे आहे अशा खेळाडूंचे फोटो व्हाइट बोर्डवर आणि इतरांचे फोटो तोरणावरील पानांवर लावायचे होते. या टास्कमध्ये कॅप्टन स्मिता वाघला चार खेळाडूंना 'नॉमिनेट' करण्यास 'बिग बॉस'ने सांगितले. यानंतर आलेल्या प्रत्येक खेळाडूला 'नॉमिनेट' झालेल्या चौघांपैकी फक्त दोन जणांचे फोटो तोरणावरील फोटोंसोबत 'एक्सचेंज' (अदलाबदली) करण्याची परवानगी होती. या टास्कमध्ये सर्वात शेवटी आलेल्या उत्कर्षने सोनाली घराबाहेर जावी या हेतूने फोटोंची अदलाबदली केली. यामुळे व्हाइट बोर्डवर मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई या खेळाडूंचे फोटो राहिले. विशाल निकमला उत्कर्षने आधीच टेम्पटेशन टास्कमध्ये नॉमिनेट केले होते. यामुळे विशाल निकम, मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे पाच खेळाडू 'नॉमिनेट' झाले. यापैकी तृप्ती देसाई घराबाहेर पडल्या. 

बाहेर पडताना तृप्ती देसाई यांनी घरात राहिलेल्या स्पर्धकांना काळजी घ्या आणि छान खेळा असा प्रेमाचा सल्ला दिला. बिग बॉस मराठीचे 'होस्ट' महेश वामन मांजरेकर यांच्याशी बोलताना तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पुढील योजनांची माहिती दिली. महिलांच्या हक्कांसाठी आंदोलनं सुरू राहतील आणि बलात्कारमुक्त महाराष्ट्र ही नवी मोहीम हाती घेणार आहे; असे तृप्ती देसाई यांनी सांगितले. लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे, असे सूतोवाच तृप्ती देसाई यांनी केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी