Minal Shah : 'बिग बॉस मराठी' फेम मीनल शाहला कोरोनाची लागण, इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली माहिती

मालिका-ए-रोज
Updated Jan 16, 2022 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Minal Shah with Corona Positive : मीनल शहाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

'Bigg Boss Marathi' fame Meenal Shah infected with corona
मीनल शाह कोविड पॉझिटिव्ह, इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली पोस्ट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मीनल शाहला कोरोनाची लागण
  • मीनल शाह बिग बॉस मराठी सीझन 3 ची टॉप 5 स्पर्धक
  • इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करत दिली माहिती


Minal Shah with Corona Positive : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हिंदीप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत आणि स्मॉल स्क्रीनमध्येही वाढताना दिसत आहे. एकपाठोपाठ एक कलाकरांना कोरोनाची लागण होत आहे. आता आणखी एका सेलिब्रिटीची यात भर पडली आहे. 'बिग बॉस मराठी'  (Bigg Boss Marathi) फेम मीनल शहालासुद्धा  (Meenal Shah) कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. चाहते तिला लवकर ठीक वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत. 
 
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची टॉप 5 स्पर्धकांपैकी एक असलेली मीनल शाह. मीनल शाहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.  मीनल शाहने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत लिहिलं आहे, 'माझा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा आठवडा माझ्यासाठी खूपच त्रासदायक आणि परीक्षा पाहणारा आहे. खूप कठीण. मला सध्यातरी बरं वाटत आहे. मी होम क्वारंटाईन आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं मी पालन करत आहे.'असं मीनल शाहने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

मीनल शाहच्या आधी बिग बॉस मराठीचा स्पर्धक आदिश वैद्यलाही कोरोनाची लागण झाली होती. आदिशनेही इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती त्याच्या चाहत्यांशी शेअर केली. आदिशसुद्धा होम क्वारंटाईनचं होता. आदिश आणि मीनल यांनी बिग बॉसच्या घरात खूप धमाल केलेली आपण पाहिली असेचल. सोना, मोना आणि टोनाची ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. सोना म्हणजे अर्थातच सोनाली पाटील, मोना म्हणजे मीनल शाह आणि टोना म्हणजे आदिश वैद्य होय. 

बॉलिवूड नंतर मराठी चित्रपटसृष्टीत आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी वेबसीरिज क्वीन मिथीला पालकर, आई कुठे काय करते या मालिकेतील संजना अर्थातच रुपाली भोसले, गौतमी देशपांडे, जितेंद्र जोशी, अशा अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या साऱ्यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं सर्वजण तंतोतंत पालन करत आहेत. हे कलाकार सध्या होम क्वारंटाईन असल्याचीही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या धसक्याने मालिकांच्या सेटवरही योग्य ती खबरदारी घेऊनच शूटिंग सुरु आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी