बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक झाली शाळकरी मुले आणि घेऊ लागले एकमेकांची शाळा

मालिका-ए-रोज
Updated Jun 11, 2019 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi a fun task announced: बिग बॉस मराठी2च्या घरात आता एक नवीन टास्क जाहीर होणार आहे. आणि घरातली भांडणं बाजूला सारत स्पर्धक धमालमस्ती करताना दिसतील असं वाटतंय. नेमकं काय आहे हे टास्क वाच सविस्तर.

Bigg Boss Marathi new fun task contestants become school students
बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक झाले शाळकरी मुलं आणि घेऊ लागले एकमेकांची शाळा 

मुंबई: बिग बॉस मराठी 2च्या घरात नवीन आठवड्याची सुरुवात झाली आणि नॉमिनेशन टास्क जाहीर झालं. त्यामधून पराग, किशोरी, दिगंबर आणि नेहा घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. तर घरात अनेक नियम भंग केल्याने अजून दोन स्पर्धक माधव आणि बिचुकले सुद्धा नॉमिनेट झाले. आता मात्र घरात जरा काहीतरी हटके होताना दिसणार आहे. एरवी एकमेकांवर कुरघोडी करणारे हे सगळे स्पर्धक एकमेकांची शाळा घेताना दिसतील. कारण बिग बॉस यांनी या आठवड्यासाठी साप्ताहिक टास्क जाहीर केला आहे. शाळा सुटली पाटी फुटली हा टास्क जाहीर होताच घरात उत्साहाचं वातावरण पहायला मिळेल हे नक्की.

जून महिना उजाडताच विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागतात. तर जे आता नोकरीसाठी जातात त्यांच्या जूनमधल्या शाळेच्या आठवणी नक्कीच डोकावत असतील. असंच वातावरण आता बिग बॉस मराठी घरात रंगणार आहे. या नवीन शाळा सुटली पाटी फुटली टास्कमध्ये एक टीम मधील सदस्य विद्यार्थी तर दुसऱ्या टीम मधील सदस्य शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका टीममध्ये किशोरी, पराग, वीणा, शिव, सुरेखा, रुपाली आणि वैशाली आहेत तर दुसरी टीम विद्याधर, माधव, शिवानी, दिगंबर, अभिजीत, नेहा आणि बिचुकलेंची असेल. यातली पहिली टीम पहिल्या दिवशी शिक्षक असतील तर दुसरी टीम शाळकरी मुलांची भूमिका पार पाडणार आहे.

प्रत्येक शिक्षकाला नेमून दिलेला विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिकवणे अपेक्षित आहे. या विषयाची नेमणूक पण अगदी धमाल पद्धतीत केली गेली आहे. सुरेखा पुणेकर यांनी नृत्यकला, विणा जगताप हीने वाद विवाद शास्त्र आणि शिवने मराठी हे विषय विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत. तर किशोरी शहाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका असतील. शिवचं मराठी थोडं कच्च आहे त्यामुळे त्याच्या तासाला धमाल येणार आहे नक्कीच.

तर सगळेच स्पर्धक द्वाड मुलं म्हणून वावरतील आणि शिक्षकांना निरागस त्रास देताना दिसतील त्यामुळे या टास्कमध्ये एक वेगळीच धमाल येताना दिसेल असं सध्या तरी वाटत आहे. या टास्कमध्ये तरी या सगळ्यांमधले वाद विकोपाला जाणार नाहीत आणि त्यातून नको ते टोक गाठले जाणार नाही अशी आशा करुयात. कारण हे एक धमाल टास्क आहे आणि ते त्या पद्धतीने खेळलं गेलं तर फारंच रंजक वाटेल. पण हे बिग बॉसचं घर आहेच असं जिथे टास्कमध्ये वाद झाले नाहीत तरंच नवल. असो ते काही असलं तरी या टास्कमध्ये नेमकं काय होतं आणि त्यातून काय धमाल घडते ते पहायला मज्जा येणार आहे हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक झाली शाळकरी मुले आणि घेऊ लागले एकमेकांची शाळा Description: Bigg Boss Marathi a fun task announced: बिग बॉस मराठी2च्या घरात आता एक नवीन टास्क जाहीर होणार आहे. आणि घरातली भांडणं बाजूला सारत स्पर्धक धमालमस्ती करताना दिसतील असं वाटतंय. नेमकं काय आहे हे टास्क वाच सविस्तर.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles