“माझ्या घरचे संस्कार काढायचे नाही” नवीन टास्कमध्ये कडाक्याचं भांडण

मालिका-ए-रोज
Updated Jun 11, 2019 | 17:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi new fight between Shiv- Neha: बिग बॉस मराठी 2च्या घरात लवकरच शाळा सुटली पाटी फुटली टास्क रंगणार आहे. हे एक धमाल टास्क असणार आहे. पण यात नेहा आणि शिव यांच्यात बाचाबाची होताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi new task new fight in the house
“माझ्या घरचे संस्कार काढायचे नाही” म्हणत नेहाने शिवला खडसावलं, नवीन टास्कमध्ये कडाक्याचं भांडण  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठी 2च्या घरात नुकतंच या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क बीबी मिठाईवाला पार पडलं आणि या आठवड्यासाठी 6 स्पर्धक नॉमिनेट झाले. ज्यात 4 टास्कमधून तर 2 घरातले नियम भंग केल्यासाठी बहुमताने असं निवडले गेले. यानंतर आता घरात लवकरच या आठवड्याचं साप्ताहिक टास्क सोपवण्यात येणार आहे. शाळा फुटली पाटी फुटली असं या टास्कचं नाव असून यात संपूर्ण घर शाळेत रुपांतरीत होणार आहे. ज्यासाठी दोन टीम घरात पाडल्या जातील एक टीम शिक्षक तर दुसरी टीम शाळकरी मुलांच्या भूमिकेत असतील. त्यामुळे हे एक धमाल टास्क असेल हे नक्की. इतर टास्कपेक्षा हे टास्क जरा हटके आणि मजेशीर असेल. पण असं असताना सुद्धा बिग बॉस घरात वाद झाला नाही तरंच नवल. आणि तसंच झालं आणि नेहा आणि शिवमध्ये बाचाबाची सुरु झाली.

शाळेचा टास्क आहे आणि एक टीम शाळेतली मुलं बनली आहेत आणि लहान मुल म्हणजे खोड्या काढणारच. अशीच एखादी खोडी केल्यासाठी नेहाला टास्कमध्ये कान पकडून उभ रहाण्याची शिक्षा मिळाली आहे, पण ही शिक्षा सुरु असताना सुद्धा नेहा द्वाडपणा करत होती आणि शिक्षा तोडून मस्ती करत असताना शिवने तिला पाहिलं. शिव हा शिक्षकाच्या भूमिकेत होता आणि शाळेत शिक्षक करतात तसं शिवने तिला खडू फेकून मारला. यावर नेहाने बिग बॉसला तक्रार केली कि शिवने हिंसा केली आणि टास्कमध्ये शारीरिक हिंसा चालली आहे.

मग यावर शिवसुद्धा त्याची बाजू मांडताना दिसला. त्याने यावर शिवने देखील उत्तर दिले कि, “आता जर हिने गुन्हा केला तर हिला शाळेतून बाहेर काढाव लागेल...” पुढे नेहमी प्रमाणे शब्दाला शब्द वाढत गेला. आणि वाद टोकाला गेला जेव्हा शिव म्हणाला, “घरचे संस्कार जर नीट असेल तर मुलं चांगली राहतात” हे ऐकताच नेहाचा राग अनावर झाला. यावर नेहाने आक्षेप घेतला कि, “कोणालाही माझ्या घरच्या संस्कारांवर जाण्याचा अधिकार नाही. शिवने माझी नाही माझ्या घरच्यांची माफी मागावी” ज्यासाठी शिवने नकार दिला. यानंतर किशोरी शहाणे यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आता यातून हे दोघं शांत होतात की हे भांडण विकोपाला जातं हे आज कळेलंच. या धमाल टास्कमध्ये छान गंमत येणार असं वाटत असताना हे टास्कमधलं पहिलं भांडण पुढे नवीन भांडणांचा सिलसिला सुरु करणार का ते बघावं लागेल. या भांडणासोबत टास्कमध्ये काही धमाल क्षण ही पहायला मिळणार आहेत जसं किशोरी यांनी बिचुकले यांना त्यांचे नाव विचारताच माधव आणि बिचुकले मधील मजेशीर संवाद घडताना दिसेल.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
“माझ्या घरचे संस्कार काढायचे नाही” नवीन टास्कमध्ये कडाक्याचं भांडण Description: Bigg Boss Marathi new fight between Shiv- Neha: बिग बॉस मराठी 2च्या घरात लवकरच शाळा सुटली पाटी फुटली टास्क रंगणार आहे. हे एक धमाल टास्क असणार आहे. पण यात नेहा आणि शिव यांच्यात बाचाबाची होताना दिसणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles