‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या वहिल्या टीझरची झलक, महेश मांजरेकरांचा गावरान लूक व्हायरल

मालिका-ए-रोज
Updated Apr 22, 2019 | 11:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big Boss: ‘बिग बॉस’ मराठीचा दुसरा सिझन लवकरच भेटीला येणार आहे. या सिझनचा पहिला वहिला टीझर नुकताच रिलीज केला गेलाय आणि यासोबत दिसतोय होस्ट महेश मांजरेकरचा गावरान अंदाज. या नवीन टीझरची झलक तुम्ही पाहिलीत का?

Bigg Boss Marathi Season 2 first teaser promo released, host Mahesh Manjrekars new look goes viral
‘बिग बॉस’ मराठीचा पहिला टीझर पाहिलात का? 

मुंबई: ‘बिग ब्रदर’ हा जगप्रसिद्ध रिऍलिटी शो भारतात ‘बिग बॉस’ म्हणून आणला गेला आणि अनेक भाषांमध्ये लोकप्रिय ठरल्यावर अखेर गेल्या वर्षी मराठीत हा रिऍलिटी शो लॉन्च केला गेला. पहिल्या सिझनमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘बिग बॉस मराठी’ आता दुसऱ्या सिझनसाठी सज्ज झाला आहे. शोची पहिली झलक काही दिवसांपूर्वी दिली गेली, आता या दुसऱ्या सिझनचा पहिला वहिला टीझर रिलीज केला गेला आहे. या टीझरमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीत शोच्या एका कंटेस्टंटची थोडीफार ओळख करून दिली गेली आहे आणि ही ओळख करून देत टीझरच्या अगदी शेवटाकडे दिसतात ते शोचे लाडके होस्ट महेश मांजरेकर. पहिल्या सिझनमधल्या त्यांच्या हटके स्टाईल आणि अंदाजात प्रेक्षकांची मनं जिंकलेले महेश मांजरेकर होस्ट म्हणून दुसऱ्या सिझनमध्ये पण बहार आणणार हे या टीझरमधून स्पष्ट झालं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

हा पहिला टीझर एका कंटेस्टंटची माहिती तर देतो पण या माहितीने उत्सुक्ता ताणली जावी अशा पद्धतीने. हा कंटेस्टंट राजकारणातलं एक नावाजलेलं नाव असल्याचं दिसतं. एका गावात भरलेल्या सभेत हा तरूण राजकारणी दिसतो आणि त्याचा खडा आवाज लक्षवेधी ठरतो. त्यात महेश मांजरेकर या कंटेस्टंटची ओळख 'कवी मनसे' नेते अशी करून देतात. त्यामुळे कवी नेते की मनसे नेते असा गोंधळ अनेकांचा झाला. काहींनी हे नेते अभिजीत बिचुकाळे असतील असं अंदाज वर्तवला आहे तर काहींचं म्हणणं असं आहे की रामदास आठवले यंदा ‘बिग बॉस मराठी’ घरात दिसतील. या खास पहिल्या प्रोमोसाठी महेश मांजरेकर गावरान वेशात दिसतात. म्हणजे या नेत्याची ओळख करून देताना त्यांच्या प्रमाणं पेहराव, त्यामुळे पुढे जसजसे नवनवीन कंटेस्टंटची ओळख होणार तसतसे महेश मांजरेकरांचे वेगवेगळे लूक पहायला मिळणार असं दिसून येतंय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

गेल्या वर्षी 15 एप्रिल रोजी पहिल्या सिझनचा प्रिमिअर पार पडला तसंच या वर्षी शोच्या निर्मात्यांना 14 एप्रिल किंवा 21 एप्रिल रोजी शोची सुरूवात करायची होती. त्या अनुशंगाने शोची झलक एखादा महिना आधी दाखवायला सुरूवात ही झाली होती. पण देशात सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू असताना शो ऑन एअर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे हे सीझन पुढे ढकललं गेलं. पण आता या पहिल्या टीझरमुळे शो लवकरच सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या नवीन टीझरला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या नवीन टीझरने प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचवली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या वहिल्या टीझरची झलक, महेश मांजरेकरांचा गावरान लूक व्हायरल Description: Big Boss: ‘बिग बॉस’ मराठीचा दुसरा सिझन लवकरच भेटीला येणार आहे. या सिझनचा पहिला वहिला टीझर नुकताच रिलीज केला गेलाय आणि यासोबत दिसतोय होस्ट महेश मांजरेकरचा गावरान अंदाज. या नवीन टीझरची झलक तुम्ही पाहिलीत का?
Loading...
Loading...
Loading...