बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकले-शिवच्या डोक्यात शिरले 'हे' नवं खूळ

मालिका-ए-रोज
Updated Jun 13, 2019 | 12:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Shiv turns Astrologist: बिग बॉस मराठी घरात कधीही काहीही होऊ शकतं. तसंच विरंगुळा म्हणून बसले असताना मध्येच बिचुकलेंनी शिवच्या हस्तरेखा वाचण्यास सुरुवात केली. पुढे शिव हे खूळ घेऊन वीणाकडे गेला.

 Bichukale and Shiv turn astrologists inside Bigg Boss Marathi
बिग बॉस मराठी घरात भविष्यवाणी सांगत हस्‍तरेखा वाचण्‍याचे बिचुकले आणि शिवच्या डोक्यात शिरले नवीन खूळ 

मुंबई: बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना विविध टास्क दिले जातात, तसंच घरातली सगळी कामं सुद्धा त्यांना नेमून दिलेली असतात, पण कधी कधी हे सगळं झाल्यावर सुद्धा स्पर्धकांकडे बराच फावला वेळ असतो आणि त्यात घरात मनोरंजनाचं एकही साधन नसल्यामुळे या वेळात हे स्पर्धक नेमकं करतात काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.या प्रश्नाचं एक उत्तर म्हणजे हा घडलेला प्रकार. तर त्याचं असं आहे की, हे बिग बॉसचं घर म्हणजे इथे कधी काय होईल याचा नेम नसतो आणि त्यात गाठीशी असलेला फावला वेळ. याच पेचात अडकलेले अभिजीत बिचुकलेंनी मध्येच भविष्यवाणी वर्तवण्यास सुरुवात केली आणि घरात नवीन विरंगुळा मिळाला.

वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये अभिजीत बिचुकले, शिव आणि वैशालीसोबत बसलेले दिसत आहेत. जिथे ते म्‍हणताना दिसतात की, ते हस्‍तरेखा वाचून भविष्‍य सांगू शकतात. हे ऐकताच शिव उत्‍सुक होतो आणि बिचुकलेंना त्‍याच्‍या हस्‍तरेखा वाचण्‍यासाठी सांगतो. बिचुकले सुद्धा जोमाने तयार होतात आणि तडक शिवचा हात हातात घेऊन त्याच्या भविष्याचा अंदाज वर्तवायला सुरुवात करतात. थोडा विचार करुन बिचुकले म्‍हणतात, ''तुला पैसा खूप आवडतो आणि पोरींचा पण खूप नाद आहे तुला, जे तू दाखवत नाहीस''

त्यातंच पुढे शिवला विचारतात, ''तू पोलीस किंवा मिलिटरीमध्‍ये जायचा विचार केला होतास ना?'' शिव या अंदाजाला साफ नाकारतो आणि लगेच म्‍हणतो, ''नाही, बॉडी बनली म्‍हणून तुम्‍ही कुठच्‍या कुठे जुळवू नका.'' हे ऐकताच तिघंही हसतात आणि या धमाल मस्तीमध्ये तिघंही छान रमलेले दिसतात. इथे बिचुकले शांत बसत नाहीत तर बिचुकले पुढे म्‍हणतात, ''डान्‍स, डायरेक्‍शनचं काम कर, त्‍यात भविष्‍य आहे तुझं...कला क्षेत्रात आहे भविष्‍य तुझं''.

पण हस्‍तरेखा वाचण्‍याचे सत्र इथे थांबत नाही. शिव हे हस्तरेखेचं खूळ घेऊन वीणाकडे जातो. ती नेल पेन्टने तिचे सिपर रंगवण्‍यामध्‍ये व्‍यस्‍त असते, त्यातंच शिव तिला विचारतो, ''लहानपणी कधी डोक्‍यावर पडलेलीस का?'' आणि वीणा त्‍याला हो म्‍हणून प्रत्‍युत्‍तर देते. यावर शिव तिला चिडवायला लागतो आणि म्हणतो, ''तिथेच सगळा प्रॉब्‍लेम झाला आहे आणि तुला बिग बॉस हाऊसमध्‍ये कुठला क्‍यूट आणि हँडसम मुलगा भेटला आहे?''  

हे बोलून तो वीणा स्वतःकडे इशारा करत असतो पण वीणा पण भलतीच हुशार असल्याने ती पण हा इशारा न समजल्याचं दाखवते. गेले काही दिवस रुपाली-पराग पाठोपाठ वीणा आणि शिवची केमिस्ट्री सुद्धा हळू-हळू खुलताना दिसत हे. दोघं एकमेकांना बरेचदा चिडवताना दिसतात. आता ही नवीन लव्ह एँगलची सुरुवात आहे की घरात अधिक काळ टिकून राहण्याचा गेम प्लॅन ते तर कळेलंच लवकर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकले-शिवच्या डोक्यात शिरले 'हे' नवं खूळ Description: Bigg Boss Marathi Shiv turns Astrologist: बिग बॉस मराठी घरात कधीही काहीही होऊ शकतं. तसंच विरंगुळा म्हणून बसले असताना मध्येच बिचुकलेंनी शिवच्या हस्तरेखा वाचण्यास सुरुवात केली. पुढे शिव हे खूळ घेऊन वीणाकडे गेला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह