Bigg Boss Marathi 3 update: बिग बॉस मराठी सीझन 3 ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, मीरा जग्गनाथ बिग बॉसच्या घराबाहेर

मालिका-ए-रोज
Updated Dec 23, 2021 | 23:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi 3 update: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. मीनल, जय, उत्कर्ष, विशाल आणि विकास हे सदस्य आता टॉप 5 मध्ये दाखल झाले आहेत. 26 डिसेंबरला बिग बॉस मराठी सीझन 3 चा ग्रॅण्ड फिनाले रंगणार आहे.

Bigg Boss Marathi 3 update
बिग बॉस मराठी सीझन 3 ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, मीरा जग्गनाथ बिग बॉसच्या घराबाहेर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरातून मीरा जग्गनाथ एलिमिनेट
  • बिग बॉस मराठी सिझन 3 ला मिळाले टॉप 5 स्पर्धक
  • रविवारी,म्हणजेच 26 डिसेंबरला रंगणार ग्रॅण्ड फिनाले

Bigg Boss marathi 3 final countdown : बिग बॉसमधून अखेर आज मीरा जग्गनाथचा प्रवास संपलाय. बिग बॉस मराठीमध्ये पहिल्यांदाच असे मिड वीक एलिमिनेशन झाले. मीनल आणि मीरा डेंजर झोनमध्ये होत्या. मात्र, अखेर मीराला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले. टॉप 5 मध्ये जाण्याचं मीराचं स्वप्न अखेर भंग पावलं आहे. 

ग्रॅण्ड फिनाले आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. रविवारी, 26 डिसेंबरला ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. आता, मीनल, जय, उत्कर्ष, विशाल आणि विकास या टॉप 5 स्पर्धकांमध्ये सामना रंगणार आहे. बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण जिंकणार? आणि कोणाच्या पदरी निराशा येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

या आठवड्यात स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातील आतापर्यंतच्या प्रवासातल्या आठवणींना उजाळा दिला. सारेच स्पर्धक एकापेक्षा एक सरस आहेत. या आठवड्यात कोणतेही भांडण, एकमेकांची उणीदुणी सदस्यांनी काढली नाहीत. तर या आठवड्यात त्यांच्यातील ऋणानुबंध आणखी घट्ट झाले. 

एकूणंच काय तर बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल हे अनाकलनीय आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात पुढे काय घडणार? बिग बॉस आणखी कोणतं सरप्राईज घरातील सदस्यांना देणार ते कळेलंच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी