Bigg Boss Marathi season 4 : "... आणि तो सदस्य कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद !", असा रंगणार कॅप्टन्सी टास्क

मालिका-ए-रोज
Updated Nov 03, 2022 | 19:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. खुल्लम खुल्ला राडा या टास्कमध्ये विजयी झालेल्या टीममध्ये आता अंतिम कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. त्यासाठी कोणते सदस्या बाद होतात आणि कोण घराचा कॅप्टन होतो याचीच उत्सुकता आहे.

Bigg Boss Marathi season 4 Captaincy task and rada
... आणि तो सदस्य कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमृता धोंगडे आणि अपूर्वामध्ये वादाची ठिणगी!
  • यशश्रीने फोडला अमृता धोंगडेच्या कॅप्टनशीपचा फुगा
  • कोण होणार घराचा नवा कॅप्टन?

Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. खुल्लम खुल्ला राडा या टास्कमध्ये विजयी झालेल्या टीममध्ये आता अंतिम कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. त्यासाठी कोणते सदस्या बाद होतात आणि कोण घराचा कॅप्टन होतो याचीच उत्सुकता आहे. (Bigg Boss Marathi season 4 Captaincy task and rada)


बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi) सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. खुल्लम खुल्ला राडा या टास्कमध्ये विजयी झालेल्या टीममध्येvआता अंतिम कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. नुकत्याचा आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने कॅप्टन्सी टास्क सविस्तर सांगितलेला आहे. "ज्या सदस्याचा फुगा फुटेल तो सदस्य कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद  होणार आहे. 
त्यावर यशश्री सांगते की, मी अमृता धोंगडे हिला बाद करू इच्छिते. त्याचवेळी अपूर्वा नेमळकरही अमृताला म्हणते, तू खेळलीस ते आक्रस्तपणे खेळलीस, त्यावर अमृतानेही अपूर्वाला तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे, अमृता म्हणते, तू काय कमी आक्रस्त होतीस? हा वाद एवढ्यावरच थांबलेला नाही. 

अमृताच्या या विधानावर अपूर्वा म्हणते, तू जर असं बोलणार असशील तर.. अपूर्वाचं बोलणं मध्येच तोडत अमृता तिला म्हणते, बोलणार... मला काढलंस ना बाहेर मग मी काय वाटेल ते बोलणार, चल सांग.. असं म्हणते. आता अमृताच्या या विधानावर कॅप्टन्सी टास्कमध्ये आणखी काय नवीन राडा होतो ते कळेलंच. 


दरम्यान, त्या आधी घरात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अक्षय आणि अमृता धोंगडेमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमृता आणि अक्षयमध्ये जेवणावरून वाद झालेला आहे. जेवताना किंवा जेवण बनवताना भांडू नका असं वारंवार या स्पर्धकांना सांगण्यात येत. मात्र, प्रत्येक सीझनमध्ये जेवणावरून वाद झालेला आपल्याला दिसतो. आजदेखील काहीसं तसंच होणार आहे. प्रोमोमध्ये हे पाहायला मिळत आहे, अक्षय अमृताला विचारतो, "संध्याकाळी पोळ्या करणार की नाही? अमृता त्यावर अक्षयला उत्तर देते, माझं अंग खूप दुखत आहे मी नाही करणार पोळ्या. त्यावर अक्षय अमृताला म्हणतो,बनवणार नाही वैगरे असं नको ना, नाही जमणार असाही टोन असतो. त्यावर अमृता भडकते, ती अक्षयला म्हणते, तुझा टोन पण तसाच होता, संध्याकाळच्या टीमने चहा टाका... आम्ही काही तुझ्या घरचे नोकर नाही. अक्षय म्हणतो, आम्ही पण तुझ्या घरचे नोकर नाही. बोटं दाखवू नको." 

एकूणंच काय तर, सध्या कॅप्टन्सीच्या टास्कवरून घरात सुरू असलेला राडा आता काय स्वरुप घेणार? कॅप्टनपदाच्या उमेदवारीपर्यंत कोणते सदस्य पोहोचणार याचीच उत्सुकता आहे. तर दुसरीकडे, अमृता धोंगडे आणि अक्षयमधला वाढत चाललेला वाद आणखी काय वळण घेणार तेच पाहायचं. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी