Bigg Boss Marathi season 4 : 'मित्राने केला मित्रावर वार...', विकास 'या' स्पर्धकाला ठरवणार गद्दार?

मालिका-ए-रोज
Updated Nov 13, 2022 | 19:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Marathi season 4) आता खऱ्या अर्थाने रंगायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण, आता एकमेकांचे जीवलग असलेले, एकमेकांशिवाय पानही न हलणारे मित्रच एकमेकांना गद्दार ठरवताना दिसत आहेत. पाहुया चावडीवर कोण कोणाला गद्दार ठरवतंय.

Bigg Boss Marathi season 4 fight between vikas and kiran mane
'या' स्पर्धकाला विकास ठरवणार गद्दार!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरात रंगला असा खेळ
  • विकासने किरण मानेचा केला असा गेम
  • कोणी कोणाला ठरवलं गद्दार?

Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Marathi season 4) आता खऱ्या अर्थाने रंगायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. आता कुठे स्पर्धकांचे खरे चेहरे समोर यायला सुरुवात झालेली आहे. शनिवारी महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjarekar) चावडीवर घरातील सगळ्याच सदस्यांची शाळा घेतली. त्यांच्या चुका त्यांना दाखवून दिल्या, आणि वेळीच नीट खेळायला सांगितलं. या स्पर्धकांना वठणीवर आणण्यासाठी महेश मांजरेकांनी त्यांची एकेकाची शाळा घेतली. आता कुठे खऱ्या अर्थाने बिग बॉस रंजक वळणावर येताना दिसत आहे. खेल तो अब शुरू होगा, कारण, रविवारच्या चावडीत असं काही घडणार आहे ज्याचा प्रेक्षक म्हणून तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. चावडीवर आज गद्दार कोण? हा खेळ रंगणार आहे. या खेळात आता एकमेकांचे जीवलग असलेले एकमेकांशिवाय पानही न हलणारे मित्रच एकमेकांना गद्दार ठरवताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi season 4 fight between vikas and kiran mane)

अधिक वाचा : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचा मृत्यू

वाहिनीच्या इंस्टाग्रामवर बिग बॉसच्या चावडीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. महेश मांजरेकरांनी घराती सदस्यांना एक टास्क दिलेला आहे. या टास्कमध्ये 
प्रत्येकाने त्याला जो वाटेल तो स्पर्धक गद्दार ठरवत त्याला बँड लावायचा आहे. यावेळी रुचिराने अपूर्वाला गद्दार ठरवत तिला टॅग लावलेला दिसला, तर रोहित आणि अक्षय यांच्या मैत्रीचं सत्यही समोर आलं. अक्षयने रोहितलाच गद्दार ठरवलं. 

मात्र, या टास्कमध्ये खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा विकासने चक्क किरण माने यांना गद्दार ठरवलं. विकासने किरणचं नाव घेताच साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. बिग बॉसच्या घरातील 
विकास आणि किरणची दोस्ती साऱ्यांनाच माहित आहे. बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक तो म्हणजे किरण माने कायम विकासची साथ देत असतो. या दोघांची चांगली मैत्री आहे. विकास किरण मानेला त्याचा मोठा भाऊ मानतो. किरण मानेला विकास कायम दाद्या अशा हाकही मारताना आपण पाहिलंय. मात्र, आता विकासने चक्क किरणालाच गद्दार ठरवल्याने आता बिग बॉसच्या घरात मोठा राडा होणार आहे. विकासने गद्दार ठरवल्याने किरण मानेला धक्काच बसला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

अधिक वाचा : शोएब मलिकचे अभिनेत्री आयशा उमरसोबतचे फोटो व्हायरल

तसं पाहता, मागच्यावेळी किरण आणि विकास यांच्यात झालेलं भांडण हा एक प्लान होता. महेश मांजरेकरांनी चावडीवर हे सत्य साऱ्यांसमोर आणलं होतं. त्यामुळे यावेळीही हा असाच काही प्लान आहे की खरंच आता या दोघांमध्ये फूट पडणार हे पाहणं खूपच इंट्रेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनी बिग बॉसच्या या प्रोमोवर 'आता खरा बिग बॉसचा खेळ सुरू झाला' अशा कमेंट्स केल्या आहेत. 


महेश मांजरेकरांनी दिलेल्या या टास्कमुळे आता खेळात एक वेगळाच रंग दिसू लागलाय. आतापर्यंत घरातून निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे आणि योगेश जाधव 
हे चार स्पर्धक बाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारच्या एपिसोडमध्ये घरातून कोण बाहेर जाणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी