Bigg boss Marathi season 4 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, अब आयेगा मजा

मालिका-ए-रोज
Updated Oct 30, 2022 | 16:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg boss Marathi season 4 : बिग बॉसच्या (bigg boss marathi)घरात आता एक नवं वादळ येणार आहे. या वादळाच्या येण्याने घरातील समीकरणं बदलतील अशी चिन्ह आहेत. कारण, आता बिग बॉसच्या घरात होणार आहे चौथ्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री(First wild card entry). कोण आहे ती स्पर्धक जिच्या घरात येण्याने घरातील समीकरणं बदलणार असं म्हटलं जात आहे.

bigg boss marathi season 4 first wild card entry
बिग बॉस मराठीमध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरात येणार नवं वादळ
  • बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री
  • वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील समीकरणं बदलणार?

Bigg boss Marathi season 4 : बिग बॉसच्या (bigg boss marathi) घरात आता एक नवं वादळ येणार आहे. या वादळाच्या येण्याने घरातील समीकरणं बदलतील अशी चिन्ह आहेत. कारण, आता बिग बॉसच्या घरात होणार आहे चौथ्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री (First wild card entry). कोण आहे ती स्पर्धक जिच्या घरात येण्याने घरातील समीकरणं बदलणार असं म्हटलं जात आहे. (bigg boss marathi season 4 first wild card entry)

बिग बॉस मराठीचा  (bigg boss marathi)चौथा सीझनमध्ये हिंदी बिग बॉसप्रमाणेच खूप राडे होताना दिसत आहेत. कुरघोडी, मारामारी, वाद, भांडण हे सारं काही बिग बॉसच्या घरासाठी नवीन नाही. मात्र, यंदाचा सीझन खास आहे. घरातील सदस्यांमधील नाती, त्यांची मैत्रीची समीकरणं दिवसागणिक बदलत आहेत. काहींनी गेमवर पकड घेतलीय तर काही मात्र अजूनही झोपेतच आहेत. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने सध्या बिग बॉसची चावडी सुरू आहे. या चावडीवर महेश मांजरेकर प्रत्येक स्पर्धकाची शाळा घेताना दिसत आहेत. आठवड्याभरात झालेल्या खेळाचं, प्रत्येक स्पर्धकाचं प्रगती पुस्तक घेऊनच महेश मांजरेकर चावडीवर आले आहेत. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा घेत ते काहींना खडेबोल सुनवत आहेत, तर काहींच्या खेळाचं कौतुकही करताना दिसत आहेत. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात एक नवं वादळ येणार आहे. कारण, आता या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री (First wild card entry) होणार आहे. 

अधिक वाचा : 'ही' आहे अनन्या पांडेची नेटवर्थ


बिग बॉस मराठीचा तिसरा आठवडा आता संपलाय. या आठवड्यात स्पर्धकांचे विविध रंग पाहायला मिळाले. घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही जण मात्र, अजूनही नक्की कोणत्या गटातून खेळायचं याबाबत चाचपडत आहेत. त्यामुळे काही सदस्य कधी या गटातून तर कधी त्या गटातून खेळताना दिसत आहेत. मात्र, आता या सगळ्या स्पर्धकांना टक्कर द्यायला आणि त्यांची सगळी समीकरणं बदलायला बिग बॉसच्या घरात होणार आहे पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री. आता कोण स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून घरात जाणार याची उत्सुकता वाढलीय. 

पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा प्रोमो नुकताच कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला. प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ही एक महिला स्पर्धक आहे. नेहमीप्रमाणे, डान्स परफॉर्मन्स देत ही स्पर्धक बिग बॉसच्या स्टेजवर अवतरली आहे. मात्र, या स्पर्धकाचा चेहरा प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे आता ही कोण स्पर्धक आहे याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. 

अधिक वाचा :  तुमच्या जोडीदाराचे खरंच प्रेम आहे की शारिरीक आकर्षण?

प्रोमो पाहिल्यानंतर ही स्पर्धक कोण असणार याचा अंदाज लावायला यूजर्सनी सुरुवातही केलेली आहे. काही यूजर्सनी ही स्पर्धक म्हणजे तेजश्री जाधव असल्याचं म्हटलं आहे तर काहींच्या मते ती ऐश्वर्या शेट्टे आहे. आता ही स्पर्धक कोण आहे? आणि ती गेम चेंजर ठरणार का ते लवकरच कळेल. तोपर्यंत वेट अँड वॉच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी