Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉसच्या घरात रंगणार 'विषय END' नॉमिनेशन कार्य, BB कॉलेजमध्ये धमाल करणार सदस्य

मालिका-ए-रोज
Updated Nov 07, 2022 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Mघarathi season 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Mघarathi season 4) सध्या खूपच चर्चेत आहे. सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात काहीना काही वाद सुरूच आहेत. त्रिशूल मराठे (Trushul Marathe) या स्पर्धकाला रविवारी बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले.

bigg boss marathi season 4 nomination task
बिग बॉसच्या घरात आता'विषय END'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क
  • कोणती टीम नॉमिनेशन टास्क जिंकणार ?
  • त्रिशूल मराठे बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट

Bigg Boss Mघarathi season 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Mघarathi season 4) सध्या खूपच चर्चेत आहे. सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात काहीना काही वाद सुरूच आहेत. सोशल मीडियावरही (Social media) सीझनची जोरदार चर्चा आहे. नुकतच त्रिशूल मराठे हा स्पर्धक एलिमिनेट झालेला आहे. यावेळी साऱ्याच स्पर्धकांना त्रिशूल एलिमिनेट झाल्याने वाईट वाटलं. मात्र, शो मस्ट गो ऑन या धर्तीवर आता घरात पुन्हा एकदा नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धकांनी बालपणीच्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांना कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याची संधी मिळणार आहे. ( bigg boss marathi season 4 nomination task )

अधिक वाचा : रोहित शर्माच्या चाहत्याला मैदानात घुसणे पडले इतके भारी की...

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. हे कार्य कसे असेल याचा एक प्रोमो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हे नॉमिनेशन कार्य टीम A VS टीम B मध्ये पार पडणार आहे. आता या कार्यात कोणती टीम विजयी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

नॉमिनेशन कार्य म्हटल्यावर घरात राडा तर होणारच. एकमेकांची उणीदुणीही काढली जातील. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे त्या सदस्याचा फोटो असलेला बॉक्स हातोड्याने फोडायचा आहे. हे कार्य टीम A vs टीम B असे रंगणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या टीमला जिंकवण्यासाठी खेळताना दिसणार आहे. आता या कार्यात कोणती टीम काय शक्कल लढवते आणि कोणती टीम जिंकते हे पाहणं इन्ट्रेस्टिंग ठरणार आहे. 

अधिक वाचा : करिअरमध्ये प्रगती करताना महिलांसमोर असतात ‘ही’ आव्हानं

नुकतeच बिग बॉसच्या घरातून त्रिशूल मराठेला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. खरं तर, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक सामान्य नागरिक सदस्य म्हणून बिग बॉसच्या घरात गेला होता. सामान्य नागरिकाला बिग बॉसच्या घरात खेळताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात मिळाली होती. त्रिशूलने पहिल्या दिवसापासून महेश मांजरेकरांसह साऱ्यांचीच मनं जिंकली होती. त्याचा खेळही खूप छान सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून त्याचा खेळ घसरल्याचं पाहायला मिळालं. 
'हा घरातील खूप चांगला माणूस होता. त्याला आज घराबाहेर जावं लागतंय' असं म्हणत महेश मांजरेकरांनी त्रिशूल एलिमिनेश झाल्याचं सांगितलं. आता दिवसेंदिवस घरातील खेळ आणखी रंगतदार होणार आहे. आता या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी कोण कोण नॉमिनेट होणार याचीच उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी