Bigg Boss Marathi season 4 Winner : बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता

Bigg Boss Marathi Season 4 Winner Name, Prize Money, All details, Akshay Kelkar won Bigg Boss Marathi season 4  : अक्षय केळकर बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता झाला.

Bigg Boss Marathi season 4
बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता
  • अक्षय केळकर बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता
  • बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर आणि रनर अप अपूर्वा नेमळेकर

Bigg Boss Marathi Season 4 Winner Name, Prize Money, All details, Akshay Kelkar won Bigg Boss Marathi season 4  : अक्षय केळकर बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता झाला. ग्रँड फिनाले फेरीत अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत हे पाच स्पर्धक होते. अंतिम टप्प्यात  अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर हे दोन स्पर्धक उरले होते. । झगमगाट

परंपरेनुसार बिग बॉसच्या घराचे सर्व दिवे बंद करत अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर बाहेर आले. दोघांनी महेश मांजरेकर यांची भेट घेतली. महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर आणि रनर अप अपूर्वा नेमळेकर या दोघांचे अभिनंदन केले. 

बिग बॉस मराठी सीझन 4 चा ग्रँड फिनाले

बिग बॉस मराठी सीझन 4 ची सुरुवात 2 ऑक्टोबर 2022 रोजी झाली. या सीझनचा ग्रँड फिनाले रविवार 8 जानेवारी 2023 रोजी झाला. टीव्हीवरती कलर्स मराठी या चॅनलवर आणि वूट या मोबाईल अॅपवर बिग बॉस मराठी सीझन 4  बघता येत होता. 

पुरस्कार

बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये अक्षय केळकरला फिनोलेक्स पाइप्स कॅप्टन ऑफ द सीझन तर अपूर्वा नेमळेकरला प्रिटी फेस ऑफ द सीझन हा पुरस्कार देण्यात आला. याआधी अपूर्वा नेमळेकरने 'मेरे ढोलना' या गाण्यावर नृत्य सादर केले. 

फिनोलेक्स पाइप्स कॅप्टन ऑफ द सीझन पुरस्काराचे स्वरुप

बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर याला फिनोलेक्स पाइप्स कॅप्टन ऑफ द सीझन पुरस्कार देण्यात आला. विजेत्या अक्षयला ट्रॉफी, 15 लाख 55 हजार रुपयांचा चेक, पीएनजीकडून 10 लाखांचे गिफ्ट व्हाऊचर आणि फिनोलेक्सकडून 5 लाखांचा चेक देण्यात आला.

कोण आहे अक्षय केळकर

बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर हा मॉडेल आणि अभिनेता आहे. त्याने टीव्ही मालिकेच्या क्षेत्रात काम केले आहे तसेच 2018 मध्य प्रदर्शित झालेल्या माधुरी या सिनेमात काम केले होते. 

कळव्याचा अक्षय केळकर

बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर याचा जन्म ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे झाला. अक्षयने 2013 मध्ये बे दुणे दहा या टीव्ही मालिकेतून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. त्याने 2014 मध्ये प्रेमसाथी हा मराठी सिनेमा केला. नंतर त्याने कान्हा हा मराठी सिनेमा केला. अक्षयने 2016 मध्ये कॉलेज कॅफे आणि 2018 मध्ये माधुरी या सिनेमात काम केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी