शिवानीने दिली 'बिग बॉस'ला धमकी, पाहा काय घडलं नेमकं?

मालिका-ए-रोज
Updated Jun 13, 2019 | 09:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Shivani revolts: बिग बॉस मराठी घरात शाळा सुटली पाटी फुटली हे टास्क उत्तम सुरु असतानाच शिवानीने मध्येच घरी जाण्याची रट लावायला सुरुवात केली. ती या टोकाला गेली की तिने अक्षरशः घरात बंडच पुकारला.

Shivani Surve revolts inside the house creates new drama
पाहा शिवानीने का दिलीये खुद्द बिग बॉस यांच्यावरच कायदेशीर कारवाई करण्याची धमकी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठी घरात शाळा सुटली पाची फुटली हे टास्क एकदम धमाल रंगलं आहे. दोन्ही टीम्स हे टास्क उत्तम खेळत आहेत. कालचा झालेला नेहा आणि शिवमधला वाद सोडला तर टास्क एकदम रंजक सुरु आहे. बिग बॉसचं घर एक शाळा बनलं आहे आणि टीम बी शिक्षकांच्या भूमिकेत आहेत तर टीम ए विद्यार्थ्यांच्या. आत्तापर्यंत टीम ए मधून नेहा आणि बिचुकले या टास्कमधून आणि त्याचसोबत कॅप्टनसीच्या रेसमधून बाहेर झाले आहेत. यानंतर टास्क पुढे सरकताना दिसलं आणि खेळातली रंगत अधिक वाढली. खेळ जसा पुढे सरकला तसे वेगवेगळे तास या शाळेत रंगले. सुरेखा यांच्या नृत्यकलेचा, वीणा हिचा वादविवाद शास्त्राचा. दोन्ही तासानंतर अजून दोन स्पर्धक शिवानी आणि विद्याधर शाळेत नापास झाले आणि खेळातून बाहेर झाले. जिथे टास्क उत्तम सुरु होतं तिथे शिवानीने पुन्हा काहीतरी नवीन सुरु केलं आणि तिच्या मूळ स्वभावात येताना दिसली.

शिवानी टास्कच्या मध्येच शाळेतून निघून गेली खरी आणि त्यासाठी तिला नापास ही केलं गेलं पण त्या व्यतिरिक्त ती पूर्ण वेळ सगळ्या स्पर्धकांना हे सांगताना दिसली की तिला घरातून बाहेर जायचं आहे आणि आता खेळात राहण्याची तिची ईच्छा नाही. त्यासाठी तिने तिच्या तब्येतीचं सुद्धा कारण दिलं. बिग बॉस यांना ती अनेक वेळा कन्फेशन रुममध्ये बोलवण्यासाठी विनवणी करताना दिसली ही विनवणी नंतर बंडात रुपांतरीत झाली आणि तिने घरात माईक न घालण्याची जिद्द पकडली. तिला घरातल्या सदस्यांनी असं न करण्याचा सल्ला दिला पण ती काही केल्या ऐकत नव्हती.

ही रट तिने रात्र होईपर्यंत सुरु ठेवली एवढच काय तर तिने कायद्याची भाषा बोलून दाखवत कोणीही तिला घरात तिच्या मर्जी विरुद्ध डांबून ठेवू शकत नाही असं सुद्धा बोलून दाखवलं. तर पुढे तिने तिचे वकील आता यावर बोलतील वगैरे पण बोलून दाखवायला मागे पुढे पाहिलं नाही. अशा अनेक गोष्टी बोलून तिने बिग बॉस यांचा राग ओढावून घेतला हे निश्चित.

अखेर बिग बॉस यांनी मध्यरात्री शिवानीला नेहासोबत कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतलं. खूप चर्चेनंतर शिवानी काही गोष्टींबद्दल दिलगीरी व्यक्त करताना दिसली. पण चर्चा खूप गहन होती आणि शिवानीला त्यातून आपण बरंच काही बोलून चूक केली आहे हे थोडंफर लक्षात आलं. कारण बऱ्याच चर्चेनंतर पण ती ऐकत नाही हे लक्षात येताच बिग बॉस यांनी सांगीतलं की शिवानीने जर यावर कायदेशीर कारवाई करण्याचं बोलून दाखवलं आहे तर आता या पुढे या सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने पुढे जातील. त्यावर आपली चूक लक्षात आलेली शिवानी अजून नरमली आणि तिने माफी मागत यावर काहीतरी दुसरा तोडगा काढून कायदेशीर गोष्टी टाळाव्या अशी विनंती बिग बॉस यांना केली.

यानंतर बिग बॉस यांनी शिवानीला तिथून जाण्यासाठी सांगतलं आणि यावर नंतर बोलू असं सुद्धा सांगितलं. आता या सगळ्यावर काय आणि कुठला तोडगा निघतो ते पहावं लागेल. या ड्रामानंतर दुसरा दिवस मात्र घरात तसा बरा सुरु झाला आणि रात्रीच्या गोष्टी विसरत सगळे स्पर्धक पुन्हा एकदा खेळात रमताना दिसले आणि टास्कच्या प्लॅनिंगमध्ये गुंतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शिवानीने दिली 'बिग बॉस'ला धमकी, पाहा काय घडलं नेमकं? Description: Bigg Boss Marathi Shivani revolts: बिग बॉस मराठी घरात शाळा सुटली पाटी फुटली हे टास्क उत्तम सुरु असतानाच शिवानीने मध्येच घरी जाण्याची रट लावायला सुरुवात केली. ती या टोकाला गेली की तिने अक्षरशः घरात बंडच पुकारला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles