बिग बॉस वीणा आणि किशोरीची 'ही' गोड इच्छा पूर्ण करणार?

मालिका-ए-रोज
Updated Jun 11, 2019 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi Veena has a sweet tooth: वीणा जगताप आणि किशोरी शहाणे यांचं बॉण्डिंग घरात खुप मस्त जमुन आलं आहे. कायम या दोघी एकत्र दिसतात, त्यातंच त्यांच्यातला एक गोड संवाद रंगताना दिसला. पाहा हा गोड संवाद.

Bigg Boss Marathi Veena opens up on her sweet tooth
गोड खाण्यावरुन वीणा-किशोरीमध्ये बिग बॉस मराठी घरात एक गोड संवाद रंगतो तेव्हा (फोटो सौजन्य: कलर्स मराठी) 

मुंबई: बिग बॉस मराठी 2च्या घरात राहणं तितकं सोप्पं नाही. कारण इथे टास्क आणि खेळ तर असतातच त्यात भांडणं देखील रंगतात. पण त्यातही या सगळ्या स्पर्धकांना बऱ्याच गोष्टींचं बलिदान द्यावं लागत असतं. अनेक दैनंदिन गोष्टीपासून हे स्पर्धक लांब असतात, त्यात मोबाईल, टीव्हीशिवाय त्यात जेवणातील आणि खाण्या-पिण्याच्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. घरात रोजच्या जेवणातल्या गोष्टी तर येतात पण लक्झरीच्या गोष्टी म्हणजे चिकन, किंवा गोड पदार्थ किंवा काही बिस्किटं वगैरे फक्त लक्झरी बजेटमध्ये आलं तर येतं नाहीतर ते पण नाही. त्यामुळे सगळ्यांना आपल्या जिभेचे चोचले पुरवायला घरात मिळत नाहीत. अशातच गोड खाण्याची आवड असलेल्या वीणाला अचानक तिच्या आवडीच्या पदार्थांची आठवण होताना दिसली आणि तिने ही गोष्ट किशोरी यांच्यासोबत शेअर केली.

प्रत्‍येकाला आपल्‍या आवडत्‍या पदार्थाचा आस्‍वाद घ्‍यायला कायम आवडतो. पण बिग बॉस घरामध्‍ये असलेल्‍या स्‍पर्धकांना ही संधी मिळत नाही. त्‍यांची ही आवड पूर्ण करण्‍याचा मार्ग म्‍हणजे फक्‍त त्‍याबाबत गप्‍पा करणे. बिग बॉसच्या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये वीणा जगताप किशोरी शहाणेला केकसाठी असलेल्‍या तिच्‍या आवडीबाबत सांगताना दिसत आहे. या दोघीही बेडरूममध्‍ये बसून छान गप्‍पा मरत बसल्या आहेत आणि किशोरी वीणाचे ती किती सुंदर दिसते आणि तंदुरूस्‍त आहे यासाठी कौतुक करताना दिसल्या. वीणा त्‍यावर म्‍हणते, ''अॅक्‍च्‍युअली नाही आहे बारीक मी. २ महिने मी घरी बसून फक्‍त जंक फूड खाल्‍लं आहे, बेकरी प्रॉडक्‍ट्स आणि स्‍पेशली केक्‍स मला खूप आवडतात. जॅम रोल्‍स, स्विस रोल्‍स, केक्‍स, पेस्‍ट्रीज आणि बनाना अॅप्रीकोट केक तर मला खूपच टेम्‍प्‍ट करतात... मी, मम्‍मा आणि माझी बहीण आम्‍ही उल्‍हासनगरला गेलो ना की नक्‍की केक खातो, इव्‍हन कधी इच्‍छा झाली तर घरी केक मागवतो आणि खातो.''

वीणा असं सांगत असताना किेशोरी यांना पण त्यांच्या घरची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि लगेच त्या म्‍हणतात, ''मी पण कधी तरी असंच करते, डिनरच्‍या ऐवजी केक, केक फीस्‍ट. बॉबी सेलिब्रेशनच्‍या वेळी ऑर्डर करतो असं सगळं, टू हॅव्‍ह समथिंग डिफरण्‍ट आणि मला बेसिक न्‍यूट्रिशन मिळाला की बसं होतं पण ओकेजनली असं सगळं खायला मिळालं तर व्‍हाय नॉट!” आता या दोघींच्या या गोड संवादनंतर बिग बॉस त्यांची ही इच्छा पूर्ण करायची ठरवतात का आणि केली तर ती कशी काय करतात आणि त्याने वीणा आणि किशोरी यांचं रिअॅक्शन काय असेल हे पाहणं रंजक ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस वीणा आणि किशोरीची 'ही' गोड इच्छा पूर्ण करणार? Description: Bigg Boss Marathi Veena has a sweet tooth: वीणा जगताप आणि किशोरी शहाणे यांचं बॉण्डिंग घरात खुप मस्त जमुन आलं आहे. कायम या दोघी एकत्र दिसतात, त्यातंच त्यांच्यातला एक गोड संवाद रंगताना दिसला. पाहा हा गोड संवाद.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles