बिग बॉस मराठी 2मध्ये ‘शाळा सुटली पाटी फुटली’ टास्क जाहीर आणि...

मालिका-ए-रोज
Updated Jun 12, 2019 | 08:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi becomes a School: बिग बॉस मराठी घरात आता एक नवीन टास्क रंगणार आहे आणि घरात शाळा भरणार आहे. त्यामुळे घर शाळेत रुपांतर होताच घरातले स्पर्धक शाळकरी मुलं बनणार आहेत आणि घरात वेगळीच धमाल रंगणार.

Bigg Boss turns into a school and contestants become school kids
बिग बॉस मराठी 2मध्ये ‘शाळा सुटली पाटी फुटली’ टास्क जाहीर आणि धमालंच धमाल 

मुंबई: बिग बॉस मराठी 2च्या घरात या आठवड्याची जोरदार सुरुवात झाली. त्यातंच घरातल्या स्पर्धकांनी अनेक नियमांचं भंग केल्याने शिक्षा म्हणून या आठवड्यात कॅप्टन होण्याची कोणालाच संधी मिळाली नाही. पण तरीही बिग बॉस यांनी एक युक्ती लढवली आणि विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा यांना एक सिक्रेट टास्क दिलं. बाप्पा यांना कन्फेशन रुममध्ये बोलवून बिग बॉस यांनी सांगीतलं की, घरात कोणी कॅप्टन नसल्याने त्यांनी घरात होणाऱ्या नियमांचा भंग बिग बॉस यांच्या नजरेस आणून द्यायचा आहे. यावर दिवस तर संपला पण घरात नवीन दिवसाची सुरुवात झाली ती एका भांडणाने. नेहा आणि शिवमध्ये एका छोट्या गोष्टीचा वाद उगाच विकोपाला गेला.

आणि मग वेळ आली घरातल्या साप्ताहीक टास्कची. जून महिन्याची सुरुवात आणि शाळा हे एक वेगळंच समिकरण आहे आणि हेच समिकरण आता शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमधून बिग बॉस घरात जुळून येणार आहे. यासाठी दोन टीम्स घरात बनल्या आहेत, टीम ए मध्ये बिचुकले, नेहा, माधव, अभिजीत, शिवानी, दिगंबर आणि विद्याधर हे सदस्य एकत्र आले तर टीम बीमध्ये वीणा, पराग, किशोरी, वैशाली, शिव, रुपाली आणि सुरेखा यांचा समोवश झाला. दोन्ही टीम्स एकमेकांविरोधात खेळणार असून पहिल्यांदा टीम बी शिक्षकांच्या भूमिकेत तर टीम ए विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार असं जाहीर झालं.

या शाळेतल्या शिक्षकांच्या टीममधल्या सुरेखा यांना नृत्यकला, शिवला मराठी, वैशालीला संगीत, परागला प्रेमशास्त्र, रुपालीला होमसायन्स, वीणाला वादविवाद शास्त्र हे विषय सोपवले गेले तर किशोरी यांना मुख्याध्यापिका बनवलं गेलं. हे टास्क एकदम धमाल नोटवर सुरु झालं. शाळकरी मुलांच्या भूमिकेत असलेली टीम टास्कमध्ये खूपंच धमाल आणत होती. पण एरवीच्या टास्कपेक्षा वेगळं असलेलं हे टास्कसुद्धा सुरळीत पार पडू शकलं नाही कारण त्यात पण नेहा आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडालीच.

नेहा विद्यार्थीनीच्या भूमिकेत होती तर शिव हा शिक्षकाची भूमिका पार पाडत होता. त्यात नेहा फारंच विचित्र वागत असल्यामुळे तिला शिवने शिक्षा दिली. त्यात पण नेहा काही केल्या त्याचं ऐकत नव्हती म्हणून शिवने तिला खडू फेकून मारला तर पुढे तिच्या संस्करांवर गेला. हे ऐकताच नेहाचा राग अनावर झाला आणि तिने शिवला तिच्या घरच्यांची माफी मागायला सांगतली. हा वाद खूप विकोपाला जात आहे असं लक्षात येताच मुख्याध्यापिका किशोरी यांनी मध्यस्ती करत या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवने नेहाच्या घरच्यांची माफी मागितली. पण मग टास्क दरम्यान विद्यार्थिनी म्हणून त्रास दिल्याने नेहाला नापास जाहीर केलं गेलं आणि तिला शाळेतून काढलं गेलं. तर पुढे टास्कमध्ये बिचुकले सुद्धा नापास झाले आणि ते सुद्धा गेममधून त्याचसोबत कॅप्टनसीच्या रेसमधून बाहेर गेले. आता पुढे या टास्कला अधिक रंग चढणार त्यामुळे घरात धमाल मस्ती अधिक रंगणार हे निश्चित.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी 2मध्ये ‘शाळा सुटली पाटी फुटली’ टास्क जाहीर आणि... Description: Bigg Boss Marathi becomes a School: बिग बॉस मराठी घरात आता एक नवीन टास्क रंगणार आहे आणि घरात शाळा भरणार आहे. त्यामुळे घर शाळेत रुपांतर होताच घरातले स्पर्धक शाळकरी मुलं बनणार आहेत आणि घरात वेगळीच धमाल रंगणार.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles