Prajkta Mali bold look : सोज्वळ प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक, चाहते लूक पाहून आश्चर्यचकित !!!

मालिका-ए-रोज
Updated May 16, 2022 | 19:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prajkta Mali bold look : स्मॉल स्क्रीनवर सोज्वळ सुनेची, मुलीची, आणि अभिनेत्रीची इमेज असलेली प्राजक्ता माळी रानबाजार या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड लूक या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. या वेबसीरिजचा टीझर रिलीज झालाय. येत्या 18 तारखेला वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

Bold look of  Prajakta Mali, fans are surprised to see Look !!!
प्राजक्ता माळीचा बोल्ड अवतार  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार'
  • प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित प्रमुख भूमिकेत
  • अभिजीत पानसे यांची नवी कलाकृती

Prajkta Mali bold look : स्मॉल स्क्रीनवर सोज्वळ सुनेची, मुलीची, आणि अभिनेत्रीची इमेज असलेली प्राजक्ता माळी 'रानबाजार' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड लूक या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. या वेबसीरिजचा टीझर रिलीज झालाय. येत्या 18 तारखेला वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 


दिग्दर्शक अभिजित पानसे एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
टीझर पाहूनच हा विषय, त्याची मांडणी किती बोल्ड असेल याचा आपण अंदाज नक्कीच लावू शकतो. मराठी वेबसीरिजच्या विश्वात इतका बोल्ड, संवेदनशील विषय हातळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सत्य घटनांचा संदर्भ या वेबसीरिजमध्ये घेण्यात आल्याचं कळतंय. 

'रानबाजार' या वेबसीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.  यात प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अंदाजात इंटीमेट सीन देत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येतं. 


हा टीझर शेअर करत प्राजक्ताने असं लिहिलय की, "प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न" असल्याचं प्राजक्ताने म्हटलंय. 

एवढचं नाही तर पुढे प्राजक्ताने इन्स्टा पोस्टवर असंही म्हटलंय की, "माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल 
our captain of the ship @abhijitpanse व मराठीतील सगळ्यात मोठी web series बनवल्याबद्दल @planetmarathiott @akshaybardapurkar ह्यांचे आभार."


"१८ तारखेलाला trailer येतोय, २० ला series येतेय…#रानबाजार" असं कॅप्शनही प्राजक्ताने टीझर शेअर करत दिले आहे. 

बोल्ड लूकमुळे प्राजक्ता माळी ट्रोल 


अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सोज्वळ इमेजला धक्का देत, अतिशय बोल्ड भूमिका यात साकारलेली दिसत आहे. मात्र, यामुळे प्राजक्ता माळी ट्रोलही झालेली आहे. "प्राजक्ताला चांगली हिरोईन समजत होतो, पैश्यासाठी आणि इंडस्ट्री मध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्या थराला गेली बघा" 
असे एका यूजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने स्टोरी ऐवजी वेबसीरिजमधील असा कंटेन्ट प्रमोशनसाठी वापरल्याचंही म्हटलंय," काहींनी तर थेट पॉर्न इंडस्ट्रीशी वेबसीरिजची तुलना केलेली आहे. तर दुसरीकडे प्राजक्ताच्या काही चाहत्यांनी तिच्या या बोल्ड लूकचे कौतुकही केलेलं आहे. 


या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मराठी विश्वातील आजवरची सगळ्यात बोल्ड वेबसीरिज असल्याचं म्हटलं जातंय. रेगे, ठाकरे असे संवेदनशील विषय सिनेमातून मांडणारा दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची ही वेबसीरिज आता मराठी वेबसीरिज आणि सिनेसृष्टीत काय धुराळा उडवते ते 20 तारखेला वेबसीरिज रिलीज झाल्यावर कळेलंच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी