(VIDEO) बिग बॉस १४मध्ये कॅप्टन अली गोनीची मोठी पलटी, रुबीना दिलैकसह या तिघांना टाकले रेड झोनमध्ये

मालिका-ए-रोज
Updated Nov 21, 2020 | 11:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 14 Tabadla task: घराचा कप्तान असलेल्या अली गोनीने सर्वांना चकित करत कविता कौशिकशिवाय रुबीना दिलैक आणि निक्की तांबोलीलाही रेड झोनमध्ये पाठवले आहे.

Aly Goni
बिग बॉस १४मध्ये कॅप्टन अली गोनीची मोठी पलटी, रुबीना दिलैकसह या ३ तीन लोकांना टाकले रेड झोनमध्ये  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १४च्या ताज्या भागात पाहायला मिळणार मोठी उलथापालथ
  • निक्की तांबोळी आणि कविता कौशिक यांच्यासह पुन्हा रेड झोनमध्ये दिसू शकते रुबीना
  • वाईल्ड कार्ड स्पर्धक आणि घराच्या कॅप्टनच्या निर्णयावर व्यक्त केले आश्चर्य

मुंबई: बिग बॉस १४च्या (Bigg Boss 14) आगामी भागात (upcoming episode) कॅप्टन (captain) अली गोनीला (Aly Goni) काही सदस्यांना (members of house) बेघर (eviction) करण्यासाठी रेड झोनमध्ये (red zone) पाठवण्याचा अधिकार (right to nominate) मिळणार आहे आणि त्याने सर्वांना चकित करत (amazes everyone) रुबीना दिलैक (Rubina Dalaik), कविता कौशिक (Kavita Kaushik) आणि निक्की तांबोळीचे (Nikki Tamboli) नाव नॉमिनेट केले आहे. निक्की आणि रुबीनाचे नाव घेण्याचा त्याचा निर्णय थोडासा आश्चर्यकारक (amusing decision) आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये घरात यामुळे मोठी उलथापालथ (huge happenings) होण्याची शक्यता आहे.

घरातील सदस्यांनी व्यक्त केले आश्चर्य

प्रोमोमध्ये दिसत आहे की अली गोनी म्हणत आहे, ‘निक्कीने कवितासोबत मिळून माझे नाव खूप खराब केले आहे.’ यावर निक्की भडकते आणि तिने अलीवर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, त्याच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. यापेक्षाही चकित करणारा निर्णय होता रुबीनाला रेड झोनमध्ये पाठवण्याचा. प्रोमोच्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की रुबीनाला या निर्णयाचे खूप आश्चर्य वाटले आहे.

बिग बॉसच्या आगामी प्रोमोवर एक नजर

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv)

काय म्हणाली रुबीना अलीच्या गर्लफ्रेंडला?

अलीकडून आपले नाव रेड झोनमध्ये टाकण्यात आल्याचे ऐकून रुबीना दिलैक पूर्णपणे चकित झाली आणि तिने अलीची गर्लफ्रेंड जॅस्मिनला म्हटले, ‘त्याने मला नॉमिनेट कसे केले?’ कविता कौशिक अलीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया न देता फक्त हसताना या प्रोमोत दिसत आहे.

अली गोनी, गर्लफ्रेंड जॅस्मिन आणि रुबीना दिलैकचे जवळचे नाते

सध्याचा घराचा कॅप्टन अली गोनी, त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिन भसीन आणि रुबीना दिलैक यांचे एक जवळचे नाते आहे आणि अलीचे हे पाऊल त्याच्या असुरक्षिततेच्या भावनेचे सूचक असल्याचे म्हटले जात आहे. याआधी घरातल्या सदस्यांनी मिळून रुबीना आणि तिचा पती अभिनव शुक्ला याला पिंजऱ्याच्या टास्कमध्ये जेलमध्ये बंद केले होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी